आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमावलेले पैसे वापरणे हा सोपा मार्ग आहेच. पण बऱ्याचदा आपल्या आर्थिक गरजा इतक्या मोठ्या असतात की आपण कमावलेले पैसे बचत करून वापरेपर्यंत त्या वस्तूची किंमत वाढत गेलेली असते आणि म्हणूनच सर्वांसाठी हक्काचा पर्याय उपलब्ध असतो तो म्हणजे कर्ज काढणे.

आयुष्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच जेव्हा नोकरी, व्यवसाय सुरू करून आपण पैसे कमवायला सुरुवात करतो त्यावेळी तरुणांची पहिली पसंती स्वतःच्या मालकीचे घर घेण्याची असते. पूर्वी असलेली एकत्र कुटुंब पद्धती आता हळूहळू संपत चालली आहे. लाईफस्टाईल जशी बदलते त्याप्रमाणे लोकांची घराची आवड सुद्धा वेगळी असते. मग आपल्या स्वप्नातील घर विकत घ्यायचे असले तर पैसे कुठून आणणार ? याचा सोपा मार्ग कर्ज काढून पैसे उभे करणे आणि त्यातून घर विकत घेणे हा आहे. घर पाहावं बांधून अशी एक म्हण आपल्याकडे आहे. घर बांधण्यासाठी जेवढे कष्ट येतात तेवढे कष्ट एखादा फ्लॅट विकत घेण्यासाठी येत नसले तरी दोघांसाठी पैसे लागणारच!

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
Gudi Padwa 2024 Wishes messages and quotes in Marathi
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

आणखी वाचा: Money Mantra: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या …

गृह कर्ज मिळवण्यासाठी काय कराल?
कर्ज देण्यासाठी बँक त्या व्यक्तीची जोखीम तपासते. ज्याला कर्ज द्यायचे त्या व्यक्तीकडे उत्पन्नाचे कोणते मार्ग आहे याचा विचार आधी केला जातो. तुम्ही जर सरकारी नोकरीत असाल तर शक्यतो गृह कर्ज मिळण्यासाठी फारसा त्रास होतच नाही, कारण तुमच्या दरमहा मिळणाऱ्या पगाराच्या दाखल्यातून तुम्ही गृह कर्जासाठी आपली मागणी करू शकता. जर तुम्ही खाजगी कंपनीत कामाला असाल तर बँका तुमच्याकडे मागच्या सहा महिन्याचे उत्पन्नाचे आकडे तपासणीसाठी मागू शकतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला सलग सहा महिने तरी पैसे मिळतात ना ? हे बँकेला जाणून घ्यायचं असतं. म्हणजेच तुमच्या सलग उत्पन्नाने बँकेला एक विश्वास मिळतो की आपण ज्याला कर्ज देतो आहे त्याची परतफेड करण्याची क्षमता आहे. कर्ज मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं असावी लागतात?

आणखी वाचा: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?

तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत असाल त्या कंपनीतून तुम्हाला जी सॅलरी स्लिप मिळते ती अत्यंत महत्त्वाची आहे. जर सॅलरी स्लिप देण्याची पद्धत नसेल तर पैसे ज्या खात्यात जमा होतात त्या खात्याचे मागचे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. कर्ज घेणारी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या शिस्तीची आहे हे समजण्यासाठी तुमचं प्रगती पुस्तक बघितलं जातं ते प्रगती पुस्तक म्हणजेच तुमचा ‘क्रेडिट स्कोर’. आपण ऑनलाइन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या सर्वांच्या माध्यमातून जे जे व्यवहार करतो त्या सर्वांचे आकडे डेटाबेस मध्ये उपलब्ध होतात. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरणे, आपण आधी एखादं कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाची वेळेत परतफेड न करणे याची आपल्या नावाची यादीच तयार होते ! कॉलेज लेक्चर न बसणाऱ्या मुलांची जशी यादी तयार करते तशी वेळेवर कर्ज परतफेड न करणाऱ्यांची ‘डिफॉल्टर लिस्ट’ तयार होते. तुम्ही सतत वेगवेगळे कर्ज घेऊन ते वेळेवर फेडले नाहीत तर तुमच्या क्रेडिट स्कोर वर त्याचा परिणाम होतो.

सर्वसाधारणपणे तुम्ही जेवढ्या रुपयाचे गृह कर्ज घेणार आहात ती रक्कम घराच्या किमतीच्या ऐंशी टक्के असते. उदाहरणार्थ जर तुम्ही 50 लाख रुपयांचे गृह कर्ज घेणार असाल तर दहा लाख रुपये तुमच्याकडे असावे लागतात आणि उरलेल्या 40 लाख रुपयांचे कर्ज बँक तुम्हाला देते. यासाठी पैसे कमवायला लागलात की नियमितपणे गुंतवणूक सुरू करा. तुमच्या नावावर गुंतवणूक आहे, बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट आहेत, म्युच्युअल फंड, शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे, तुम्ही विमा उतरवलेला आहे अशी चांगली प्रोफाइल कर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरते.