scorecardresearch

Premium

माझा पोर्टफोलिओ : ‘एमडीएफ’च्या उभरत्या बाजारपेठेसाठी दावेदारी

ग्रीनप्लाय भारतातील एमडीएफ बोर्डाची सर्वात मोठी उत्पादक असून आशियातील तिसरी सर्वात मोठी आणि जगातील पाचवी मोठी उत्पादक कंपनी आहे.

Green panel Industries
माझा पोर्टफोलिओ : ‘एमडीएफ’च्या उभरत्या बाजारपेठेसाठी दावेदारी (image – financial express)

ग्रीनपॅनल इंडस्ट्रीज लिमिटेड
(बीएसई कोड – ५४२८५७)
प्रवर्तक: शिव प्रकाश मित्तल

बाजारभाव: रु.३२३ /-

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : प्लायवूड/एमडीएफ

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२.२६ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५३.०९

परदेशी गुंतवणूकदार ४.४३
बँक / म्युच्युअल फंड/ सरकार २१.१८

इतर/ जनता २१.३०
पुस्तकी मूल्य: रु. ९७.४

दर्शनी मूल्य: रु.१/-

लाभांश: १५०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. २०.९
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १५.७

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.३
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १९.१
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (आरओसीई): २७.१

बीटा : ०.९
बाजार भांडवल: रु. ३,९६१कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५४०/२५५

पाच वर्षांपूर्वी ग्रीनप्लाय इंडस्ट्रीजचे विलीनीकरण झाल्यानंतर प्रस्थापित झालेली ग्रीनपॅनल इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी वूड पॅनल उत्पादक कंपनी आहे. ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज प्लायवूड तसेच एमडीएफ (मध्यम घनता फायबर बोर्ड) आणि संबंधित उत्पादनांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये एमडीएफव्यतिरिक्त डेकोरेटिव्ह लाकडी मजले, प्लायवूड, लिबास, फ्लोरिंग आणि दरवाजे यांचा समावेश होतो. कंपनीच्या महसुलात बोर्ड आणि संबंधित उत्पादने ८० टक्के तर प्लायवूड विभागाचा २० टक्के महसूल आहे. ग्रीनप्लाय भारतातील एमडीएफ बोर्डाची सर्वात मोठी उत्पादक असून आशियातील तिसरी सर्वात मोठी आणि जगातील पाचवी मोठी उत्पादक कंपनी आहे.

हेही वाचा – निर्देशांकांची १ टक्क्याची उसळी; सेन्सेक्समध्ये ६३० अंशांची तेजी

एमडीएफ कंपनीचा देशांतर्गत बाजार हिस्सा ३० टक्के आहे. कंपनीचा एमडीएफ व्यवसाय २०१० पासून चालू असून ग्रीनप्लाय भारतातील सर्वात जुनी आणि अनुभवी एमडीएफ उत्पादक आहे. कंपनी संपूर्ण देशभरात २,५३५ वितरक आणि १२,५०० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांसह कार्यरत आहे. कंपनीच्या भारतातील १७ शाखांद्वारे उत्पादन सेवा दिली जाते. कंपनीची केवळ एक उपकंपनी आहे. ग्रीनप्लाय सिंगापूर पीटीई लि. कंपनीच्या उत्पादनाच्या निर्यातीसाठी उपकंपनी कमिशन एजंट म्हणून काम करते.

सध्या, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये वार्षिक ५,८८,००० क्युबिक मीटर्स क्षमतेसह तीन अद्ययावत उत्पादन सुविधा आहेत. कंपनीची प्लायवूड उत्पादनाची वार्षिक क्षमता ११ दशलक्ष चौ. मीटर आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा एमडीएफ आणि प्लायवूड या दोन्ही विभागांसाठी क्षमता वापर अनुक्रमे ८१ टक्के आणि ९० टक्के होता. यंदाच्या आर्थिक वर्षांत एमडीएफ विभागाची क्षमता ६,६०,००० क्युबिक मीटर्सपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. कंपनीच्या उलाढालीत मार्च २०२३ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात १५.४ टक्के वाढ होऊन ती १,७८३ कोटींवर पोहोचली आहे. तर नक्त नफ्यात केवळ ५ टक्के वाढ होऊन तो २५२ कोटी झाला झाला.

हेही वाचा – जागतिक व्यापारातील भारताचा निर्यात टक्का घसरला; औषध निर्माण, रत्न-आभूषणे, चामडे, पादत्राणे क्षेत्रात पीछेहाट

मार्च २०२३ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीशी तुलना करता फारशी समाधानकारक नाही. मार्च तिमाहीत कंपनीने ४४१ कोटी (६ टक्के घसरण) रुपयांच्या उलाढालीवर ६९ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला आहे. तो गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, यंदाच्या निर्यातीत झालेली मोठी घसरण, लाकडाच्या वाढत्या किमती तसेच वाढत्या ब्रँड खर्चामुळे नफ्याचे मार्जिन २२ टक्क्यांनी खाली आले आहे. मात्र परवडणाऱ्या घरांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ आणि त्याला मिळणारे अनुदान तसेच झटपट निर्मिती होणाऱ्या होम फर्निचरची वाढती मागणी पाहता यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या उलाढालीत वाढ होऊन भरीव कामगिरीची अपेक्षा करता येईल. ग्रीनपॅनेल एमडीएफ उत्पादनांतील आघाडीची कंपनी असून यंदा उत्पादन वाढून ती वाढीव मार्जिन राखू शकेल. वर्षभरात हा शेअर २०-२५ टक्के परतावा देऊ शकेल. सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

(Stocksandwealth@gmail.com)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Green panel industries is engaged in the manufacture of plywood as well as mdf and related products print eco news ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×