मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) देशांतर्गत भांडवली बाजारात समभाग विक्रीचा मारा सुरू ठेवला असून विद्यमान महिन्यात १५ मेपर्यंत त्यांनी २२,००० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. तर त्याआधीच्या एप्रिल महिन्यात २१,५२४ कोटी रुपये भांडवली बाजारातून काढून घेतले होते.

परदेशी गुंतवणूकदारांची ५ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सेदारी असलेल्या शंभरहून अधिक कंपन्यांमध्ये समभाग विक्री केल्याने, त्या कंपन्यांचे समभाग १० टक्के ते ३० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. या कालावधीत निफ्टी निर्देशांकात १.७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Foreign investors continue pulling out funds
विश्लेषण : भांडवली बाजारातून परदेशी गुंतवणूकदार माघारी का फिरत आहेत? 
Eknath Shinde and Sanjay Raut (1)
संजय राऊतांचे थेट मोदींना पत्र, ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी असल्याचा दावा
The price of gold is increasing
सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढतीच; गुंतवणूकदारांनी काय करावे?
Pune Rickshaw driver, Demand Action, Pune Rickshaw driver Demand Action, Pollution and Traffic, auto driver manifesto, auto driver in pune
निवडणुकीच्या तोंडावर रिक्षाचालकांचा जाहीरनामा! उमेदवारांकडे केल्या या प्रमुख मागण्या…
Hundreds of investors were cheated of five and a half crores
दामदुप्पटीचे आमिष! ‘बंटी-बबली’ने केली तब्बल साडेपाच कोटींनी फसवणूक
Resident doctors, attacked,
दीड वर्षात निवासी डॉक्टरांवर नऊ वेळा हल्ले, सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी ‘मार्ड’चे राज्य सरकारला पत्र
man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams
शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही

हेही वाचा : सीमेन्समधून सीमेन्स एनर्जी लिमिटेड वेगळी होणार

परदेशी गुंतवणूकदारांकडून सध्या नफावसुलीला प्राधान्य दिले आहे. शिवाय जोखीम कमी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असून सुरक्षित गुंतवणूक साधनांकडे त्यांनी होरा वळवला आहे. देशात सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू असल्यानेही बाजारातील अस्थिरता वाढली आहे. त्या परिणामी गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागांमध्येदेखील विक्रीचा मारा केला आहे, असे मत इक्वोनॉमिक्स रिसर्चचे संस्थापकचे जी. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.

कोणत्या कंपन्यांना फटका?

गेल्या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक हिस्सेदारी असलेल्या पैसा लो डिजिटल, ॲस्टर डीएम हेल्थ, सोनाटा सॉफ्टवेअर, गुजरात स्टेट पेट्रोनेट, कोफोर्ज आणि बिर्लासॉफ्ट या कंपन्यांच्या समभागांच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्के घसरण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्रीबरोबरच अनेक कंपन्यांची तिमाही कामगिरी अपेक्षेप्रमाणे न आल्याने विक्रीचा मारा अधिक तीव्र झाला.

हेही वाचा : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला चकाकी! तोळ्यामागे १,५०० रुपयांची वाढ, तरी जोमदार मागणीचा सराफांचा दावा

कल बदल

वर्ष २०१९ आणि वर्ष २०१४ मध्ये झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांसमयी परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावला होता. वर्ष २०१९ मधील निवडणुकीच्या निकालांपूर्वीच्या दोन महिन्यांत सुमारे २५,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग, तर २०१४ मध्ये निवडणूकपूर्व दोन महिन्यांत ३६,५०० कोटी रुपये मूल्याची समभाग खरेदी त्यांच्याकडून झाली होती. मात्र यंदा कल पूर्णपणे बदलला असून परदेशी गुंतवणूकदारांनी निवडणुकीच्या हंगामात आतापर्यंत ४३,५४० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकण्याला प्राधान्य दिले आहे.

हेही वाचा : ‘गो डिजिट’चा २,६१५ कोटींचा ‘आयपीओ’ विराट कोहलीला २६३ टक्क्यांचा बहुप्रसवा परतावा शक्य

सेन्सेक्स ७२,९८७.०३ -११७.५८ -०.१६%
निफ्टी २२,२००.५५ -१७.३० -०.०८%
डॉलर ८३.५० -१ पैसा
तेल ८२.५५ ०.२१