Higher Pension Option Deadline : जर तुम्ही १ सप्टेंबर २०१४ पूर्वी EPFO ​​चे सदस्य असाल आणि त्यानंतरही सदस्य राहिल्यास तुमच्याकडे निवृत्तीनंतरही जास्त पेन्शन मिळवण्याचा पर्याय आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) ने उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जूनपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आज तुमच्याकडे शेवटचा दिवस आहे. खरं तर जर तुम्ही खासगी नोकरीत असाल आणि तुमचे पैसे भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये कापले जातात, तसेच तुम्ही १० वर्षे काम केले असल्यास तुम्ही या पेन्शनसाठी पात्र आहात. तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेचा एक भाग पेन्शन फंडासाठी कर्मचारी पेन्शन स्कीम (EPS) मध्ये जातो.

उच्च पेन्शनचा पर्याय काय आहे?

सामान्य पेन्शन योजनेव्यतिरिक्त केंद्र सरकारने आता उच्च पेन्शनचा पर्यायही दिला आहे. जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ पूर्वी EPF चे सदस्य होते आणि त्यानंतरही सदस्य राहिले ते उच्च निवृत्ती वेतन पर्यायासाठी पात्र आहेत. या अंतर्गत तुम्हाला तुमच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या ८.३३ टक्के (लागू असल्यास) कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) योगदान देण्याचा पर्याय असेल. विशेष म्हणजे जर तुम्ही जास्त पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर EPFO ​​तुमच्या PF खात्यातून EPS ची रक्कम कापून घेईल. हे तुमच्या या योजनेत सामील होण्याच्या तारखेवर किंवा १ नोव्हेंबर १९९५ यापैकी ज्यांनी योगदान दिले असेल त्यावर आधारित असेल. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाल्यास दर महिन्याला कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या १२ टक्के + DA पीएफ खात्यात जमा केला जातो. नियोक्त्याचे योगदानदेखील केवळ १२ टक्के आहे. कंपनीने केलेल्या योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन फंड (EPS) मध्ये जाते आणि उर्वरित ३.६७ टक्के रक्कम पीएफ खात्यात जाते. सध्याच्या नियमांनुसार, पेन्शनपात्र वेतनाची कमाल मर्यादा १५ हजार रुपये आहे. या प्रकरणात १५००० X ८.३३/१०० = १२५० रुपये दरमहा त्याच्या पेन्शन खात्यात जातील. परंतु नवीन मर्यादेत पेन्शनपात्र वेतनाच्या कमाल मर्यादेवर पेन्शन न करता सध्याच्या मूळ पगारावर केली जाईल.

India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?
Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
ntpc and shipping corporation disinvestment
एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य

उच्च पेन्शन योजना : किती पेन्शन मिळणार?

तसेच ईपीएफओने अद्याप उच्च पेन्शन पर्यायासाठी कोणतेही नवीन कॅल्क्युलेटर दिलेले नाही; परंतु जुन्या कॅल्क्युलेटरच्या आधारे पाहिले तर त्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे.

कर्मचाऱ्याची मासिक पेन्शन = पेन्शनपात्र वेतन X पेन्शनपात्र सेवा /७०.

हेही वाचाः टाटांच्या TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; कमिशनमध्ये घेतले १०० कोटी, ४ अधिकारी निलंबित

मागील ६० महिन्यांचे मूळ वेतन १ लाख मग किती पेन्शन?

समजा तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी नोकरी सुरू केली आहे आणि तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त होत आहात. म्हणजेच तुमच्या नोकरीचा कालावधी ३३ वर्षे होता. EPS मधून बाहेर पडण्यापूर्वी तुमचा मागील ६० महिन्यांतील मूळ पगार १,००,००० रुपये आहे, असे गृहीत धरू या. EPS मधून बाहेर पडण्यापूर्वी मागील ६० महिन्यांतील कर्मचाऱ्याचा निवृत्ती वेतन हा त्याचा सरासरी मासिक पगार असतो. नवीन नियमात वास्तविक मूळ वेतनाच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाते.

मासिक पेन्शन: १,००,००० X ३३/७० = ४७१४३ रुपये

मागील ६० महिन्यांचा मूळ पगार ५० हजार

मासिक पेन्शन: ५०,००० X ३३/७० = २३५७१ रुपये

(सध्याच्या पेन्शन योजनेत कमाल पेन्शनपात्र पगारावर मर्यादा आहे आणि पेन्शन मूळ वेतनाच्या आधारावर केवळ १५००० रुपयांपर्यंत आहे. परंतु नवीन नियमात वास्तविक मूळ वेतन आधार मानला जाईल.)

२० वर्षांच्या सेवेवर आता किती पेन्शन मिळते?

जर एखाद्याचा मासिक पगार (गेल्या ६० महिन्यांच्या पगाराची सरासरी) १५ हजार रुपये असेल आणि नोकरीचा कालावधी २० वर्षे असेल तर….

मासिक पेन्शन: १५०००X २०/७० = ४२८६ रुपये

हेही वाचाः मुकेश अंबानी अन् एलॉन मस्क यांच्यात ‘ट्रेड वॉर’ भडकण्याची शक्यता, दोन अब्जाधीशांपैकी बाजारावर कोण राज्य करणार?

२५ वर्षांच्या सेवेवर किती पेन्शन?

मासिक पेन्शन: १५०००X २५/७० = ५३५७ रुपये

३० वर्षांच्या सेवेवर किती पेन्शन?

मासिक पेन्शन: १५०००X ३०/७० = ६४२९ रुपये

EPFO पोर्टल : उच्च पेन्शनसाठी अर्ज कसा करावा?

यासाठी सर्वप्रथम ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलवर जा.
लिंक: https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
यानंतर पेजच्या तळाशी उजव्या बाजूला ‘उच्च पगारावर निवृत्ती वेतन’ हा पर्याय निवडा.
त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यावर संयुक्त पर्यायांसाठी अर्ज फॉर्म निवडा.
UAN, नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर आणि शेवटी कॅप्चा कोड तपशील भरून OTP च्या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, जो भरल्यानंतर तपशीलांची पडताळणी करा.
भविष्य निर्वाह निधीतून पेन्शन फंडात कोणतेही समायोजन करायचे असल्यास किंवा निधीमध्ये पुन्हा जमा करायचे असल्यास अर्जामध्ये संमती मागितली जाईल.
एक्झम्प्टेड प्रॉव्हिडंट फंड ट्रस्टमधून पेन्शन फंडात निधी हस्तांतरित करायचा असल्यास पेमेंटच्या तारखेपर्यंत व्याजासह एक घोषणा सादर करावी लागेल.
आता फॉर्ममध्ये टाकलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी लागेल.
त्यानंतर अर्जाच्या अंतिम सबमिशनसाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर एक पावती क्रमांक दिसेल. अर्जदाराने तो क्रमांक नोंदवावा.