वर्ष २०२५ च्या दिनदर्शिकेचे जून अखेरपर्यंतच्या पहिल्या सहामाही कालावधीचा आढावा घेता, ‘ते वादळवाऱ्यातील सहा महिने होते’ असं म्हणायला हरकत नाही. यात भारत, पाकिस्तान युद्धाबरोबरच इराण-इस्रायल, रशिया-युक्रेन ही युद्ध, तर आर्थिक आघाडीवर, जगावर अमेरिकेने लादलेले ‘आयात करयुद्ध’ याचा समावेश होईल. अशा प्रतिकूलतेतच सहा महिने निघून गेले. भारत-पाकिस्तान युद्धाची व्याप्ती वाढली असती तर आपल्या अस्तित्वावर, आर्थिक स्तरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती.
पण भारतीय सैनिकांच्या शौर्य, पराक्रमामुळे भारताने अल्पावधीत युद्धात विजय संपादन करून हे युद्ध लवकर संपविले. यातून भारताची संरक्षणसिद्धता, भारतीय संरक्षण सामग्री उत्पादन कंपन्यांची श्रेष्ठता जगासमोर येते. या कंपन्यांच्या उत्पादनांना निर्यातीचे नवीन दालन उघडले गेले. या सर्व उलाथापालथीच्या दिवसांत निफ्टी निर्देशांक २१,७४३ वरून ३० जूनला २५,६६९ च्या परिघात मार्गक्रमण करत होता. गेल्या सहा महिन्यांतील निफ्टी निर्देशांकाचे हे सिंहावलोकन होते. आता पुढील सहा महिन्यांतील निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊया.
निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटताना आपण ‘इलियट वेव्ह’ संकल्पना व गॅन कालमापन पद्धती (गॅन टाइम सायकल) या दोन संकल्पनांचा आधार घेऊ. ‘इलियट वेव्ह’ संकल्पनेप्रमाणे निफ्टी निर्देशांकावर तिसरे चरण सुरू होत असल्याने, बाजारात जर तेजीची धारणा कायम राखायची असल्यास निफ्टी निर्देशांकांने २५,७०० चा टप्पा निर्णायकपणे पार करायला हवा. तो पार करत, २६,२७७ च्या पल्याड त्याने झेपावले पाहिजे, तरच निफ्टी निर्देशांकावर तेजी कायम राहील.
अन्यथा निफ्टी निर्देशांक २५,७०० चा टप्पा पार करण्यास आणि २५,००० ते २४,७०० चा टप्पा राखण्यास वारंवार अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २४,५००, तर द्वितीय खालचे लक्ष्य २४,००० ते २३,८०० असेल. हे गॅन कालमापन पद्धतीप्रमाणे ऑगस्ट महिन्यात साध्य होईल. या स्तरावरून निफ्टी निर्देशांकावर २७,५०० ते ३०,००० च्या उच्चांकी स्तराला गवसणी घालणारे तेजीचे नवीन पर्व सुरू होईल.
निकालपूर्व विश्लेषण
१) टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड
११ जुलैचा बंद भाव: ७०८.८० रु.
तिमाही वित्तीय निकाल: सोमवार, १४ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ७०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ८२५ रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६०० रुपयांपर्यंत घसरण
२) विप्रो लिमिटेड
११ जुलैचा बंद भाव: २५८.३० रु.
तिमाही वित्तीय निकाल: गुरुवार, १७ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २२५ रुपयांपर्यंत घसरण
३) एचडीएफसी बँक लिमिटेड
११ जुलैचा बंद भाव : १,९८३.७० रु.
तिमाही वित्तीय निकाल: शनिवार, १९ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,९५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १,९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,०२० रुपये, द्वितीय लक्ष्य २,०७० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: १,९५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८०० रुपयांपर्यंत घसरण
४) आयसीआयसीआय बँक लिमिटेड
११ जुलैचा बंद भाव: १,४२१.९० रु.
तिमाही वित्तीय निकाल: शनिवार, १९ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,४०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,४५०रुपये, द्वितीय लक्ष्य १,५०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: १,४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३७५ रुपयांपर्यंत घसरण
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.