वसंत माधव कुळकर्णी

आज या सदरासाठी शेखर वायदंडे (४८) यांच्या आर्थिक नियोजनाची निवड केली आहे. शेखर हे दुबई येथे कार्यरत असून ‘लोकसत्ता’चे वाचक आहेत. ते त्यांच्या पत्नी शुभदा (४८) आणि मुलगा अथर्व (१२) असे हे कुटुंब आहे. त्यांचे कुटुंब वर्तकनगर ठाणे या ठिकाणी राहते. पत्नी शुभदा या गृहिणी आहेत. शेखर वायदंडे यांच्या गुंतवणुकीत पाच म्युच्युअल फंड असून त्यांचे १५ मार्च रोजीचे मूल्यांकन ४६.४४ लाख रुपये आहे. वायदंडे यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.

Hruta Durgule wishes wedding anniversary to husband Prateek Shah by sharing post on social media
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हृता दुर्गुळेने शेअर केली पती प्रतीकसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू जसा…”
Marathi Joke On Pappu And Relatives
हास्यतरंग : फरसाण आणि नातेवाईक…
Marathi Joke
हास्यतरंग : आमचा पोरगा…
Marathi Joke
हास्यतरंग : ऐकलं का?…
Marathi Joke
हास्यतरंग : अब्जाधिश झालो…
Marathi Joke
हास्यतरंग : मुलींशी गप्पा…
Tharala Tar Mag arjun sayali chaitanya sakshi dance performance at engagement ceremony viral video
VIDEO: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली आणि चैतन्य-साक्षीने केला साखरपुड्यादिवशी मजेशीर डान्स; चाहते म्हणाले, “वेडे आहात तुम्ही”
Marathi Joke
हास्यतरंग : पाया पडते…

आर्थिक नियोजन हा एखाद्याच्या जीवनातील आर्थिक उद्दिष्टे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा मार्ग आहे. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलात तरी आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. आर्थिक नियोजन मूलत: तुम्हाला तुमचे उत्पन्न, खर्च आणि आर्थिक उद्दिष्टे यांचा मेळ घालण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या बचतीचे नियोजन करू शकता आणि तुमची वित्तीय ध्येये सहज साध्य करू शकता. पैसा ही एक अत्यावश्यक गोष्ट असून जी तुम्हाला तुमचे जीवन चालवण्यास मदत करते. दिवसेंदिवस पैशाचे मूल्य वाढले आहे, कारण लोक त्यांच्या भविष्यातील गरजांबाबत अधिक जागरूक होत आहेत. तात्त्विकदृष्ट्या, पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ शकत नाही तरीही व्यावहारिकदृष्ट्या पैसा ही मूलभूत गोष्ट आहे जी कोणत्याही व्यक्तीची समाजातील पत मोजण्यासाठी वापरली जाते.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला गुंतवणुकीद्वारे तुमच्या मुलीच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी १० लाख रुपये, तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी हवे असतील तर त्याचे नियोजन ती जन्माला येताच करावे लागेल.

कृती योजना

सेवानिवृत्ती कोष ५ कोटी रुपयांचा असणे आवश्यक आहे. सध्याचे उपलब्ध स्रोत आणि वित्तीय ध्येयांची प्राथमिकता निश्चित केल्यानंतर ४ कोटींची रक्कम जमा होऊ शकते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत २१ लाख रुपये जमा असून पुढील वर्षी ही रक्कम उपलब्ध होईल. सध्या म्युच्युअल फंडातील ४६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीपैकी ३० लाख सेवा निवृत्ती कोषासाठी वापरण्याचे नियोजन असून अतिरिक्त ४५ हजाराची ‘एसआयपी’ पुढील १२ वर्षे करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुण्यात दुसरे घर घेण्याचे वित्तीय ध्येय रहित करण्यात यावे, असे सुचवावेसे वाटते. सेवानिवृत्ती आणि मुलाच्या शिक्षणासाठी पुढील सहा वर्षांत ३५ लाख रुपये जमा करणे हे ध्येय निश्चित करण्यात आले. उपलब्ध स्रोतांपैकी म्युच्युअल फंड गंगाजळीतून १६ लाख शैक्षणिक खर्चाच्या तरतुदीसाठी वापरण्यात येतील.

जोखिमांकन काय?

जोखिमांक चाचणी म्हणजे एखाद्या व्यक्तीची जोखीम घेण्याची इच्छा आणि क्षमता यांचे मूल्यमापन होय. योग्य मालमत्ता विभाजन निश्चित करण्यासाठी जोखिमांक चाचणी महत्त्वाची आहे. शेखर वायदंडे यांची जोखिमांक चाचणी संतुलित (बॅलन्स्ड) आली. म्हणजे शंभर वजा वय या नियमानुसार ५० टक्के गुंतवणूक समभागसंलग्न साधनांत असायला हवी होती. प्रत्यक्षात केवळ ३५ टक्के (गुंतवणुकीत सर्व फंड ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड असल्याने) समभागसंलग्न गुंतवणुका आहेत; परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून केल्या गेलेल्या या गुंतवणुकीवरील परतावा केवळ ६.३० टक्के आहे. याच गुंतवणुका समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडात असत्या आणि ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक कमी केली असती तर ५ कोटीचा निवृत्ती कोष आणि पुण्यात घर घेण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले असते.

जगातील अंदाजे २० टक्के लोकसंख्या भारतात आहे. भारतीय लोकसंख्येची साक्षरता ७४ टक्के असली तरी केवळ २५ टक्के लोकसंख्या अर्थसाक्षर आहे. याच अर्थनिरक्षरतेमुळे बऱ्याच लोकांना असे वाटते की, ते अनुभव, निरीक्षण किंवा फक्त इतरांची कॉपी करून आर्थिक ज्ञान मिळवू शकतात. या कारणास्तव, ते कोणत्याही गुंतवणूक साधनांत त्या गुंतवणुकीतील धोक्यांचा विचार न करता गुंतवणूक करतात. कोणता फंड जास्त परतावा देत आहे त्या फंडाची ते निवड करतात. उच्च जोखीम क्षमता आणि रोकडसुलभता असूनही प्रत्यक्षात चुकीचे मालमत्ता विभाजन आणि चुकीच्या फंडांची निवड केल्याने साध्य होणारी वित्तीय ध्येये असाध्य झाली. यासाठी क्षमता असूनही सखोल ज्ञानाअभावी आणि ‘डीआयवाय’च्या मोहापायी नियोजन पूर्णपणे चुकलेले आहे.

वित्तीय ध्येयसेवानिवृत्तीअथर्वचे पदवीपर्यंत शिक्षण
उपलब्ध कालावधी१२ वर्षे६ वर्षे
ध्येयपूर्तीस आवश्यक रक्कम५.०० कोटी३५ लाख
आजपर्यंत केली गेलेली तरतूद५१ लाख१६ लाख

उपाय

दरमहा ४५ हजारांची बचत गरजेची दरमहा २५ हजारांची

पीपीएफ मुदतपूर्तीनंतर रकमेची ‘एसआयपी’ ८ वर्षांसाठी

समभागसंलग्न फंडात गुंतवणूक

( shreeyachebaba@gmail.com )