ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोसाठी चुकीचे अन्न वितरण करणे महागात पडले आहे. जोधपूरच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने झोमॅटो आणि मॅकडोनाल्डला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.

काय प्रकरण आहे?

Zomato ने व्हेज फूडऐवजी नॉनव्हेज फूड ग्राहकाला डिलिव्हर्ड केले, त्यानंतर जोधपूरच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाने हा आदेश दिला. झोमॅटोने आपल्या नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनी आता ग्राहक विवाद निवारण मंचाच्या या आदेशाविरुद्ध न्यायालयात अपील दाखल करेल.

या आधारे दंड आकारण्यात आला

जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच (II) जोधपूरने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे उल्लंघन केल्याबद्दल झोमॅटो आणि झोमॅटोचे रेस्टॉरंट भागीदार मॅकडोनाल्ड यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि न्यायालयीन खर्च म्हणून ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचाः पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता; पेट्रोलियम मंत्र्यांनी आता का केले ‘हे’ विधान?

Zomato न्यायालयात अपील दाखल करणार

झोमॅटोचे म्हणणे आहे की, कंपनी ग्राहक मंचाच्या या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याच्याकडे योग्यतेच्या आधारावर एक चांगले प्रकरण आहे, असाही झोमॅटोला विश्वास आहे.

हेही वाचाः इन्फोसिसने १८ रुपयांचा लाभांश केला जारी, ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तींच्या संपत्तीत १३८ कोटींची वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Zomato काय युक्तिवाद करणार?

या प्रकरणी झोमॅटोचा युक्तिवाद असा आहे की, झोमॅटो खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी केवळ एक सुविधा देणारा पार्टनर आहे. ऑर्डरमधील कोणतीही कमतरता, चुकीच्या ऑर्डरची डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट पार्टनर सेवेच्या बाबतीतील गुणवत्तेला संबंधित रेस्टॉरंट जबाबदार आहे.