या स्तंभातील ८ एप्रिलच्या लेखात मंदीचे सूतोवाच केले होते, त्या वेळच्या तेजीच्या वातावरणातील हर्षोन्मादात त्या वेळेला मंदीचे भाकीत करणे म्हणजे ‘दुधात मिठाचा खडा पडल्यागत सर्वांना वाटत होते. पण १० एप्रिलनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील इस्रायल-इराण युद्धामुळे निफ्टी निर्देशांकावर १० एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत निफ्टीमध्ये २२,७७५ ते २१,७७७ अशी ९९८ अंशांची दातखिळी बसवणारी घसरण अल्पावाधीत झाल्याने, तेजीच्या पंचपक्वान्नाच्या ताटातील इतर खाद्यपदार्थ इस्रायल-इराणच्या भडक्याने फोडणी करपली. खाद्यपदार्थ बेचव झाल्याने पंचपक्वान्नाच्या जेवणाची मजाच निघून गेली. या घातक उतारामुळे आता तेजीला पूर्णविराम मिळणार की स्वल्पविराम, की बाजार मंदीच्या गर्तेत जाणार हा आजचा कळीचा प्रश्न आहे. याचे विस्तृत उत्तर जाणून घेण्याअगोदर निर्देशांकाचा सरलेल्या सप्ताहातील साप्ताहिक बंद जाणून घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव :

Rural Medical Center, transfer a organization from old to new generation, daughter in law, mother in law,
सांधा बदलताना : हस्तांतरण..
karad city police nabbed a gang of five who were preparing to carry out robbery
सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; एका माजी नगरसेवकाच्या खूनाचाही होता प्लॅन?
young man was brutally beaten in Kalyan due to dispute over teasing on Instagram
इन्स्टाग्रामवर चिडविल्याच्या वादातून कल्याणमध्ये तरूणाला बेदम मारहाण
Akshaya Tritiya, gold, price,
अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर
health of citizens is in danger Defeat ban order of municipality on wrapping food items in waste paper
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ
Labor, died, Kalyan East,
पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून कल्याण पूर्वेत मजुराचा खून
Valsad in the south, the tribal region in Gujarat
नळ आहेत पण पाणी नाही; कुठे आहे ही परिस्थिती?
Nagpur, Kunal, murde, alcohol,
नागपूर : मित्रांनी दारूच्या वादातून केली कुणालची हत्या.. वानाडोंगरीतील घटनेचा अखेर उलगडा

सेन्सेक्स: ७३,०८८.३३
निफ्टी:२२,१४७.००

आता मंदीची व्याप्ती समजून घेण्यासाठी जेव्हा मंदीचा लवलेशही नव्हता अशा वेळच्या गेल्या लेखातील काही वाक्यांचा आधार घेऊया. निसर्गनियमाप्रमाणे, सूर्योदयानंतर सूर्यास्त, भरतीनंतर ओहोटी त्याप्रमाणे तेजीनंतर मंदी. निफ्टी निर्देशांकावर २२,८०० ते २३,४०० हा तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा असून, २२,८०० ते २३,४०० च्या दरम्यान दुहेरी अथवा तिहेरी उच्चांक (डबल, ट्रिपल टॉप) नोंदवून घसरण सुरू झाली तर निफ्टी निर्देशांक २२,३५० पर्यंत घसरल्यास, ही निर्देशांकावरील हलकीफुलकी घसरण म्हणून संबोधू शकतो. पुढे काळाच्या उदरात जर निफ्टी निर्देशांक २१,८०० ते २१,५०० पर्यंत घसरल्यास मंदीची व्याप्ती जरा विस्तारली असे समजण्यास हरकत नाही. वरील वाक्य काळाच्या कसोटीवर तपासता, ९ ते १२ एप्रिल या तीन दिवसांमध्ये निफ्टी निर्देशांकावर २२,७७५ च्या समीप तिहेरी उच्चांक नोंदवत, निर्देशांकाने २२,३५० चा स्तर तोडून २१,८०० पर्यंत खाली घसरला. गेल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकावरील २२,३५० चा स्तर राखल्यास हलकीफुलकी घसरण, तर निर्देशांक २१,८०० पर्यंत घसरल्यास मंदीची व्याप्ती जरा विस्तारली असे समजायला हरकत नाही. ८ एप्रिलच्या लेखातील या दोन वाक्यांतून बाजाराच्या सद्य:स्थितीचे दिशानिर्देशन होत आहे. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २२,१५० ते २२,४५० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ असेल.

