सफारी इंडस्ट्रीज (इं.) लिमिटेड (बीएसई कोड: ५२३०२५)

वेबसाइट: http://www.safaribags.com
प्रवर्तक: सुधीर जाटिया

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

बाजारभाव: रु. १,९४४/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : मोल्डेड लगेज
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९.५१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४६.८८

परदेशी गुंतवणूकदार १३.२५
बँकस्/ म्युच्युअल फंड्स/ सरकार १६.९२
इतर/ जनता २२.९५
पुस्तकी मूल्य: रु. १०८
दर्शनी मूल्य: रु. २/-

गतवर्षीचा लाभांश:१७५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ३४.११

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५७

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.२६
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५९.४

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २३.२
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड: ३७.५

बीटा: ०.५

बाजार भांडवल: रु. ९,२५० कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २,३००/८३६

गुंतवणूक कालावधी : १८ ते २४ महिने

प्रवासासाठी बॅग म्हटलं की जी काही दोन-तीन नावे समोर येतात त्यातलं एक ‘सफारी’ हे महत्त्वाचं नाव. सफारी इंडस्ट्रीज ही लगेज आणि त्या करता लागणाऱ्या सामानाच्या उत्पादनाचा व्यवसाय करते. १९७४ मध्ये स्थापन झालेली सफारी इंडस्ट्रीज २०११ मध्ये सुधीर जाटिया यांनी ताब्यात घेतली. त्यानंतर कंपनीने लक्षणीय प्रगती केली आहे.

हेही वाचा : माझा पोर्टफोलिओ : लाभाचे वर्ष

लगेजच्या दोन विस्तृत श्रेणी आहेत, हार्ड लगेज आणि सॉफ्ट लगेज. हार्ड लगेज हे प्रामुख्याने पॉलीप्रॉपिलीन (पीपी) आणि पॉली कार्बोनेट (पासी) यापासून बनलेले असतात. हे उत्पादन कंपनीच्या गुजरातमधील हलोल येथे असलेल्या प्रकल्पात इन-हाउस तयार केले जाते. सॉफ्ट लगेज विविध प्रकारच्या कापडांपासून बनवलेले असते आणि ते प्रामुख्याने आयात केले जाते. सफारी हा भारतातील अव्वल तीन लगेज ब्रँडपैकी एक आहे असून कंपनीचा संघटित सामान बाजारपेठेत सुमारे २५ टक्क्यांचा हिस्सा आहे. कंपनी सफारी, मॅग्नम, जिनियस आणि जिनी या ब्रँड अंतर्गत आपली उत्पादने प्रस्तुत करते. कंपनीच्या उत्पादनात स्कूल बॅग, लॅपटॉप बॅकपॅक, सॉफ्ट लगेज अपराइट्स, डफल्स/रोलिंग डफल्स आणि हार्ड लगेज अपराइट्स यांचा समावेश आहे.

कंपनीचा गुजरातमधील हलोलमध्ये प्रमुख प्रकल्प असून हे युनिट प्रामुख्याने भारतातील हार्ड लगेजच्या उत्पादनात आहे. कंपनी सॉफ्ट लगेजसाठी आवश्यक सामग्री चीनमधून आयात करत असे. मात्र प्रतिकूल विनिमय दर आणि चीनकडून खरेदी खर्चावर वाढलेल्या दबावामुळे, कंपनीने देशांतर्गत बाजार आणि बांगलादेशातून सॉफ्ट लगेज आणि बॅकपॅक श्रेणीच्या खरेदीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. झिपर्ड हार्ड लगेज सेगमेंटमध्ये, कंपनी आपल्या विद्यमान सुविधांमधील उत्पादन क्षमता वाढवत आहे आणि पॉलीप्रॉपिलीन झिपर्ड केस तयार करण्यासाठी आपल्या उपकंपनीद्वारे नवीन उत्पादन प्रकल्प स्थापित करत आहे.

हेही वाचा : बाजारातली माणसं : टाटांचा ‘चंद्रा’वतार! नटराजन चंद्रशेखरन

यंदाच्या आर्थिक वर्षांत दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत १८ टक्के वाढ होऊन तो ३७० कोटींवर गेला आहे, तर नक्त नफाही गेल्या वर्षातील तिमाहीच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी वाढून ३९.८ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने नुकताच १:१ प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप केल्याने, आता भरणा झालेले भागभांडवल ९.५१ कोटी रुपये झाले आहे. मात्र वार्षिक १,२०० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या कंपनीचे भांडवल अजूनही छोटेच वाटते. कोविडपश्चात पर्यटन उद्योगाने जोम धरला आहे. ‘देखो अपना देश’सारख्या योजनांनी सरकारही प्रोत्साहन देत आहे. संपूर्ण भारतातील कानाकोपऱ्यात आपली उत्पादने पुरवणाऱ्या सफारीने आता नवीन दर्जेदार उत्पादने आकर्षक किमतीत बाजारात आणून, त्यांच्या विपणनास सुरुवात केली आहे. त्याचा मोठा फायदा आगामी काळात दिसून येईल.

हेही वाचा : बाजाररंग : नववर्षाची गुंतवणूक नांदी

(महत्त्वाची टीप: हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे. प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

अजय वाळिंबे

stocksandwealth@gmail.com