मुंबई : निर्देशांकात वजन राखणाऱ्या निराशाजनक तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात मोठी घसरण झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शुक्रवारच्या सत्रात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. परिणामी सलग सहा सत्रातील तेजीला खीळ बसल्याने निफ्टीचे २० हजार अंशांच्या पातळीचे स्वप्न भंगले.

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८८७.६४ अंशांनी (१.३१ टक्के) घसरून ६६,६८४.२६ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने १,०३८.१६ अंशांची गटांगळी घेत ६६,५३३.७४ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २३४.१५ अंशांची (१.१७ टक्के) घसरण झाली आणि तो १९,७४५ पातळीवर स्थिरावला. निफ्टीमधील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी ३६ कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले.

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
Sensex Hits Record, High, 75 thousands Points, Nifty Touches 22753 Points, sensex nifty high, share market, stock market, finance, finance knowledge, finance article, share market high, stoke markte high, marathi news,
सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसची तिमाही कामगिरी असमाधानकारक आल्याने समभागात ८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. शिवाय जागतिक स्तरावरील अनिश्चित परिस्थितीमुळे ग्राहकांनी निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे आर्थिक वर्ष २०२४ मधील वाढीचा दृष्टिकोन देखील खाली आणला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या तिमाही महसुलातील (वार्षिक तुलनेत) अवघी ६ टक्क्यांची वाढ ही बाजाराच्या अपेक्षेपेक्षा खूप राहिली. परिणामी इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या कमकुवत कामगिरीचे नकारात्मक पडसाद बाजारावर उमटले. ज्यामुळे निफ्टीला २०,००० अंशांची पातळी गाठता आली नाही. इतर वजनदार कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याने बाजारातील घसरण अधिक वाढली, असे निरीक्षण जिओजित सर्व्हिसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या समभागात घसरण झाली. त्यापाठोपाठ हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो आणि टेक महिंद्राचे समभाग देखील नकारात्मक पातळीवर बंद झाले. दुसरीकडे, बुलेट ट्रेन प्रकल्पाचे ७,००० कोटी रुपयांचे कंत्राट मिळालेल्या आणि लवकर समभाग पुनर्खरेदी योजना राबविण्यासह भागधारकांना विशेष लाभांश देणे अपेक्षित असलेल्या लार्सन अँड टुब्रोच्या समभागाने ३.८८ टक्क्यांची उसळी घेतली. त्यापाठोपाठ एनटीपीसी, स्टेट बँक, कोटक महिंद्र बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, मारुती आणि भारती एअरटेल यांचे समभाग तेजीत होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारच्या सत्रात ३,३७०.९० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स ६६,६८४.२६ -८८७.६४ (-१.३१ टक्के)

निफ्टी १९,७४५ -२३४.१५ (-१.१७ टक्के)

डॉलर ८१.९७ ४ तेल ८०.५९ १.१९