• रवी सिंघल

शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमी असलं तरी फायदेशीर ठरू शकते. खरं तर पहिल्यांदाच शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काही धोकेसुद्धा आहेत. या गुंतागुंतीच्या परिस्थितीत आर्थिक फायदा मिळवण्यासाठी काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. नवीन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना मदत मिळावी, यासाठी तुम्ही गुंतवणूक करताना काय करावे आणि करू नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून गुंतवणूक करताना तुमची जोखीम कमी होईल.

हे नक्कीच करा

shares
विदेशी गुंतवणूकदार माघारी, मे महिन्यात २२,००० कोटी मूल्याच्या समभागांची विक्री
niti aayog member dr vinod k paul article praising national health policy 2017
पहिली बाजू : आरोग्यावरील खर्चाचा भार हलका!
Capital Gains, Taxability, Sale of Mutual Fund, Capital Gains Sale of Mutual Fund Units, equity mutual fund, small cap mutual fund, large cap mutual fund, mid cap mutual fund, date mutual fund, systematic investment planning, tax on mutual fund profit, money mantra, finance article marathi,
Money Mantra: म्युच्युअल फंडाच्या युनिट्स विक्रीपश्चात होणारा भांडवली नफा व करदायीत्व
BECIL Recruitment 2024
BECIL Recruitment 2024 : पदवीधारकांना नोकरीची संधी! ३० हजार पगार मिळणार, आजच अर्ज करा
fake ORS and health risk
तुम्ही ‘बनावटी’ ORS तर पीत नाही ना? ‘शारीरिक त्रास ते मेंदूला सूज’, होऊ शकतात गंभीर समस्या! डॉक्टरांचा सल्ला पाहा
upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु

वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करा

वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणे हे गुंतवणुकीचे मूलभूत तत्त्व आहे, कारण ते जोखीम कमी करण्याबरोबरच संभाव्य परतावा वाढविण्यात मदत करते. तुमची गुंतवणूक विविध मालमत्ता, विभाग आणि बाजार चक्रांमध्ये केल्यास कोणत्याही एका गुंतवणुकीत खराब कामगिरीचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळेल. गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे किंवा सखोल संशोधन करणे महत्त्वाचे आहे.

नियमितपणे गुंतवणूक करीत राहा

नियमितपणे गुंतवणूक करणे हा एक सुज्ञ गुंतवणुकीचा दृष्टिकोन आहे, जो तुम्हाला कालांतराने संपत्ती निर्माण करण्यात मदत करू शकतो. गुंतवणुकीसाठी सातत्याने पैशाचे वेगवेगळ्या योजना आणि शेअर्समध्ये वाटप करून तुम्ही चक्रवाढ शक्तीचा लाभ घेऊ शकता आणि बाजाराच्या वेळेशी संबंधित जोखीम कमी करू शकता. मागील दिलेली माहिती सामान्य ज्ञान आहे आणि ती म्हणजे आर्थिक सल्ला नव्हे. गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी कृपया आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या किंवा त्याचा सखोल अभ्यास करा.

ज्ञानाच्या आधारावर गुंतवणूक करा

शेअर बाजारात प्रवेश करण्यापूर्वी मूलभूत आर्थिक संकल्पना, गुंतवणूक धोरणे आणि बाजारातील गतिशीलता यांची ठोस माहिती घेणे महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचा, सेमिनारमध्ये भाग घ्या आणि तुमचा ज्ञानाचा आधार तयार करण्यासाठी ऑनलाइन संसाधनांचा वापर करा.

गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल अभ्यास करा

तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत आहात, त्यावर सखोल अभ्यास करा. त्यांची आर्थिक स्टेटमेन्ट, व्यवसाय मॉडेल, स्पर्धात्मक फायदे आणि वाढीच्या शक्यतांचे विश्लेषण करा. माहितीपूर्ण गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी गुणात्मक आणि परिमाणात्मक दोन्ही घटकांचा विचार करा. शेअर्स कमी किमतीत असताना खरेदी करा. स्टॉकच्या किमती वाढतील की नाही हे तपासण्यासाठी अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा. इतर जे काही सांगतात ते सगळंच ऐकू नका आणि तुम्ही जे ऐकता ते सर्व अंमलात आणू नका.

हेही वाचाः EPFO: १ लाख पगारावर ४७ हजारांहून अधिक पेन्शन मिळणार; आज शेवटच्या दिवशीच निर्णय घेण्याची संधी

जेव्हा शेअर बाजारात अस्थिरता येते, तेव्हा संयम आणि शिस्त बाळगा

बाजारातील अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदारांनी संयम आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन राखणे महत्त्वाचे आहे. आर्थिक निर्देशक, भू-राजकीय घटना किंवा गुंतवणूकदारांच्या भावना यांसारख्या विविध घटकांमुळे किमतीत वेगाने चढ-उतार होऊ शकतात. या काळात भावनिक प्रतिक्रिया देणे आणि घाईघाईने निर्णय घेणे हे घातक ठरू शकते, परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की यशस्वी गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे.

हे अजिबात करू नका:

अफवेवर आधारित स्टॉक खरेदी करू नका

शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आणि केवळ अफवा, तज्ज्ञांच्या टिप्स, शिफारसी किंवा सट्टेबाज बातम्यांवर आधारित गुंतवणुकीचे निर्णय घेणे टाळले पाहिजे. हॉट टिप्स किंवा आतल्या माहितीवरून कृती करणे घातक ठरू शकते, परंतु अशा सूत्रांमध्ये अनेकदा विश्वासार्हता नसते, तसेच त्यांचे हितसंबंधही असू शकतात. त्याऐवजी विश्वसनीय बातम्या, अचूक माहिती आणि चांगले विश्लेषण यावर अवलंबून राहणे महत्त्वाचे आहे.

‘गॅरंटी’ किंवा ‘निश्चित परतावा’ यांसारख्या शब्दांवर विश्वास ठेवू नका

शेअर बाजारातील हमी किंवा खात्रीशीर परताव्याचे कोणतेही दावे किंवा आश्वासनांपासून सावध राहणे आवश्यक आहे. स्टॉक मार्केटचे स्वरूप हे अनिश्चितता आणि अस्थिरतेवर आधारित आहे. गुंतवणूक परतावा हा आर्थिक परिस्थिती, बाजारातील गतिशीलता, कंपनीची कामगिरी आणि गुंतवणूकदारांच्या भावना यांसह विविध घटकांच्या अधीन असतात.

हेही वाचाः Money Mantra: ‘या’ सरकारी योजनेत २५ लाखांच्या ठेवींवर ११ लाखांपेक्षा जास्त व्याज मिळणार अन् FD पेक्षा जास्त परतावा

तुमचे सर्व भांडवल एकाच वेळी गुंतवू नका

तुमचे सर्व उपलब्ध भांडवल एकाच वेळी गुंतवणे सामान्यतः योग्य नाही. त्याऐवजी कालांतराने तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या शेअर्समध्ये करून डॉलर आणि रुपयाच्या किमतीवर लक्ष ठेवा. ही रणनीती तुम्हाला किमती कमी असताना अधिक शेअर्स आणि किमती जास्त असताना कमी शेअर्स खरेदी करण्यास मदत करते. ओव्हरट्रेडिंग आणि वारंवार खरेदी-विक्रीमुळे व्यवहाराचा जास्त खर्च होऊ शकतो आणि एकूण परतावा कमी होतो. झटपट नफ्याचा पाठलाग करणे किंवा सट्टा ट्रेडिंग धोरणांमध्ये गुंतवणूक करणे टाळा, कारण त्यात मोठी जोखीम असते.

कोणत्याही योजनेशिवाय गुंतवणूक करू नका

स्पष्ट योजनेशिवाय गुंतवणूक करणे म्हणजे एक प्रकारे आपत्तीला निमंत्रण आहे. आवेगपूर्ण निर्णय घेणे किंवा बाजारातील अफवांचे अनुसरण करणे टाळा. एक चांगली परिभाषित गुंतवणूक योजना तयार करा आणि त्यास चिकटून राहा. बदलत्या परिस्थितीनुसार तुमच्या योजनेचे नियमितपणे पुनरावलोकन करा आणि समायोजित करा.

तळटीप:

(ज्ञान, शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा एक प्रकारे फायद्याचा प्रयत्न असू शकतो. वर वर्णन केलेल्या काय करावे आणि काय करू नये याचे अनुसरण करून पहिल्यांदाच गुंतवणूक करू शकतात.)

( लेखक रवी सिंघल हे जीसीएल ब्रोकिंगमध्ये सीईओ आहेत.)