रिटायरमेंट प्लॅनिंग नक्की कधी सुरू करायचं या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी वेगवेगळे पर्याय असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. रिटायरमेंट प्लॅनिंगला अगदी तरुण वयात सुरुवात करणारेच आपला प्लॅन यशस्वीरित्या पूर्ण करतात.

आपल्या आयुष्यात कायमच एका ठरलेल्या गतीने वाढत राहणारी एक गोष्ट असते ती म्हणजे ‘आपलं वय’ जसजसं वय वाढतं तसं गरजा, उत्पन्न, जबाबदाऱ्या सगळच बदलत जातं. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब कर’ या वाक्याला स्मरूनच रिटायरमेंट प्लॅनिंग ला सुरुवात केली पाहिजे.

What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
How do you manage salary expenditures
कर्मचाऱ्यांनो​, महिन्याचा पगार लगेच संपतो; पगाराचे कसे नियोजन करावे? जाणून घ्या, खास टिप्स
market outlook, industrial smart cities, government announcement, GDP growth, fiscal discipline, infrastructure investment, stock market,
बाजार रंग : चाचणी परीक्षा आणि कंपन्यांचा अभ्यास
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
tax on shares marathi news
समभागाच्या ‘बायबॅक’वरील कर आकारणी
Pet crocodile attacked the owner who came to feed him video goes viral
VIDEO: मगरीला कोंबडी द्यायला गेलेल्या मालकालाच बनवलं शिकार; एका निर्णयामुळे तो कसा बचावला पाहाच
What happens to the body when you eat tulsi leaves
रोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

विशी ? तिशी ? की चाळीशी ?

शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवणे व्यवसाय सुरू करणे आणि त्यामध्ये थोडीशी स्थिरता येणे यामध्ये वयाची जवळपास ३० वर्ष निघून जातात. मग रिटायरमेंट प्लॅनिंगला कधी सुरुवात करायची ? रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करायचं ते कमवायला लागल्यापासूनच !

थोडसं वाचताना हसू येईल पण हेच सत्य आहे. आपल्याला आपले आत्ताचे लाईफस्टाईल उपभोगण्यासाठी लागणारे खर्च भविष्यात तसेच सुरू ठेवायचे असतील तर किती पैसे लागतील याचं गणित जुळवल्यावर आपोआपच तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग लवकर करणे का गरजेचे आहे हे समजेल.

आणखी वाचा: Money Mantra: रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे नक्की काय?

रिटायरमेंटच्या वेळी हाताशी किती पैसे हवे ?

रिटायरमेंट च्या वेळी आपल्याला एक ‘कॉर्पस’ तयार करावा लागतो. या जमलेल्या पैशातून गुंतवणूक करून दर महिन्याला पेन्शन सारखे पैसे हाताशी येतील अशी सोय करणे अपेक्षित आहे. पण किती पैसे लागणार याचा हवेत अंदाज बांधणे चुकीचे आहे.

पुढील चेकलिस्ट नीट समजून घ्या

· तुमचे दरमहा उत्पन्न किती?

· तुमचे उत्पन्न दरवर्षी किती टक्क्याने वाढायची शक्यता आहे?

· महागाईचा दर किती आहे?

· तुमच्याकडे रिटायरमेंट प्लॅनिंगला सुरुवात करताना किती रुपये आधीपासूनच बचत करून ठेवलेले आहेत ?

त्यासाठी आकडेवारी विचारात घ्यायला हवी. आपण एका उदाहरणाने प्रयत्न करून करून बघूया.

विवेकला सध्या मिळणारे वार्षिक पॅकेज, त्याचा हाऊसिंग लोन वरचा ईएमआय आणि घरखर्च याचा विचार करून दरमहा चाळीस हजार रुपये खर्चासाठी लागतात असे गृहीत धरूया. आज विवेकचे वय ३० आहे तर वयाच्या ५५व्या वर्षी त्याच्याकडे किती रुपये असले पाहिजेत ? याचे गणित सोडवावे लागेल.

आणखी वाचा: Money Mantra: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या पोर्टफोलिओत हवाच!

विवेकचे आत्ताचे वार्षिक पॅकेज बारा लाख रुपये आहे आणि दरवर्षी त्याचे उत्पन्न आठ टक्क्याने वाढणार आहे असे गृहीत धरले आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी त्याच्याकडे फिक्स डिपॉझिटमध्ये पाच लाख रुपये गुंतवलेले आहेत. मग त्याच्याकडे रिटायरमेंट जवळ येईपर्यंत किती पैसे जमले पाहिजेत याचे गणित मांडावे लागेल. महागाईचा दर सात टक्के आणि व्याजाचा दर बारा टक्के एवढा गृहीत धरला तर विवेकला त्याच्या 55व्या वर्षी अंदाजे साडेसात कोटी रुपये रिटायरमेंट फंड म्हणून तयार ठेवावे लागतील तर त्यातून उरलेले आयुष्य त्याला सुखाने आणि कोणतीही पैशाची अडचण न येता जगणे सोपे होईल.

हे पैसे कसे तयार होतील?

हा फंड कसा उभारता येईल याचे उत्तर म्हणजे म्युच्युअल फंड अर्थात इक्विटी म्युच्युअल फंड ! एसआयपी म्हणजे काय आपल्याला माहिती असेलच इक्विटी म्युच्युअल फंडात दरमहा २५ हजार रुपयाची गुंतवणूक सलग सुरू ठेवली तर वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत (बारा टक्के एवढा परताव्याचा दर येथे गृहीत धरला आहे) रिटायरमेंट फंड तयार होईल. गेल्या ३० वर्षाचा भारतातील शेअर बाजाराचा अभ्यास केल्यास व आकडेवारी तपासल्यास म्युच्युअल फंडातील इक्विटी योजनांनी समाधानकारक परतावा दिला आहे पण सलगपणे २५ वर्षे गुंतवणूक करणे वाटते तेवढे सोपे नाही. रिटायरमेंट प्लॅनिंगच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी करताना त्यातील जोखीम समजून घेणे आवश्यक आहे. जे पैसे आपल्याला रिटायरमेंटला हवे आहेत ते पैसे अनावश्यक गरजांसाठी मध्येच वापरणे, केलेली गुंतवणूक विकून खर्च करणे कटाक्षाने टाळायला हवे.

चला तर मग गुंतवणुकीचा विचार आजच सुरू करायला हवा हे तुम्हाला आता पटलं असेल. आपल्या गरजा आणि आपलं भविष्य या दोघांचा एकत्रित विचार जे करतात तेच उत्तम रिटायरमेंट प्लॅनिंग करतात हे विसरून चालणार नाही.