शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर यश मिळवून देणारे शेअर या क्षेत्रात पाहायला मिळतात. सकाळी उठल्यापासून लागणाऱ्या टूथपेस्ट आणि गरमागरम चहा इथपासून ते रात्री झोपताना लावल्या जाणाऱ्या डास पळवणाऱ्या यंत्रापर्यंत सगळ्या गोष्टींचा या क्षेत्रात समावेश होतो. ढोबळमानाने या क्षेत्राचे चार उपप्रकार करता येतील. खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ यामध्ये बेकरी उत्पादने, फरसाण, चहा, कॉफी, सरबत, एनर्जी ड्रिंक, चॉकलेट सर्व प्रकारचे डेअरी पदार्थ येतात. दुसरा उपप्रकार वैयक्तिक वापराच्या वस्तू; यामध्ये दंतमंजन, शाम्पू, सौंदर्यप्रसाधने, केसाचा कलप, सुगंधी द्रव्य, आंघोळीचा साबण, चेहरा धुण्यासाठी फेस वॉश या प्रमुख वस्तू येतात.

तिसरा उपप्रकार आरोग्याशी निगडित वस्तू; यामध्ये बँडएड, निर्जंतुक करण्याची रसायने यांचा समावेश होतो. गृहोपयोगी वस्तू हा या क्षेत्रातील नव्याने उदयाला आलेला व्यवसाय प्रकार आहे. स्वयंपाकघर आणि त्याच्याशी संबंधित स्वच्छतेची उपकरणे, भांडी घासण्याचा साबण/ लिक्विड जेल, सफाईची उपकरणे हे बदलत्या जीवनशैलीमुळे नव्याने दाखल झालेले उत्पादन प्रकार आहेत.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
State Bank of India fraud
तुमचंही SBI बँकेत अकाऊंट आहे का? मग जाणून घ्या एसबीआयनं दिलेली महत्त्वाची माहिती; अन्यथा क्षणात अकाउंट रिकामे
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
My Portfolio Phoenix Mills Ltd
माझा पोर्टफोलियो : फिनिक्स मिल्स लिमिटेड
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
sensex gains 335 degrees on muhurat trading day
Muhurat Trading Day: सवंत्सर २०८१ बक्कळ लाभाचे… मुहूर्ताला सेन्सेक्सची ३३५ अंशांची कमाई

हेही वाचा…अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती

व्यवसाय यशस्वी होण्याचे गणित कसे?

या क्षेत्रात कोणतीही मोठी कंपनी असली तरीही अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचून सातत्यपूर्ण विक्री करत राहणे हाच मूलमंत्र आहे. व्यवसाय फायदा टिकवून ठेवायचा असेल तर नफ्यात आणि विक्रीत सतत वाढ झाली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे उत्पादन खर्च आटोक्यात ठेवता आला पाहिजे. या क्षेत्रातील स्पर्धकांबरोबर व्यवसाय करताना टिकून राहायचे असल्यास जोरदार जाहिरातबाजीदेखील करायला हवी आणि हे सर्व खर्च वजा जाता कंपनीला नफा झाला तरच गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होईल.

भारतातील ‘एफएमसीजी’ व्यवसायाच्या वाढीमागील प्रमुख कारणे

ई-कॉमर्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्राबल्यामुळे या क्षेत्राला सुगीचे दिवस यायला सुरुवात झाली. एका ठरावीक साच्यातील उत्पादनांपेक्षा नावीन्यपूर्ण उत्पादने विकण्याकडे कंपन्यांचा कल दिसतो आहे. वेगाने होणारे नागरीकरण हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. बदलत्या जीवनशैली, मध्यमवर्गाचे वाढलेले उत्पन्न आणि त्याची खर्चीक प्रवृत्ती या क्षेत्रासाठी वरदानच ठरणार आहे. हे क्षेत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि नागरी अर्थव्यवस्था जोडण्यास मदत करते. कृषी क्षेत्रातून तयार झालेल्या मालावर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादने तयार केली जातात. फक्त बिस्कीट हे एक उत्पादन विचारात घेतले तर त्यात किमान दहा प्रकार असतात. ही यादी सर्वच उत्पादनांच्या बाबतीत मोठी आहे. पॅकबंद वस्तू विकत घेणे हा बाजारातील कल लक्षात घेऊन फळांच्या तयार रसांपासून दुग्धजन्य पदार्थांपर्यंत वस्तू तयार करण्याकडे कंपन्यांचा कल दिसतो आहे.

