Stock Market Opening : शेअर बाजाराने नवीन ऐतिहासिक शिखर गाठले असून, BSE सेन्सेक्सने प्रथमच ७३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. NSE च्या निफ्टीनेदेखील सर्वोच्च उच्चांक गाठला असून, २२ हजारांचा स्तर ओलांडला आहे. देशात आज मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे या दिवसाची शुभ सुरुवात भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडून झाली आहे.

शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला

आज बाजार उघडताना BSE सेन्सेक्सने ४८१.४१ अंकांच्या म्हणजेच ०.६६ टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह ७३,०४९ च्या पातळीवर पोहोचला. तर NSE चा निफ्टी १५८.६० अंक म्हणजेच ०.७२ टक्क्यांच्या मजबूत वाढीसह २२,०५३ वर उघडण्यात यशस्वी झाला.

On the strength of PSU banks the Sensex reached the level of 486 points
पीएसयू बँकांच्या जोरावर सेन्सेक्सची ४८६ अंशांची मुसंडी
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

सेन्सेक्स-निफ्टीची सर्वोच्च पातळी

BSE सेन्सेक्सचा आजचा इंट्राडे उच्चांक ७३,२५७.१५ च्या पातळीवर आहे आणि NSE निफ्टीचा सर्वकालीन उच्चांक २२,०८१.९५ वर आहे, जो बाजार उघडल्यानंतर लगेचच दिसून आला.

बाजारात वाढ आणि समभाग घसरण

बीएसईवर एकूण ३१५५ शेअर्सचे व्यवहार होत आहेत, त्यापैकी २२८२ शेअर्स वाढीसह व्यवहार करीत आहेत. तसेच ७६५ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. १०८ शेअर्समध्ये कोणताही बदल न करता व्यवहार होत आहे.

सेन्सेक्स शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २५ समभाग वाढत आहेत आणि केवळ ५ घसरणीसह व्यवहार करीत आहेत. सर्वाधिक सेन्सेक्स वाढणाऱ्यांपैकी विप्रो ११.४६ टक्के आणि टेक महिंद्रा ६.२६ टक्क्यांनी वर आहे. एचसीएल टेक ३.६९ टक्के आणि इन्फोसिस ३.०१ टक्के वाढ दर्शवत आहे. TCS २.०३ टक्क्यांनी आणि HDFC बँक १.४१ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

हेही वाचाः भारतीयांमध्ये श्रीमंत होण्याच्या प्रमाणात वाढ, १० कोटी लोकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या पुढे जाणार

निफ्टी IT मध्ये उच्च वाढीची नोंद

आयटी समभागांमध्ये विक्रमी उच्चांक पाहायला मिळत आहे आणि शेअर बाजारात आयटी समभाग सुमारे ३ टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह व्यवहार करीत आहेत. १ हजाराहून अधिक अंकांच्या उसळीनंतर आयटी निर्देशांक ३७५५० च्या वर आला होता. आज आयटी शेअर्स शेअर बाजारातील सर्व टॉप गेनर्सवर वर्चस्व गाजवतात.

हेही वाचाः सिटी ग्रुप २० हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढणार, १.८ अब्ज डॉलर्सच्या नुकसानीनंतर घेतला निर्णय

प्री-ओपनिंगमध्ये बाजार ऐतिहासिक उच्च पातळीवर

बाजाराच्या सुरुवातीपूर्वीच बीएसईचा सेन्सेक्स ५०४.२१ अंकांनी झेप घेत ७३०७२ च्या ऐतिहासिक पातळीवर गेला होता आणि एनएसईचा निफ्टी १९६.९० अंकांनी वाढून २२०९१ च्या पातळीवर पोहोचला होता.