भारतातील अग्रगण्य व्यावसायिक समूह वेदांताने डिस्प्ले ग्लास उद्योगात सहभागी असलेल्या २० कोरियन कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. यामुळे भारताला इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यात मदत होईल, असेही आता सांगितले जात आहे. अलीकडेच कोरियन सरकारने आयोजित केलेल्या कोरिया बिझ ट्रेड शो २०२३ मध्ये वेदांताचा रोड शो होता.

५० हून अधिक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले

वेदांता सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले व्यवसायाचे ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टर आकाश के हेब्बर म्हणाले, “५० हून अधिक कंपन्यांनी आमच्यासोबत भागीदारी करण्यात स्वारस्य दाखवले आहे आणि आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, आम्ही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन मूल्य शृंखलेत सामील असलेल्या २० कोरियन कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

यापूर्वी जपानी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले होते

यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये जपानमध्ये या प्रकारच्या रोड शोचे आमंत्रण मिळाले होते. या रोड शोमध्ये १०० कंपन्यांचे सुमारे २०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. यादरम्यान वेदांताने ३० जपानी कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला.

हेही वाचाः Ex-Dividend Shares: आठवड्याभरात गुंतवणूकदारांना ‘या’ शेअर्सवर मिळणार मोठा फायदा, पाहा संपूर्ण यादी

वेदांता गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारणार

सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले बनवण्यासाठी वेदांता आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन यांचा संयुक्त उपक्रम आहे. या अंतर्गत गुजरातमधील अहमदाबाद शहराजवळील धोलेरा येथे एक उत्पादन प्रकल्प उभारला जाणार असून, दोन्ही कंपन्या या प्लांटमध्ये संयुक्तपणे १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

हेही वाचाः टाटा, अंबानी, अदाणींच्या स्टॉकवर नव्हे, ‘या’ १५ रुपयांच्या शेअरवर लोकांचा सर्वाधिक विश्वास, केला ऐतिहासिक विक्रम

एक लाख लोकांना रोजगार मिळेल

वेदांताद्वारे उभारण्यात येणार्‍या या प्लांटच्या बांधकामानंतर भारत अर्धसंवाहक आणि डिस्प्ले बनवण्यात काही निवडक देशांमध्ये सामील होईल. यातून सुमारे एक लाख लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे.