आजच्या काळात क्वचितच अशी व्यक्ती असेल, ज्याचे बँक खाते नाही. नोकरदार लोकांकडे वेतन खाती असतात, तर घरगुती लोकांकडे बचत खाती असतात. प्रत्येक जण आपल्या कष्टाने कमावलेला पैसा बँकांमध्ये जमा करतो, जेणेकरून हा पैसा वेळेप्रसंगी उपयोगी पडेल. पण कधी कधी असे घडते की बँकच बुडते. अशा परिस्थितीत ठेवीदाराच्या अडचणी वाढतात आणि त्याचे पैसे बुडतात. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण RBI ने देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहणार आहेत.

‘या’ सर्वात सुरक्षित बँका आहेत

या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँकेने डोमेस्टिक सिस्टमली इम्पॉर्टंट बँक्स २०२२ च्या नावाने एक यादी जारी केली आहे, म्हणजेच देशांतर्गत व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या बँकांची ओळख पटवून दिली आहे. या यादीत देशातील सर्वात सुरक्षित बँकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. RBI ने जाहीर केलेल्या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत एक सरकारी आणि २ खासगी बँकांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाव आहे. याशिवाय २ खासगी क्षेत्रातील बँकांचा या यादीत समावेश आहे. यामध्ये एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या नावांचा समावेश आहे.

हेही वाचाः भारतीय गुंतवणूकदारांच्या जोरावर शेअर बाजार आत्मनिर्भर

डी-एसआयबी म्हणजे काय?

RBI ने SBI, ICICI आणि HDFC अशा तीन बँकांना D-SIB यादीत ठेवले आहे. डी-एसआयबी ही तांत्रिकदृष्ट्या देशांतर्गत प्रणालीतील महत्त्वाची बँक असते. म्हणजे ज्या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की, त्या बुडणे सरकारला परवडणारे नाही. कारण त्यांच्या बुडण्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे आर्थिक संकट आणि दहशतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. २००८ च्या आर्थिक मंदीनंतर बँकांना डी-एसआयबी म्हणून घोषित करण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर अनेक देशांच्या अनेक मोठ्या बँका बुडाल्या, त्यामुळे आर्थिक संकटाची स्थिती दीर्घकाळ राहिली. २०१५ पासून RBI दरवर्षी D-SIB ची यादी आणते. २०१५ आणि २०१६ मध्ये फक्त SBI आणि ICICI बँक D-SIB होते. २०१७ पासून या यादीत एचडीएफसीचाही समावेश करण्यात आला होता.

हेही वाचाः टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार; जानेवारीमध्ये घोषणा होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील वर्षी बँका ८१ दिवस बंद राहणार आहेत

RBI ने नवीन वर्षात बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वर्षभरात एकूण ८१ दिवस बँका बंद राहणार आहेत. यापैकी काही दिवस, बँका फक्त काही विशिष्ट राज्यांमध्येच लॉक राहतील, अन्यथा बँकेचे कामकाज सुरळीत चालू राहील. आरबीआयने शनिवार आणि रविवार वगळता इतर सणांना लक्षात घेऊन सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.