हेही वाचा : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?

आता निफ्टी निर्देशांकावर जी सुधारणा अपेक्षित आहे, त्या सुधारणेचे अंतरंग जाणून घेऊया.

१) क्षीण स्वरूपातील सुधारणा:- निफ्टी निर्देशांकावर २१,८०० ते २२,३०० पर्यंतची सुधारणा व त्यानंतर पुन्हा घसरण.
२) मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक:- निफ्टी निर्देशांकावर २१,८०० ते २२,४५० पर्यंतची सुधारणा.

३) शाश्वत सुधारणा:- निफ्टी निर्देशांक २२,५०० स्तरावर सातत्याने पंधरा दिवस टिकल्यास, त्याचे वरचे लक्ष्य २२,८०० ते २३,१०० असेल.
निफ्टी निर्देशांक २२,१५० ते २२,४५० या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकण्यास, सातत्याने अपयशी ठरल्यास निफ्टीचे खालचे लक्ष्य अनुक्रमे २१,८००, २१,५००, २१,२०० आणि २०,६०० असतील.

‘शिंपल्यातील मोती’

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
(शुक्रवार,१९ एप्रिल भाव २३९.२० रु.)
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लोखंड, पोलाद, ऊर्जा, सिमेंट अशा मूलभूत क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा जेएसडब्ल्यू उद्योग समूहाच्या परिवारातील ही कंपनी आहे. जी खासगी बंदर मालवाहतुकीत भारतात दुसऱ्या क्रमांकावर येत असलेली ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

हेही वाचा : Gold-Silver Price on 21 April 2024: सोन्याच्या किमतीने केला कहर, लोकांना फोडला घाम, १० ग्रॅमचा दर जाणून घ्या

आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षांतील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास उत्पन्न १३३.८६ कोटींवरून १४२ कोटी झाले आहे. तसेच करपूर्व नफा ३३.०१ कोटींवरून १२८.६९ कोटी तर निव्वळ नफा ३४.०१ कोटींवरून ९३.७३ कोटींवर पोहोचला आहे. समभागाचे आलेख वाचन करता समभागांनी आपल्याभोवती २५ रुपयांचा परीघ (बँड) निर्माण केलेला आहे. जसे की, २०० ते २२५ ते २५० ते २७५ रुपये समभागाचा बाजारभाव सातत्याने २६० रुपयांच्यावर पंधरा दिवस टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे २७५ ते ३०० रुपये तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य हे ३५० ते ४०० रुपये असेल. भविष्यातील बाजारातील व समभागातील घसरणीत हा समभाग १७५ ते १५० रुपयांदरम्यांनच्या प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकडयांत हा समभाग खरेदी करावा. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड समभागामधील दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला १२५ रुपयांचा नुकसान प्रतिबंध (स्टॉप लॉस) ठेवावा.
महत्त्वाची सूचना:- वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.

निकालपूर्व विश्लेषण

१) टाटा एलेक्सी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २३एप्रिल
१९ एप्रिलचा बंद भाव- ७,४५१ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ७,७५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ७,७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,०००रुपये, द्वितीय लक्ष्य ८,५०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ७,७५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७,००० रुपयांपर्यंत घसरण
ॲक्सिस

हेही वाचा : ‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत वर्षभरात १.६५ कोटींची भर

२)ॲक्सिस बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- बुधवार,२४ एप्रिल

१९ एप्रिलचा बंद भाव- १,०२९.१० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,०८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,०८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,१२० रुपये, द्वितीय लक्ष्य १,१५० रुपये.

ब) निराशादायक निकाल: १,०८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९८५ रुपयांपर्यंत घसरण

३) हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- बुधवार,२४ एप्रिल
१९ एप्रिलचा बंद भाव- २,२३२.२५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,३५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २,३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,६५० रुपये.
ब) निराशादायक निकाल: २,३५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,०५० रुपयांपर्यंत घसरण

४) इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- बुधवार,२४ एप्रिल
१९ एप्रिलचा बंद भाव- ५९६.६५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ५७० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६२० रुपये,द्वितीय लक्ष्य ६५० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ५७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५३० रुपयांपर्यंत घसरण

हेही वाचा: जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर

५) एसीसी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, २५एप्रिल

१९ एप्रिलचा बंद भाव- २,४०६.८० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,३५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,६५० रुपये.

ब) निराशादायक निकाल: २,३५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,१५० रुपयांपर्यंत घसरण

आशीष ठाकूर

(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:-शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.