बुधवारी भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत बदल होताना दिसत आहेत. दहा ग्रॅम सोने ११० रुपयांनी स्वस्त होऊन ५८,७४० रुपये झाले आहे. एक किलो चांदीचा दर वाढला असून, तो आता ७०,१०० रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ११० रुपयांनी घसरून ५८,७४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५८,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज चांदीचा भाव काय?

मात्र, चांदीचा भाव ३५० रुपयांनी वाढून ७०,१०० रुपये किलो झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, “दिल्ली बाजारात स्पॉट सोन्याचे भाव ११० रुपयांनी घसरून ५८,७४० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत.”

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rate today gold became cheaper by 110 rupees know the price of tola 29 march 2023 vrd
First published on: 29-03-2023 at 19:47 IST