या सदरातील १३ फेब्रुवारी २०२३ च्या ‘आहे मनोहर तरी!’ या शीर्षकाखालील लेखात निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटली गेली होती. त्या लेखातील वाक्य होते – “येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकावर १७,९५० ते १८,१०० च्या स्तराला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असेल. भविष्यात निफ्टी निर्देशांकाने हा स्तर पार केल्यास, त्या स्तरावर निर्देशांक १५ दिवस टिकण्याची नितांत गरज आहे. अन्यथा निर्देशांक १७,९५० ते १८,१००चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास आणि १७,८०० चा स्तरही राखू न शकल्यास, त्याचे पहिले खालचे लक्ष्य १७,५०० व दुसरे खालचे लक्ष्य १७,३१४ असे असेल.”

हेही वाचा- जागतिक प्रतिकूलतेपायी सेन्सेक्सची ९२७ अंशांची आपटी

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…

सरलेल्या सप्ताहातील बुधवारच्या दातखिळी बसवणाऱ्या घसरणीत, एका फटक्यात ३०० अंशांनी बाजार कोसळला. त्यायोगे १७,५०० चे खालचे लक्ष्य साध्य झाले. सर्वांची मती गुंग झाली व सर्वतोमुखी ‘इतना सन्नाटा क्यों हैं भाई!’ हे वाक्य त्यासमयी होते. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ५९,४६३.९३ / निफ्टी: १७,४६५.८०

निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटताना आज आपण तांत्रिक विश्लेषण शास्त्रातील ‘चलत सरासरी’(मूव्हिंग ॲव्हरेज) या प्रमेयांचा आधार घेत निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीचा आढावा घेऊया.

‘चलत सरासरी’ हे दुधारी शस्त्र आहे. ते तेजीच्या दिवसांत घसरणाऱ्या समभागाला / निर्देशांकाला आधार तर मंदीच्या दिवसांत अडथळा म्हणून कार्यरत असते. या संकल्पनेचा आधार घेता निर्देशांक अथवा समभागाचा आजचा भाव/किंमत ही सर्व २००, १००, ५०, २० आणि पाच दिवसांच्या चलत सरासरीवर असल्यास, निर्देशांक अथवा समभाग प्रत्येक घसरणीत या चलत सरासरीचा आधार घेत, समभागाच्या किमतीने अथवा निर्देशांकाने पुन्हा वरची उसळी मारल्यास त्या समभागांत अथवा निर्देशांकावर तेजी कायम आहे असे गृहीत धरावे. ही चलत सरासरी या संकल्पनेची तेजीची बाजू झाली.ज्या वेळेला समभागाची किंमत अथवा निर्देशांक प्रथम चलत सरासरीचा स्तर तोडतो / चलत सरासरीचा स्तर राखण्यास अपयशी ठरतो, त्या स्तराखालीच समभागाची किंमत / निर्देशांक सातत्याने टिकल्यास ती मंदीची सुरुवात असून समभाग / निर्देशांक खालचे लक्ष्य साध्य करणार, असे गृहीत धरावे. अशा वेळेला समभाग खरेदी करायची घाई करू नये. यथावकाश हा समभाग स्वस्तात मिळू शकतो.वरील माहिती काळाच्या कसोटीवर तपासून पाहता गुंतवणूकदारांना स्मरत असेल की, जानेवारीपासून निफ्टी निर्देशांकावर १७,९५० ते १८,००० या स्तराला ‘महत्त्वाचा वळणबिंदू’(टर्निंग पाँइंट) म्हणून संबोधलेले. जसे की, १ डिसेंबरला १८,८८७ चा उच्चांक नोंदवत, २६ डिसेंबरला १७,७७४ चा नीचांक नोंदवला व जानेवारीपासून वाचकांच्या मानसिक व आर्थिक तयारीसाठी निफ्टी निर्देशांकावर १७,९५० ते १८,००० हा ‘महत्त्वाचा वळणबिंदू’ ही संकल्पना विकसित केली. कारण त्या वेळेला १००, ५०, २०, ५ दिवसांची चलत सरासरी या स्तरादरम्यानच होती आणि २०० दिवसांची चलत सरासरी १७,३०० च्या समीप होती. आता प्रत्यक्षात जानेवारीपासून आजतागायत दोन-तीन वेळेचा क्षणिक एक दोन दिवसांचा अपवाद वगळता निफ्टी निर्देशांकाला सातत्याने १७,९५० ते १८,००० हा भरभक्कम अडथळा तर १७,३०० अर्थात २०० दिवसांची चलत सरासरी हा भरभक्कम आधार ठरत होता.

