मुंबई : म्युच्युअल फंड घराण्यांद्वारे घेतल्या गेलेल्या ताण चाचण्यांच्या निकालांनुसार, आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापकांनी त्यांच्या स्मॉल आणि मिड-कॅप पोर्टफोलिओचा चौथा हिस्सा विकून त्यायोगे गुंतवणुकीतून बाहेर पडणाऱ्या गुंतवणूकदारांना पैसा परत करण्यास जवळपास ३० दिवसांपर्यंत विलंबावधी लागू शकतो असे दर्शवले असल्याचे चित्र शुक्रवारी पुढे आले.

सध्याच्या पद्धतीनुसार, दोन ते तीन दिवसांत पैसे परत मिळण्याची अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांना निधीचा परतावा लांबणीवर पडू शकतो, असेच चाचण्यांचे पुढे आलेले निकाल सूचित करतात. स्मॉल- आणि मिड-कॅप समभागांच्या क्षेत्रातील अतिरिक्त चढलेल्या मूल्यांकनाबाबत चिंता व्यक्त करताना, ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पूरी बूच यांनी या विभागांत बुडबुड्याची स्थिती असल्याचा इशारा अलिकडेच दिला आहे. त्या आधीच नियामकांनी ‘ॲम्फी’द्वारे निर्धारीत निकषांआधारे फंड घराण्यांना स्मॉल तसेच मिडकॅप फंड श्रेणीत ताण चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. फंड घराण्यांनी या चाचण्या पूर्ण केल्या असून, स्मॉल-कॅप पोर्टफोलिओच्या एक चतुर्थांश भागातून बाहेर पडण्यासाठी एक दिवस ते ३० दिवसांपर्यंत आणि मिड-कॅपच्या एक चतुर्थांश भागातून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त १७ दिवस लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचा >>> ‘ई-व्ही’ धोरणाला सरकारची मान्यता; सवलतीसाठी कंपन्यांकडून किमान ५० कोटी डॉलरची गुंतवणूक आवश्यक

स्मॉल किंवा लार्ज कॅप फंडाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ४५ म्युच्युअल फंड घराण्यांनी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या संकेतस्थळांवर आणि ‘ॲम्फी’नेही तिच्या संकेतस्थळावर ताण चाचणीचे निकाल प्रकाशित केले आहेत. स्मॉल व मिड कॅप फंडांमधील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा सुरू झाला, तर प्रसंगी तरलतेला जोखीम निर्माण होईल. म्हणजेच विमोचनासाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना परत करण्याइतका पैसा जुळवणे फंड घराण्यांना अवघड ठरेल, अशा चिंतेतून नियामकांची ताण चाचणी करण्यास सुचवले आहे. जर एखाद्या समभागसंलग्न (इक्विटी) फंडाला गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यासाठी नेहमीपेक्षा दोन ते तीन दिवस जास्त वेळ लागत असेल, तर ते तुलनेने कमी तरलता असल्याचेच सूचित करते, असे ‘मॉर्निंगस्टार इंडिया’चे संशोधन व्यवस्थापक कौस्तुभ बेलापूरकर म्हणाले.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 15 March 2024: ग्राहकांना मोठा धक्का! सोन्याला पुन्हा झळाळी, आज तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं सोनं

‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, देशात सध्या २७ स्मॉल-कॅप फंड आणि २९ मिड-कॅप फंड आहेत, ज्यांच्याकडून अनुक्रमे २.४ लाख कोटी रुपये आणि २.९ लाख कोटी रुपये व्यवस्थापित केले जातात. स्मॉल-कॅप श्रेणीतील फंडांनी त्यांच्या मालमत्तेपैकी किमान ६५ स्मॉल-कॅप समभागांमध्ये गुंतवावे लागतात, उर्वरित ३५ टक्के रोख स्वरूपात किंवा लार्ज-कॅप समभागांमध्ये गुंतवण्याची त्यांना लवचिकता असते. हाच नियम मिड-कॅप फंडांनाही लागू होतो. गेल्या वर्षभरात या फंडांमधील ओघ प्रचंड वाढला आहे, पर्यायाने भांडवली बाजारात स्मॉल आणि मिड-कॅप फंडांच्या समभागांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.

ताण चाचणीचे निकाल असेही दर्शवतात की, २८,५९७ कोटी रुपये आणि २५,५३४ कोटी रुपये अशा स्मॉल कॅप फंड श्रेणीत सर्वाधिक मालमत्ता असणाऱ्या अनुक्रमे एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि एसबीआय म्युच्युअल फंडासारख्या बड्या फंड घराण्यांना, त्यांच्या फंडातील २५ टक्के मालमत्ता विकण्यास अनुक्रमे २१ दिवस आणि ३० दिवसांचा, तर ५० टक्के मालमत्ता विकण्यासाठी अनुक्रमे ४२ आणि ६० दिवस लागू शकतील. एसबीआय, निप्पॉन इंडिया तसेच कोटक म्युच्युअल फंडाने त्यांच्या स्मॉल-कॅप फंडात नवीन गुंतवणुकीचा ओघ थांबवला आहे.

निकाल काय, ताण किती?

(स्मॉल कॅप फंडातील २५ टक्के मालमत्ता विकण्यास फंड घराण्यांना लागणारा कालावधी)

एसबीआय एमएफ ३० दिवस

एचडीएफसी एमएफ २१ दिवस

टाटा एमएफ १८ दिवस

कोटक एमएफ १७ दिवस

डीएसपी एमएफ १६ दिवस

ॲक्सिस एमएफ १४ दिवस

निप्पॉन इंडिया एमएफ १३ दिवस

फ्रँकलिन इंडिया एमएफ ६ दिवस

कॅनरा रोबेको एमएफ ६.७५ दिवस