सणासुदीच्या काळात, शुभमुहूर्तावर, घरातील व्यक्तींच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि अन्य शुभकार्याच्या वेळेला सोने आणि चांदीची खरेदी करणे आपल्याकडे पवित्र महत्त्वाचे मानले जाते. यामधील धार्मिक आस्था हा भाग वेगळा पण लोकांची एक मानसिकता झालेली असते की या दिवशी सोने-चांदी यासारखे मौल्यवान धातू आपल्याकडे यावेत व आपली बरकत व्हावी या उद्देशानेच ती खरेदी केली जाते.

बदलत्या काळानुसार आपण या सणासुदीच्या खरेदीमध्ये आधुनिक इन्स्ट्रुमेंट वापरात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. सोने-चांदी खरेदी करणे आणि ती गुंतवणूक म्हणून खरेदी करणे यातला फरक आपण समजून घेण्यास कुठेतरी चुकतो. सोन्याचे दागिने, घरात वापरण्याची चांदीची भांडी, नैवेद्यासाठी किंवा अगदी रोजच्या जेवणासाठी वापरण्यात येणारी चांदीची भांडी, यांची खरेदी हा आपला प्रत्येकाचा वैयक्तिक ‘चॉईस’ आहे. सोने आणि चांदी यांची खरेदी गुंतवणूक म्हणून करताना सोन्याचे तुकडे, सोन्याचे वळे किंवा नाणी विकत घेणे हे पर्याय वापरले जातात. गुंतवणुकीसाठी तो सोपा पर्याय असतो कारण एक, दोन, पाच दहा ग्रॅम अशा विविध पर्यायांमध्ये ही नाणी उपलब्ध असतात. मात्र प्रत्यक्षात काही वर्षानंतर तुम्ही हे सगळं विकायला गेलात तर तितक्याच रकमेचं सोनं मिळेल याची लेखी हमी कोणीही देत नाही. बऱ्याच वेळा फिजिकल गोल्ड म्हणजेच दागिन्यांच्या स्वरूपातील सोनं दहा-पंधरा वर्षानंतर विकायला गेल्यावर किंवा त्याचे वेगळे दागिने करायला गेल्यावर त्यामध्ये घट आकारली जाते. ही किती आकारायची याचा कोणताही सरकारी नियम नाही. त्यामुळेच आपण आपले अप्रत्यक्षरीत्या नुकसानच करत असतो. यासाठीच सोने खरेदीला आधुनिक पर्याय आता उपलब्ध झाला आहे तो म्हणजे सोन्याची ऑनलाइन स्वरूपातील खरेदी.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
umber gets the blessings of Goddess Lakshmi
Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
lucky rashi
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?

आणखी वाचा: Money Mantra: सोने- प्रत्यक्ष खरेदी, ईटीएफ की, सोव्हिरियन बॉण्ड? लाभदायी काय ठरेल?

सोनं ऑनलाईन विकत घेणं शक्य आहे का?

सोन्याची ऑनलाईन खरेदी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असेल किंवा डिमॅट अकाउंट नसेल तरीही करता येणे आता सहज शक्य झाले आहे. गोल्ड फंड किंवा गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) या माध्यमातून सोने खरेदी करणे हा सर्वात सोपा पर्याय आहे.

गोल्ड फंड आणि ईटीएफ यात फरक काय?

विविध म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांना गोल्ड फंड योजना उपलब्ध करून देत आहेत. या योजनेत आपण जे पैसे गुंतवतो त्याचं शुद्ध सोनं विकत घेतलं जातं आणि ते आपल्याला युनिटच्या स्वरूपात मिळतं. एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा एका गोल्ड फंडाची आजची एन. ए. व्ही. शंभर रुपये आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने त्यामध्ये दहा हजार रुपयाची गुंतवणूक केली तर दहा हजार भागिले १०० असे १०० युनिट्स त्याच्या पोर्टफोलिओमध्ये जमा होतील. जसजशी सोन्याची बाजारातील किंमत वाढेल म्हणजेच सोन्याचा बाजार भाव वाढेल तशी या गोल्ड फंडाची एन. ए .व्ही. सुद्धा वाढेल. ती वाढल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचे बाजार मूल्य (मार्केट रेट) सुद्धा वाढेल. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्यावेळी हे युनिट्स विकून टाकले की पैसे तुमच्या खात्याला जमा होतील. हे झालं गोल्ड फंडा विषयी. आता गोल्ड ईटीएफ म्हणजे काय हे समजून घेऊ.

