Anant Ambani Wedding Cost : प्रसिद्ध उद्योगपती, अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटशी विवाहबद्ध (१२ जुलै) होत आहे. या लग्नाची गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. प्री वेडिंग, संगीत आणि इतर अनेक विधी मोठ्या राजेशाही थाटात पार पडले. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस लग्नसोहळा रंगला. गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील वनतारा येथून या शाही सोहळ्याची सुरुवात झाली होती. आतापर्यंत या लग्नासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हॉलिवूड, बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार, क्रीडापटू, राजकारणी, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी ते संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत अनेकांनी अनंत अंबानींच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या लग्नाच्या खर्चापोटी अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या संपत्तीमधील केवळ ०.५ टक्के भाग खर्च केला असल्याचे समोर आले आहे.

Anant-Radhika Wedding Live Updates: अनंत-राधिकाला आशीर्वाद द्यायला पोहोचले शरद पवार, पाहा व्हिडीओ

जगातील सर्वात महागडे लग्न

अंबानी कुटुंबाचा रिलायन्स हा उद्योग समूह अनेक क्षेत्रातील उद्योगात गुंतलेला आहे. लाईव्ह मिंट, द इकॉनॉमिक टाइम्स आणि आऊटलूक बिझनेसने या लग्नाच्या खर्चाचा अंदाजित आकडा सांगितला आहे. त्याप्रमाणे या शाही लग्न सोहळ्यावर ५,००० कोटींचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. या खर्चात हॉलिवूड, बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना कला सादर करण्यासाठी दिलेले पैसे, लग्नात पाहुण्यांची सरबराई आणि इतर सर्व खर्च मोजल्याचे सांगितले जाते.

भारतात लग्नसोहळ्याला एक वेगळेच महत्त्व आहे. लग्न आयुष्यात एकदाच होते, असे म्हणत भारतातील गरीबांपासून श्रीमंतापर्यंत अनेक कुटुंबे आपापल्यापरिने लग्नसोहळ्यावर पैसे खर्च करत असतात. आतापर्यंत भारतीय सेलिब्रिटी किंवा उद्योगपती डेस्टिनेशन वेडिंग करत होते. परदेशात कुठेतरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत शाही पद्धतीने विवाह सोहळे होत होते. अंबानी यांनी एक क्रूझ पार्टी वगळता सर्व सोहळे गुजरात आणि महाराष्ट्रात पार पाडले आहेत.

हे ही वाचा >> अनंत अंबानीचा हात धरून रामदेव बाबांनी केला भन्नाट डान्स; राधिका- अनंतच्या शाही लग्नसोहळ्यातील नवा Video आला समोर

फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, अंबानी कुटुंबाने पाच हजार कोटी रुपये खर्च करून राजकुमारी डायना आणि राजकुमार चार्ल्स यांच्या लग्नात झालेल्या १,३६१ कोटींच्या खर्चाला मागे टाकले आहे. तसेच शेखा हिंद बिंत बिन मकतूम आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या लग्नात झालेल्या १,१४४ कोटी रुपयांच्या खर्चापेक्षाही अधिक खर्च केला आहे. त्यामुळे अनंत अंबानी यांचे लग्न आता जगातील सर्वात महागड्या लग्नापैकी एक झाले आहे.

Anant-Radhika Wedding: सोन्याचे वर्क असलेल्या अनंत अंबानीच्या स्नीकर्सने वेधलं लक्ष, ‘इतकी’ आहे विदेशी शूजची किंमत

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यासाठी शुक्रवारी (१२ जुलै) मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना आणण्यासाठी अंबानी कुटुंबाकडून तीन फाल्कन-२००० जेट भाड्याने घेतल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले होते. क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी सांगितले की, लग्नाच्या उत्सवादरम्यान १०० हून अधिक खासगी विमाने वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतासह जगभरातील सेलिब्रेटी, कलाकार, खेळाडू, उद्योगपती आणि राजकारणी या लग्नाला येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमधील पाहुण्यांची संख्या वाढली आहे. या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मुकेश अंबानी यांनी मुंबई विमानतळाच्या आसपास आणि वांद्रे कुर्ला संकुलातील अनेक पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग केल्याचेही सांगितले जात आहे.