Tata Pay: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने टाटा समूहाच्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप टाटा पेमेंट्सला पेमेंट एग्रीगेटर (PA) परवाना मंजूर केला आहे, ज्यामुळे कंपनीला त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे ईकॉमर्स व्यवहार सुलभ करण्यात मदत होणार आहे. टाटा पेमेंट हे समूहाच्या उपकंपनी टाटा डिजिटलद्वारे चालवले जाणार असून, जे त्यांचे डिजिटल व्यवसाय सांभाळते.

टाटा पे बहुप्रतीक्षित पेमेंट परवाना सुरक्षित करण्यासाठी Razorpay, Cashfree, Google Pay आणि इतर कंपन्यांच्या यादीत सामील झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “पेमेंट एग्रीगेटर लायसन्समुळे आता टाटा त्यांच्या उपकंपन्यांमधील सर्व ईकॉमर्स व्यवहारांना सक्षम बनवू शकतो, ज्यामुळे निधीचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत होणार आहे.”

former director of agricultural produce market committee arrested in toilet scam
कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

हेही वाचाः १०.७५ टक्के वाढ नोंदवत डिसेंबर २०२३ मध्ये कोळसा उत्पादन ९२.८७ दशलक्ष टनांवर पोहोचले

Tata Pay बरोबर बंगळुरू आधारित ओळख पडताळणी स्टार्टअप डिजिओनेही १ जानेवारीला PA परवाना देखील मिळवला, ज्याला गुंतवणूक प्लॅटफॉर्म Groww ने पाठिंबा दिला आहे. डिजिओ अनेक फिनटेकसाठी डिजिटल ओळख करून देण्याचे माध्यम असून,पेमेंट सेवा प्रदान करण्यास सक्षम असणार आहे.

हेही वाचाः ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढणार; ३ दिवसांत ‘एवढ्या’ कोटींचे नुकसान होण्याची शक्यता

सध्या बाजारात कोणते पेमेंट अ‍ॅप्स उपलब्ध आहेत?

Google Pay: Google Pay हे Google ने विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पेमेंट अ‍ॅप्सपैकी एक आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी Google Pay चा वापर केला जाऊ शकतो.

PhonePe: PhonePe हे Flipkart द्वारे विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप भारतातील दुसरे सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट अ‍ॅप आहे. PhonePe चा वापर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो.

पेटीएम: पेटीएम हे पेटीएमने विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप भारतातील तिसरे सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट अ‍ॅप आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी पेटीएमचा वापर केला जाऊ शकतो.