१ एप्रिल रोजी म्हणजे आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ९२ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २०२८ रुपयांवर आला आहे. परंतु घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. १४.२ किलो गॅस सिलिंडरचा दर गेल्या महिन्याइतकाच आहे.

गेल्या महिन्यात भाव वाढले होते

यापूर्वी १ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३५०.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर तो दिल्लीत २११९.५० रुपयांवर पोहोचला होता. तसेच १४.२ किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत त्याची किंमत ११०३ रुपये झाली आहे.

Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा

जून २०२० पासून अनुदान (subsidy) बंद

जून २०२० पासून बहुतांश लोकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. आता उज्ज्वला योजनेंतर्गत ज्यांना सिलिंडर देण्यात आले आहेत, त्यांनाच २०० रुपये अनुदान मिळते. यासाठी सरकार सुमारे ६,१०० कोटी रुपये खर्च करीत आहे. जून २०२० मध्ये दिल्लीत विनाअनुदानित सिलिंडर ५९३ रुपयांना उपलब्ध होता, जो आता ११०३ रुपयांपर्यंत वाढला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही

आज म्हणजेच १ एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जवळपास नऊ महिन्यांपासून दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आहे, तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.