Who Is Maya Tata : टाटा समूहाचे कामकाज देशभर तसेच परदेशात विस्तारलेले आहे. टाटा समूहाचा हा व्यवसाय आता पुढच्या पिढीकडे सोपवला जात आहे. या पिढीमध्ये माया टाटा यांचाही समावेश आहे, ज्यांच्याबद्दल तुम्हाला फारसे माहिती नसेल. तर त्या रतन टाटा यांची सावत्र भाची असून, सिमोना टाटा यांची नात आहे.

रतन टाटा यांची सावत्र भाची माया टाटा ३४ वर्षांची असून, कायमच प्रसिद्धीच्या झोतात असते. अलीकडेच माया टाटा यांना टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्ड मेंबर म्हणून लिआ आणि नेव्हिल या भावंडांसह सामील करण्यात आले आहे. अब्जावधी डॉलर्सचा डोलारा सांभाळण्यासाठी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा त्यांना तयार करीत आहेत.

माया टाटा कोण आहेत?

रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची माया ही मुलगी असून, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची बहीण आलू मिस्त्री यांच्या पोटी माया टाटा यांचा जन्म झाला. माया टाटा या नवल टाटा आणि त्यांची पत्नी सिमोन टाटा यांची नात आहे. लॅक्मे आणि ट्रेंटच्या स्थापनेत त्यांची आजी सिमोना टाटा यांची प्रमुख भूमिका होती.

शिक्षण आणि व्यवसाय किती?

माया टाटा यांनी यूकेमधील बेयस बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विक आपले शिक्षण पूर्ण केले आहे. टाटा कॅपिटलची उपकंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडात सामील होऊन त्यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला. माया टाटा यांनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदारांशी संबंधित व्यवसायातील त्यांच्या कौशल्यांची झलक दाखवली आहे, ज्यामुळे कॉर्पोरेट जगाच्या जटिल गतिशीलतेबद्दल त्यांची समज अधिक मजबूत झाली आहे.

टाटा डिजिटलमध्ये व्यवसाय

टाटा अपॉर्च्युनिटीज फंड बंद झाल्यानंतर माया यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. यानंतर त्यांनी टाटा समूहाची उपकंपनी टाटा डिजिटल जॉईन केली. एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली समूहाने टाटा डिजिटलच्या प्रयत्नांसाठी १००० कोटी रुपयांची भरीव रकमेची वाटप केली होती. Tata Digital बरोबर माया टाटा यांचा संबंध आल्यापासून टाटा समूहानं नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. विशेष म्हणजे ते वापरकर्त्यांना एक वेगळा अनुभव देते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मायाचे आजोबा, पालोनजी शापूरजी मिस्त्री /स्रोत: ब्लूमबर्ग

रतन टाटांचं मिळालं मार्गदर्शन

टाटा समूहातील माया टाटांच्या उदयाला सावत्र काका रतन टाटा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. माया टाटा यांना रतन टाटा यांनी टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डावर, त्यांची भावंडं लिआ आणि नेव्हिल यांच्यासह समाविष्ट केले आहे.