scorecardresearch

Premium

नीरज निगम आता RBI चे नवे कार्यकारी संचालक; एकट्यालाच सांभाळावे लागणार ‘हे’ चार महत्त्वाचे विभाग

ईडी म्हणून निवड होण्यापूर्वी ते आरबीआयच्या भोपाळ प्रादेशिक कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ते तीन दशकांहून अधिक काळ रिझर्व्ह बँकेत आपली सेवा देत आहेत.

India to become world growth engine
''भारत जगाचे ग्रोथ इंजिन बनणार, GDP वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम''; RBI चा विश्वास

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सोमवारी नीरज निगम यांची नवीन कार्यकारी संचालक (ED) म्हणून निवड केली, ज्यांच्याकडे चार पोर्टफोलिओ म्हणजेच चार महत्त्वाचे विभाग देण्यात आले आहेत. ईडी म्हणून निवड होण्यापूर्वी ते आरबीआयच्या भोपाळ प्रादेशिक कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ते तीन दशकांहून अधिक काळ रिझर्व्ह बँकेत आपली सेवा देत आहेत.

एकट्यावरच चार विभागांची जबाबदारी

RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, कॉर्पोरेशन ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभाग, आर्थिक समावेश आणि विकास विभाग (financial inclusion and development department), कायदेशीर विभाग (legal department), सचिव विभागा(Secretary’s department)चे कामकाज ते हाताळतील. याआधी त्यांनी मध्यवर्ती कार्यालयात तसेच प्रादेशिक कार्यालयांमध्ये नियमन आणि पर्यवेक्षण, मानव संसाधन व्यवस्थापन, परिसर, चलन व्यवस्थापन, बँक खाती आणि इतर क्षेत्रात काम केले आहे. नीरज निगमने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (CAIIB) च्या प्रमाणित सहयोगीची पात्रता (certified associate) प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलरची पदवी मिळवली आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
mrinal kulkarni virajas and shivani
“शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही…,” मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केला आनंद, जाणून घ्या खास कारण

हेही वाचाः अदाणींनी आधी इस्रायलचे सर्वात मोठे बंदर घेतले विकत, आता भारतातील माजी राजदूतालाच…

RBI रेपो दर वाढवू शकते

चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत RBI पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते, असे बोलले जात आहे. ही बैठक ३ एप्रिलला सुरू झाली असून, ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यूएस बँक फेडने गेल्या महिन्यात रेपो दर वाढवल्यानंतर भारतीय बँकांवरही त्याचा परिणाम दिसून येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. रेपो दरात आणखी ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी आणि अमेरिकन बँका कोलमडल्यामुळे बाजारावर परिणाम करण्यासाठी RBI ने सातत्याने धोरणात्मक व्याजदर वाढवण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर मे २०२२ पासून रेपो दर चार टक्क्यांवरून ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचाः सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील बंदी वाढवली, पण कारण काय?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neeraj nigam now new executive director of rbi he will manage four departments alone vrd

First published on: 03-04-2023 at 14:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×