हेही वाचा…बाजारातली माणसं : प्रवाहाविरुद्ध जाणारा निधी व्यवस्थापक – अँथनी बोल्टन

‘जीएसटी’च्या अंमलबजावणीनंतर या क्षेत्रात अधिकाधिक नोंदणीकृत व्यवसायांचा सहभाग वाढू लागला. ठरावीक दोन-चार ठिकाणांपुरते उत्पादन मर्यादित न राहता भारताच्या कानाकोपऱ्यातून या क्षेत्रातील कंपन्यांना उत्पादने तयार करून किंवा प्रक्रिया करून पुरवली जातात. संघटित किरकोळ क्षेत्रात प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक आणण्याच्या योजनेमुळे बाजारात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या क्षेत्रात किती संधी आहेत याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे, अमूल कंपनीने गुजरातपासून सुरुवात करून जवळपास अर्ध्या भारतात आपले दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे व्यवसायक्षेत्र विकसित केले आहे. या कंपनीची उत्पादने ५० देशांत निर्यात होतात.

व्यवसायाला सदैव सुकाळ

या क्षेत्राला मिळालेले वरदान म्हणजे परिस्थिती कोणतीही असो या क्षेत्रातील कंपनीने बनवलेल्या वस्तू वापरण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो, त्या जीवनावश्यक असल्यामुळे व्यवसायाची खात्री बाळगता येते. या क्षेत्राच्या यशामागील आणखी एक रहस्य म्हणजे व्यवसायाला ‘काळाचे बंधन नाही’. यंत्रांची देखभाल करण्याचा दिवस सोडला, तर प्रत्येक दिवशी कारखान्याला उत्पादन करावे लागते. बाजारात आपले उत्पादन सतत ग्राहकापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी विक्री करणाऱ्या यंत्रणेला काम करावे लागते. आपण आपल्या ‘लक्षित ग्राहक समूहा’पर्यंत पोहोचतो आहे की नाही ? याचा अभ्यास करण्यासाठी संशोधनसुद्धा करावे लागते. तरच नावीन्यपूर्ण उत्पादने जन्माला येऊ शकतात. उत्पादने तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल परदेशातून आयात केला जात असेल तर त्यामध्ये सातत्य राखणे हे कौशल्याचे काम असते.

हेही वाचा…तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?

गुंतवणूकदारांनी या क्षेत्राचा अभ्यास करताना आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे तिमाही निकालांची आकडेवारी न चुकता तपासायला हवी. भारतातील सुगीचा काळ अपेक्षित मान्सूनवर अवलंबून असतो. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा शेती हा आधार आहे. पाऊस चांगला झाला आणि पीकपाणी चांगले आले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहतो. याचा थेट फायदा एफएमसीजी कंपन्यांना होतो. त्याचप्रमाणे वर्षभरात, सणासुदीच्या काळात कौटुंबिक खर्च मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्यातही सप्टेंबर ते जानेवारी हा काळ या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. यामुळे कंपन्यांच्या विक्री आणि नफ्याची आकडेवारी बदलत असते, याचा पद्धतशीर अभ्यास करून शेअर विकत घेतले तर एफएमसीजी कंपन्यांमध्ये कमी कालावधीसाठी गुंतवणूक करून फायदा मिळवता येतो मात्र यासाठी ‘चार्ट’चे तंत्र अवगत असणेसुद्धा आवश्यक आहे.

गेल्या वीस वर्षांत भारतातील मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग या श्रेणीतील लोकसंख्या वाढताना दिसते. ग्रामीण भागाकडून शहरी भागात स्थलांतरित झालेल्या कुटुंबाची जीवनशैली अधिक खर्चीक प्रकारची असते. त्यातही संयुक्त कुटुंब पद्धतीपेक्षा तीन किंवा चार जणांचे छोटे कुटुंब असण्याचा कल वाढतो आहे. या संदर्भात एफएमसीजी उद्योग पडताळून पाहिल्यास जेवढे खर्च करण्याची प्रवृत्ती असलेले आणि इच्छा असलेले ग्राहक अधिक, तेवढीच कंपन्यांसाठी व्यवसाय संधी अधिक हे गणित स्पष्ट होईल.

हेही वाचा…Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात

एका खासगी संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या काळात भारतातील एफएमसीजी उद्योगाने सर्वाधिक विक्रीचा आकडा नोंदवला व या व्यवसायात होणारी वाढ युरोप आणि अमेरिकेतील याच क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढीपेक्षा अधिक आहे हे महत्त्वाचे. भारत ही सर्वच कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे याकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे.

हेही वाचा…भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण

निफ्टी एफएमसीजी या निर्देशांकामध्ये आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, इमामी, मॅरिको, युनायटेड ब्रुअरी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, ब्रिटानिया, कोलगेट, डाबर, गोदरेज कन्झ्युमर, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट, नेस्ले, युनायटेड स्पिरिट, वरुण बेव्हरेजेस या कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांविषयी व बाजारातील गुंतवणूकसंधीविषयी पुढील आठवड्याच्या लेखात अधिक माहिती घेऊ या.