अजय वाळिंबे

एलटी फूड्स लिमिटेडची स्थापना १९८० च्या दशकात झाली. १९७८ मध्ये विजयकुमार अरोरा यांनी एका राइस मिलने सुरुवात केलेली एलटी फूड्स आज एका आघाडीची कंपनी बनली आहे. प्रामुख्याने ब्रँडेड आणि नॉन-ब्रँडेड बासमती तांदूळ, प्रक्रिया आणि विपणन तसेच तांदूळ खाद्य उत्पादनांच्या व्यवसायात ही कंपनी आहे. कंपनीच्या तांदूळ उत्पादनाच्या पोर्टफोलिओमध्ये तपकिरी तांदूळ, पांढरा तांदूळ, वाफवलेला तांदूळ, परबॉइल केलेला तांदूळ, सेंद्रिय तांदूळ, झटपट शिजणारा तांदूळ, मूल्यवर्धित तांदूळ आणि रेडी टू कूक विभागात फ्लेवर्ड राइस यांचा समावेश आहे. कंपनी आपल्या संशोधन आणि विकासामधून तांदूळ आणि तांदूळ अन्न उत्पादनांमध्ये निरंतर मूल्यवर्धन करत आली आहे. कंपनीची उपकंपनी, नेचर बायो फूड्स लिमिटेड ही घटक आधारित सेंद्रिय अन्न विभाग चालवते. तिची उत्पादने आज एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून उदयास आली आहेत, जो यूएस आणि युरोपमधील ग्राहकांना अस्सल सेंद्रिय घटक ऑफर करतो.

Lilavati Hospital, Appointment,
लीलावती हॉस्पिटलच्या नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती
Mumbai Indians can repeat historical comeback of 2014 season and enters playoffs IPL 2024 Rohit Sharma Hardik Pandya
IPL 2024: प्ले ऑफच्या बाबतीत मुंबई इंडियन्स इतिहासाची पुनरावृत्ती करणार?
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?
devendra fadnavis said maha vikas and india aghadi are break engine public do not trust
इंडिया आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन, देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली…..

कंपनीकडे दावत, रॉयल, हेरिटेज, देवाया, गोल्ड सील इंडस व्हॅली, ८१७ एलिफंट आणि कारी कारी आणि इकोलाइफ यासारख्या अनेक ब्रँडची मालकी असून कंपनीचे प्रमुख ब्रँड ‘दावत’ आणि ‘रॉयल’ भारत आणि उत्तर अमेरिकेतील बासमती तांदळाच्या बाजारपेठेत अनुक्रमे ३० टक्के आणि ५० टक्के बाजार हिश्शासह नेतृत्व स्थानावर आहेत. कंपनीने नुकताच ‘दावत क्विक कूकिंग रेड राइस’ लॉंच करून आपला सुपर फूड पोर्टफोलिओ आणखीन मजबूत केला आहे. कंपनीने अमेरिकेमधील वॉलमार्टमध्ये नवीन रॉयल आरटीएच प्रकार, व्हाइट क्वेसो आणि जलापेनो इ. ब्रॅंड लाँच केले.

हेही वाचा >>>नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

कंपनीच्या एकूण महसूलात बासमती आणि इतर विशेष तांदूळचा ८४ टक्के हिस्सा असून, सेंद्रिय अन्न आणि इतर घटक – ९ टक्के, सुविधा आणि आरोग्य – २ टक्के तर इतर महसूल ५ टक्के आहे.

भौगोलिक विस्तार : एलटी फूड्स आपली उत्पादने जगभरातील ७८ देशांमध्ये निर्यात करते. कंपनीच्या एकूण उलाढालीत भारताचा हिस्सा २९ टक्के असून जगभरातील भौगोलिक उपस्थिती अशी आहे: अमेरिका – ४१ टक्के, युरोप -१७ टक्के, आखाती देश – ६ टक्के तर उर्वरित जग – ७ टक्के.

कंपनीने युरोपमधील विस्तार वाढवण्यासाठी २०१७ मध्ये ‘एलटी फूड्स युरोप बीव्ही’ची स्थापना केली आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये, विविध खाद्य चॅनेलवर विक्रीद्वारे या प्रदेशातील बासमतीच्या सुमारे ३० टक्के वापराचा पुरवठा करून युरोपीय महासंघामध्ये बासमती तांदळाची ही कंपनी प्रमुख उत्पादक झाली आहे.

हेही वाचा >>>बाजारातली माणसं- छोट्या फंड घराण्याचा मोठा माणूस : आशीष सोमय्या

उत्पादन सुविधा आणि वितरण

कंपनीकडे भारतात पाच अत्याधुनिक उत्पादन सुविधा असून अमेरिकेत आणि युरोपमध्ये प्रत्येकी एक आधुनिक उत्पादन सुविधा आहे. तसेच कंपनीच्या नेचर बायो फूड्स या उपकंपनीने युगांडा, आफ्रिकेत नवीन उत्पादन सुविधा यंदा सुरू केली आहे. कंपनी जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, होरेका, ई-कॉमर्स यांसारख्या सर्व चॅनेलवर भारतातील १,२०० हून अधिक वितरक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील शंभरहून अधिक वितरकांच्या माध्यमातून आपले उत्पादन वितरण करते. भारतात एलटी फूड्सची १५२,००० रिटेल आउटलेट आहेत.

डिसेंबर २०२३ साठी संपलेल्या तिमाहीत १,९४२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १५१ कोटींचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ५९ टक्क्यांनी अधिक आहे. गेली ४० हून अधिक वर्ष उत्पादनात असणाऱ्या एलटी फूड्सची कामगिरी कायम उत्तम राहिली आहे. आगामी काळातदेखील या निर्यातप्रधान कंपनीची कामगिरी आकर्षक राहील अशी अपेक्षा आहे. सध्या १७५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम कालावधीसाठी योग्य वाटतो.

एलटी फूड्स लिमिटेड (बीएसई कोड ५३२७८३)

प्रवर्तक: अरोरा समूह

वेबसाइट: www.ltgroup.in

बाजारभाव: रु. १७६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: अन्न प्रक्रिया उद्योग

भरणा झालेले भागभांडवल: रु. ३४.७३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५१.००

परदेशी गुंतवणूकदार ५.७३

बँकस्/ म्युच्युअल फंडस्/ सरकार ५.१२

इतर/ जनता ३८.१५

पुस्तकी मूल्य: रु.८८

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: १००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. १८.५

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १०.६

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३७.७

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.३२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ९.९७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १७.१

बीटा :१

बाजार भांडवल: रु. ६,०९३ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: रु. २३४ / रु. ९०

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

• हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे.

• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.