केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यातील घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर उणे ०.५२ टक्के होता. गेल्या पाच महिन्यांपासून तो नकारात्मक राहिला आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमतीतही वाढ दिसून आली. घाऊक किंमत निर्देशांक (WIP) आधारित चलनवाढीचा दर एप्रिलपासून नकारात्मक आहे आणि जुलैमध्ये तो उणे (-)१.३६ टक्के राहिला. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये तो १२.४८ टक्के होता. जर घाऊक महागाई दर खाली आला, तर ते महागाईपासून दिलासा मिळत असल्याचे संकेत समजले जातात.

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये उणे १.३६ टक्क्यांनी घसरल्यानंतर भारतातील घाऊक महागाई ऑगस्टमध्ये उणे ०.५२ टक्क्यांवर राहिली आहे. घाऊक महागाईचे आकडे सलग पाच महिन्यांपासून नकारात्मक पातळीवर दिसत आहेत. रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणात, अर्थशास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की, ऑगस्टमध्ये WPI शून्यापेक्षा ०.६ टक्के कमी असू शकतो. जूनमध्ये घाऊक महागाई दर (-) ४.१२ टक्के होता, जो मेमध्ये (-) ३.४८ टक्के आणि एप्रिलमध्ये (-) ०.७९ टक्के होता.

महागाई दर किती?

ऑगस्टमध्ये इंधन आणि विजेची महागाई उणे (-) ६.०३ टक्के होती. जुलैमध्ये तो उणे (-)१२.७९ टक्के होता. उत्पादित उत्पादनांचा महागाई दर उणे (-) २.३७ टक्के होता, तर जुलैमध्ये तो उणे (-) २.५१ टक्के होता. भाजीपाल्याच्या किमती नरमल्याने किरकोळ महागाई ७ टक्क्यांवरून ६.८३ टक्क्यांवर आली आहे. किरकोळ महागाई अजूनही आरबीआयनं ठरवलेल्या पातळीपेक्षा खाली आहे. दोन्ही बाजूंनी २ टक्के फरकाने चलनवाढ वाढल्याचं गृहीत धरले तरी ती ४ टक्के राहील, याची खात्री करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

RBI MPC बैठकीत काय ठरलं?

गेल्या महिन्यात आपल्या सलग तिसऱ्या बैठकीत RBI ने प्रमुख व्याजदर म्हणजेच रेपो दर ६.५ टक्क्यांवर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे महागाई वाढली तर आरबीआयने कठोर धोरणाचे संकेत दिलेत.चलनविषयक धोरण तयार करण्यासाठी केंद्रीय बँक किरकोळ किंवा ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ लक्षात घेते. ऑगस्टमधील किरकोळ महागाईचा आकडा ६.८३ टक्क्यांवर आला आहे, जो जुलैमधील ७.४४ टक्क्यांवरून खाली आला आहे.