आणखी वाचा: प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची: सोने तारण कर्ज किती प्रकारात मिळते?

गोल्ड ईटीएफ मध्ये तुम्हाला तुमच्या डिमॅट खात्याद्वारे सोन्यात गुंतवणूक करता येते. पद्धत तीच, तुम्ही जेवढ्या रुपयाचे ईटीएफ विकत घेता तेवढे युनिट्स तुमच्या खात्याला जमा होतात. तुम्हाला गुंतवणूक विकायची असेल तर डिमॅट अकाउंटमध्ये असलेले आपले शेअर्स आपण जसे विकतो तसेच हे ईटीएफ विकायचे. ईटीएफमध्ये शेअर्स सारखं ट्रेडिंग सुद्धा करता येतं म्हणूनच त्याला एक्सचेंज ट्रेडेड फंड असं म्हणतात.

ऑनलाईन खरेदीचे फायदे कोणते?

· सोने खरेदी केल्यावर आपल्याला आपल्या घरी ते सुरक्षितपणे ठेवावे लागते. ऑनलाइन माध्यमातून सोने खरेदी केल्यावर ते आपोआपच सांभाळून ठेवण्याची जोखीम संपून जाते.

· सोने खरेदी केल्यावर त्यावर मजुरी (मेकिंग चार्जेस) द्यावे लागतात. ऑनलाईन खरेदीमध्ये असे कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाहीत. समजा दर महिन्याला / दर वर्षाला तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी थोडं थोडं सोनं विकत घेतलं तर ते प्रत्यक्ष वितळवून दागिने करायची वेळ येईल तोपर्यंत सांभाळून ठेवावे लागेल. ऑनलाइन खरेदी विक्रीमध्ये हा कोणताही धोका नाही.

· तुम्ही कायदेशीररीत्या सोने खरेदी विक्रीचे व्यवहार करणार असलात (म्हणजे सर्वच गुंतवणूकदारांनी हे करणे अपेक्षित आहे हे मुद्दाम सांगायची आणि लिहायची गरज नाही) तर ऑनलाइन सोने खरेदी आणि विक्री सगळ्यात सोपी गोष्ट आहे. विकत घेतलेल्या सोन्याचे बिल सांभाळून ठेवावे लागते. ज्यावेळेला सोन्याची विक्री होते त्यावेळेला त्या दराने टॅक्स वगैरे याचा हिशोब करून मगच व्यवहार होतो. ऑनलाईन सोन्याची खरेदी विक्री केल्यावर आपोआपच सगळी स्टेटमेंट ऑनलाईनच उपलब्ध होतात त्यामुळे रिटर्न फाईल करताना त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.

ऑनलाईन सोन्यात गुंतवणूक एक प्रॅक्टिकल निर्णय

आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी शेअर, म्युच्युअल फंड, फिक्स इन्कम म्हणजेच बॉण्ड्स याचबरोबर असायला हवेत ते सोने आणि चांदी हे दोन मौल्यवान घटक. गेल्या शंभर वर्षाचा सोने आणि चांदीच्या दरांचा आढावा घेतला तर असे दिसून येते की ज्यावेळी इक्विटी आणि त्याच्याशी संबंधित बाजारात नरमाई असते त्यावेळी हमखास सोने आणि चांदीचा पोर्टफोलिओ मध्ये असण्याचा फायदा होतोच. बऱ्याच म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपल्या मल्टी असेट लोकेशन फंडात सोने आणि चांदीची गुंतवणूक ठेवली आहे. आपल्या पोर्टफोलिओला एक स्थिरता देणारी गुंतवणूक म्हणून सोन्यातील ऑनलाइन गुंतवणुकीचा पर्याय अवश्य विचारात घ्यावा. सगळे जोखीम घटक वाचून, समजून घेऊन गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करावी.