हेही वाचा- ‘पोर्टफोलियो’ची बांधणी

ही वाटचाल अतिशय महत्त्वाच्या अशा १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाच्या दिवसावर पडताळून पाहता, निफ्टी निर्देशांकाचा ३१ जानेवारीचा बंद भाव १७,६६२ होता. अर्थसंकल्प सादर झाल्यावर निफ्टी निर्देशांकाने क्षणिक अशी १७,९७२ पर्यंतची वरची उसळी मारली. पुढे निर्देशांक १७,३५० पर्यंत घरंगळला. नंतर २०० दिवसांच्या चलत सरासरीचा आधार घेत त्यात पुन्हा सुधारणा झाली.

दुसरी घटना १६ फेब्रुवारीची. त्या दिवशी निफ्टी निर्देशांक १८,००० च्या स्तरावर बंद झाला. पण निर्देशांक सातत्याने या स्तरावर १५ दिवस टिकण्याची नितांत गरज होती, कसलं काय! ही सुधारणा अल्पजीवी ठरत निफ्टी निर्देशांक पुन्हा १७,९५०च्या खाली बंद झाला. १७ फेब्रुवारीचा निफ्टी निर्देशांकाचा बंद भाव १७,९४४ होता. यात निफ्टी निर्देशांक सातत्याने १००, ५०, २०, ५ दिवसांच्या चलत सरासरीच्या खाली टिकत असल्याने, मंदीच्या गर्तेतच होता. त्यात अदानी समभागांची न संपणारी विक्री, त्यात यावर्षी पाऊस असमाधानकारक असण्याची शक्यता (अल-नीना फॅक्टर) या सर्व घटनांची परिणती निफ्टी निर्देशांकावर रक्तपात झाला. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निफ्टी निर्देशांक २०० दिवसांच्या चलत सरासरी समीप आल्याने या हताश, निरुत्साही वातावरणात गुंतवणूकदारांच्या मुखातून ‘इतना सन्नाटा क्यों हैं भाई’ हे वाक्य आपसूकच आले.

हेही वाचा- आहे मनोहर तरी!

येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १७,३०० ते १७,२००चा स्तर टिकवल्यास क्षीण सुधारणा अपेक्षित आहे. जिचे वरचे लक्ष्य निफ्टी निर्देशांकावर १७,६५० ते १७,७०० आणि द्वितीय लक्ष्य १७,७५० ते १७,८५० असे असेल. मात्र निर्देशांक १७,८५० ते १७,९५० चा स्तर पार करण्यास सातत्याने अपयशी ठरल्यास त्याचे पहिले खालचे लक्ष्य हे १७,३०० ते १७,२०० आणि द्वितीय लक्ष्य १७,००० ते १६,८०० असे असेल.

शिंपल्यातील मोती

बाॅम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई लिमिटेड)(शुक्रवार, २४ फेब्रुवारीचा बंद भाव : रु. ४३९.३०)भारताचा स्वातंत्र्यलढा, पहिले व दुसरे जागतिक महायुद्ध, भारत-चीन, भारत-पाकिस्तान युद्धाचा साक्षीदार, तर आपल्या वास्तूतच बॉम्बस्फोटाचा हादरा पचवून तावूनसुलाखून बाहेर पडलेली आणि तब्बल दीड शतक दिमाखदारपणे वाटचाल करणारी ऐतिहासिक वास्तू आणि जेथून अनेक उद्योगांचे प्राथमिक भागभांडवल विक्री (आयपीओ) आणि समभाग सूचिबद्ध झाले आणि कंपन्यांना बीजभांडवल, खेळते भांडवल उपलब्ध करून देशाचा औद्योगिक पाया रचण्यात, विस्तारण्यात सिंहाचा वाटा उचलला गेला अशी संस्था म्हणजे ‘बीएसई’ आणि त्या संस्थेचा समभाग हा आपला आजचा शिंपल्यातील मोती आहे.

हेही वाचा- उदयमान ‘एसएमई बँकिंग’मधील अग्रणी

बीएसई लिमिटेड या समभागाची वाटचाल ही ४०० ते ४६० रुपयांच्या परिघात असेल. सद्य:स्थितीत बाजार व समभाग मंदीच्या गर्तेतच आहे. येणाऱ्या मंदीच्या दिवसांत समभाग ४०० रुपयांचा स्तर सातत्याने १५ दिवस राखणे नितांत गरजेचे आहे. असे घडले तरच समभाग खरेदीचा विचार करावा. मंदीच्या वातावरणातील तेजीच्या झुळुकीत समभागाचे ४६० ते ५०० रुपयांपर्यंतचे वरचे लक्ष्य गृहीत धरावे. समभागाचा भाव सातत्याने ५५० रुपयांच्यावर टिकल्यास समभागचे दीर्घमुदतीचे लक्ष्य ६५० ते ७०० असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ३७० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना विचारात घेण्यासाठी सादर केलेले आहे.

– आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.