scorecardresearch

Premium

पडत्या रुपयाची नीचांकी लोळण

देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील घसरण झाल्याने रुपया अधिक कमजोर झाला आहे.

rupee, US dollar,share market, investment, world economy
पडत्या रुपयाची नीचांकी लोळण

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली असून रुपयाने ८३.३३ असा नवीन नीचांक बुधवारी नोंदविला. डॉलरमागे आणखी ९ पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच रुपयाने ८३.३५ ही नीचांकी पातळी दिवसातील व्यवहारात गाठली. भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा कायम आहे. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील घसरण झाल्याने रुपया अधिक कमजोर झाला आहे. याचबरोबर पश्चिम आशियातील भू-राजकीय अनिश्चिततेमध्ये खनिज तेलाच्या किमती वाढल्याने जगभरातील भांडवली बाजारावर त्याचे पडसाद उमटले आहेत.

हेही वाचा… निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला, ऑक्टोबरमध्ये गाठली आठ महिन्यांची नीचांकी पातळी

two dead after bike rams into divider on lalbaug flyover
मुंबईः लालबाग उड्डाणपुलावर अपघातात दोघांचा मृत्यू
Union Budget 2024 no tax on salary up to 8 lakhs
८ लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही का? बजेटमध्ये मिळू शकते आनंदाची बातमी!
The domestic capital market overtook Hong Kong capital market to rank fourth
विश्लेषण: भारतीय भांडवली बाजाराची जगात चौथ्या स्थानी झेप कशी?
motocorp entered in electric scooter market in india
Money Mantra : हिरो मोटो कॉर्पची स्कूटर क्षेत्रात का मुसंडी?

हेही वाचा… लॅपटॉप आयातीसाठी ११० कंपन्यांचे परवाने मंजूर; ॲपल, डेल, लिनोव्होसह इतर कंपन्यांचा समावेश

आंतरबँक परकीय चलन बाजारात बुधवारच्या सत्रात रुपयाने ८३.२६ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस ९ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८३.३३ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ८३.३५ पातळीपर्यंत गडगडले होते. मंगळवारच्या सत्रात रुपया ८३.२४ या पातळीवर स्थिरावले होते. जगभरात सर्वत्रच बडय़ा गुंतवणूकदारांची जोखीमयुक्त मालमत्तांमधून माघार सुरू असून, तुलनेने सुरक्षित पर्यायांकडे त्यांचा पैसा वळला आहे. परिणामी सर्वच प्रमुख जागतिक चलनांचा मूल्य ऱ्हास सुरू आहे. अमेरिकेत रोख्यांच्या परतावा दरात सुरू असलेली उसळी हे अमेरिकी डॉलरला मिळत असलेल्या मजबुतीचेच प्रतिबिंब आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rupee all time low of 83 33 against us dollar falls 9 paise print eco news asj

First published on: 02-11-2023 at 11:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×