बँका आणि वित्तीय संस्थांच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत गेल्या आठ वर्षांत ४०.८२ कोटी लाभार्थ्यांना २३.२ लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत. ही योजना सुरू होऊन आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने ही माहिती दिली. केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१५ रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. यामध्ये सरकारकडून काहीही तारण न ठेवता व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने छोटे व्यापारी आणि बिगर कॉर्पोरेट्सना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पीएमएमवाय अंतर्गत कर्ज हे बँका, वित्तीय संस्था जसे की, एनबीएफसी आणि मायक्रोफायनान्स संस्थांद्वारे दिले जात आहेत.

६८ टक्के कर्ज महिलांना

PMMY मधील सुमारे ६८ टक्के कर्जे महिला उद्योजकांना देण्यात आली आहेत आणि योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली ५१ टक्के खाती SC/ST आणि OBC श्रेणीतील उद्योजकांची आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले की, गेल्या आठ वर्षांत प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ४०.८२ कोटी लाभार्थ्यांना २३.२ लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत. देशाच्या नवउद्योजकांना कर्जाची सहज उपलब्धता व्हावी म्हणून नावीन्य आणि दरडोई उत्पन्नात सतत वाढ होत असल्याचे यावरून दिसून येते. ते पुढे म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME)चे मोठे योगदान आहे. त्यांच्या विकासामुळे देशांतर्गत वापरासाठी तसेच निर्यातीसाठी उत्पादनात वाढ झाली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पीएमएमवाय योजनेतून मोठा पाठिंबा मिळाला आहे.

हेही वाचाः तुमच्या मुलीसाठी २१ वर्षांत बनवा ४१ लाखांचा निधी, नेमकी योजना काय?

कर्ज कसे घेता येणार?

छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत बँका शिशू (रु. ५०,००० पर्यंत), किशोर (५०,००० ते रु. ५ लाख दरम्यान) आणि तरुण (१० लाख रु.) अशा तीन श्रेणींमध्ये कर्जे देतात. एकूण वितरित कर्जापैकी ८३ टक्के शिशूसाठी, १५ टक्के किशोरसाठी आणि उर्वरित २ टक्के तरुणांसाठी आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत अर्ज करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः ICICI-Videocon Fraud Case : सीबीआयची चंदा-दीपक कोचर यांच्यावर कडक कारवाई, पहिले आरोपपत्र दाखल