देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती रविवारी तिरुपती बालाजीच्या मंदिरात पोहोचले. मूर्ती दाम्पत्याने येथे सोन्याचा ‘अभिषेक शंख’ आणि ‘कासव’ दान केले. या दोघांचे वजन सुमारे २ किलो आहे. नारायण मूर्तींनी सपत्नीक तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य ई.ओ. धर्मा रेड्डी यांच्याकडे ‘अभिषेक शंख’ आणि ‘कासव’ सुपूर्द केले. या खास प्रसंगी दोघेही मंदिराच्या रंगनायकुला मंडपममध्ये गेले होते. सुधा मूर्ती यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या सदस्या होत्या. खरं तर हे दान विशेष का आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे? हे जाणून घेणार आहोत.

दान केलेले ‘शंख’ आणि ‘कासव’ कसे दिसतात?

मूर्ती दाम्पत्याने दान केलेल्या ‘अभिषेक शंखा’ची खास रचना करण्यात आली आहे. तो एका बाजूने उघडा आहे. याशिवाय ‘कूर्म’ अर्थात कासवही दान केले आहे. या दोन्हींचा उपयोग स्वामी अम्मावारांच्या ‘अभिषेका’त होतो. कूर्माचा पाठीचा भाग रिकामा ठेवण्यात आला आहे, जो शंख ठेवून भरला जातो. मूर्ती दाम्पत्याच्या या दानाला ‘भुरी’ दान असेही म्हणतात.

हेही वाचाः देशातील सर्वात मोठ्या बँकेचा नफा ११,९५१ कोटींवर पोहोचला, ‘असा’ मिळणार फायदा

किंमत सुमारे १.२५ कोटी?

बाजारमूल्यानुसार ‘शंख’ आणि ‘कूर्म’ची किंमत सुमारे १.२५ कोटी रुपये आहे. सध्या बाजारात सोन्याची सरासरी किंमत ६१,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे. त्यानुसार २ किलो सोन्याची किंमत अंदाजे १.२५ कोटी रुपये आहे.

हेही वाचाः Money Mantra : तुम्ही चुकीच्या UPI पत्त्यावर पैसे पाठवलेत का? परत मिळवण्यासाठी काय कराल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुनी परंपरा आणि दानाचे महत्त्व

तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात प्राचीन काळापासून राजे आणि महाराजे सोने, रोकड आणि जमीन दान करीत आले आहेत. सध्याही लोक या मंदिरात सोने, रत्ने, दागिने इत्यादी दान करतात. विशेष म्हणजे मोठे नेते, अभिनेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी या मंदिरात आवर्जून जातात. असं म्हणतात की, अशा दानाने भगवान व्यंकटेश त्यांच्या समस्या सोडवतात.