मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात प्रचंड अस्थिरतेचा सामना करावा लागला. बँकांच्या समभागातील पडझड आणि परदेशी निधीच्या निर्गमनामुळे सलग चौथ्या सत्रात मंदीवाल्यांचा जोर कायम आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून नजीकच्या काळात दर कपातीची आशा मावळल्याने आणि देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने बाजारात मोठे चढ-उतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने सकारात्मक पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केल्यांनतर दुपारच्या सत्रात त्यात मोठी घसरण झाली. दिवसअखेर तो ४५४.६९ अंशांच्या घसरणीसह ७२,४८८.९९ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सचा दिवसभरातील उच्चांक आणि नीचांक यात १,१०७ अंशांचे अंतर होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५२.०५ अंशांची घसरण झाली आणि तो २१,९९५.८५ पातळीवर विसावला. दिवसभरात त्याने देखील २२,३२६.५० अंशांची उच्चांकी आणि २१,९६१.७० अंशांची नीचांकी पातळी गाठली.

हेही वाचा >>> नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण

What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…

जागतिक पातळीवरील संमिश्र वातावरणाचे देशांतर्गत भांडवली बाजारावर प्रतिकूल पडसाद उमटले. मध्य पूर्वेतील भौगोलिक आणि राजकीय तणाव आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची आशा कमी झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दरम्यान, गुंतवणूकदार बाजाराच्या पुढील वाटचालीसाठी सरलेल्या मार्च तिमाहीतील कंपन्यांच्या कामगिरीकडे बारकाईने निरीक्षण करतील, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये नेस्लेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ टायटन कंपनी, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, आयटीसी, टेक महिंद्र, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग पिछाडीवर होते. तर भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, इन्फोसिस आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग तेजीसह स्थिरावले.

सेन्सेक्स ७२,४८८.९९ -४५४.६९ (-०.६२%)

निफ्टी २१,९९५.८५ -१५२.०५ (-०.६९%)

डॉलर ८३.५५ -६ तेल ८६.७४ -०.६३