scorecardresearch

Premium

Money Mantra : क्रेडिट कार्ड EMI मध्ये १८ टक्के जास्त पैसे का भरावे लागतात? No Cost EMI खरोखर मोफत आहे का?

काही वेळा तुम्हाला उशिरा पेमेंट पेनल्टी म्हणून मोठी रक्कम भरावी लागू शकते. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डाने मोठी खरेदी केली असेल आणि देय तारखेपर्यंत संपूर्ण रक्कम परत करणे कठीण वाटत असेल, तर एक उपाय म्हणजे संपूर्ण पेमेंट ईएमआयमध्ये रूपांतरित करून टाका.

Understand charges linked to your Credit card EMI
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

Understand charges linked to your Credit card EMI : जर क्रेडिट कार्डची थकबाकी दिलेल्या तारखेपर्यंत पूर्ण भरली नाही, तर मोठे व्याज भरावे लागते हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच माहीत असेल. कधी कधी हे व्याज वार्षिक ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. तसेच काही वेळा तुम्हाला उशिरा पेमेंट पेनल्टी म्हणून मोठी रक्कम भरावी लागू शकते. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डाने मोठी खरेदी केली असेल आणि देय तारखेपर्यंत संपूर्ण रक्कम परत करणे कठीण वाटत असेल, तर एक उपाय म्हणजे संपूर्ण पेमेंट ईएमआयमध्ये रूपांतरित करून टाका. अशा ईएमआयवर आकारले जाणारे व्याज संपूर्ण रक्कम न भरल्यास भरावे लागणार्‍या व्याजापेक्षा कमी असते. पण तुम्हाला माहीत आहे का? की क्रेडिट कार्ड ईएमआयमध्ये नमूद केलेल्या व्याजाव्यतिरिक्त १८ टक्के अतिरिक्त पैसे देखील भरावे लागतात. फायनान्शिअल एक्सप्रेसने यासंदर्भात माहिती दिली आहे.

हेही वाचाः शेअर बाजारातील उत्साहानं बँक निफ्टी निर्देशांकाने गाठला उच्चांक, नवा इतिहास रचलाh

how to install dashcam in car
Car tips : गाडीमध्ये ‘डॅश-कॅम’ कसा लावावा? या चार सोप्या स्टेप्स करतील तुमची मदत
Extension of deadline for Paytm Bank
पेटीएम बँकेच्या व्यवहारांना मुदतवाढ, रिझर्व्ह बँकेचा नेमका आदेश काय? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं!
What happens to your body if you sleep after midnight every day Does Sleeping at 12 Am Cause Weight Gain Cholesterol Boost Remedies
रोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय
cdac recruitment 2024
C-DAC मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअरसह ‘या’ पदासाठी मोठी भरती, जाणून घ्या अर्ज करायची प्रक्रिया, पात्रतेचे निकष

‘No Cost EMI’ देखील विनाखर्च नाही

अनेक वेळा तुम्हाला क्रेडिट कार्ड कंपनी/किरकोळ विक्रेत्याकडून संपूर्ण रक्कम ‘नो कॉस्ट ईएमआय’ मध्ये रूपांतरित करण्यासाठी ऑफरदेखील मिळते. सामान्यतः लोक याकडे खूप आकर्षित होतात. त्यांना वाटते की, ‘नो कॉस्ट ईएमआय’ म्हणजे तुम्ही जेवढे खरेदी केले आहेत तेवढेच पैसे द्यावे लागतील. याशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. पण सर्वसाधारणपणे असे होत नाही. अनेकदा ‘नो कॉस्ट ईएमआय’चीही एक वेगळी किंमत असते. जर तुम्ही या सुविधेचा लाभ घेण्याचे ठरवले आणि तुम्हाला याची माहिती नसेल, तर क्रेडिट कार्डचा ईएमआय भरताना तुम्हाला धक्का बसू शकतो.

हेही वाचाः चंदा कोचर यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

क्रेडिट कार्डच्या व्याजावर जीएसटी लागू असतो

तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की, तुम्हाला क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरील व्याजावर वस्तू आणि सेवा कर (GST) देखील भरावा लागेल. खरं तर अनेक सेवा आणि वित्तीय संस्थांचे शुल्क जीएसटीच्या कक्षेत समाविष्ट आहेत, ज्याचा भार शेवटी ग्राहकांवर पडतो. क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे व्याजदेखील या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे, ज्यावर १८ टक्के दराने जीएसटी भरावा लागेल. हा जीएसटी क्रेडिट कार्ड व्यवहारांवरील व्याजावर लावला जातो. साहजिकच जर तुम्ही क्रेडिट कार्डचा खर्च EMI मध्ये रूपांतरित केला, तर जेव्हा बिल येईल तेव्हा तुम्हाला व्याजावर १८ टक्के GST देखील भरावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही EMI साठी २० टक्के व्याज देत असाल, तर त्यावर १८ टक्के GST जोडल्यानंतर व्याजाची एकूण किंमत २३.६ टक्के होणार आहे.

‘No Cost EMI’ वर जीएसटी का?

तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की जर आमचा ईएमआय ‘नो कॉस्ट’ आहे, तर त्यावर जीएसटी का लावला जातो? किंबहुना नो-कॉस्ट ईएमआयच्या बाबतीतही का लागू असतो. खरं तर क्रेडिट कार्ड कंपनी व्याज आकारत नाही, असे सहसा घडत नाही. क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक व्याज आकारते, परंतु वस्तूंची विक्री करणारा किरकोळ विक्रेता तुम्हाला तात्काळ सवलत म्हणून EMI च्या संपूर्ण कार्यकाळात आकारलेल्या व्याजाइतकी रक्कम ऑफर करतो. म्हणूनच या EMI ची तुम्हाला किंमत नाही, असा दावा केला जातो. परंतु ऑफर केलेल्या सवलतीमध्ये सहसा फक्त ईएमआय व्याज समाविष्ट असते आणि त्या व्याजावर सरकारकडून आकारला जाणारा जीएसटी नसतो! उदाहरणार्थ, जर क्रेडिट कार्ड EMI वर वार्षिक २० टक्के व्याज असेल, तर तुम्हाला त्यावर १८ टक्के GST भरावा लागेल, जो एकूण EMI रकमेच्या ३.६ टक्के असेल. म्हणजेच तुम्हाला एवढी किंमत नो कॉस्ट ईएमआयमध्ये भरावी लागेल. याशिवाय तुम्हाला प्रोसेसिंग फी किंवा इतर कोणत्याही शुल्काच्या रूपात आणखी काही पैसे द्यावे लागतील. म्हणून जर तुम्ही क्रेडिट कार्ड खरेदीचे EMI किंवा No Cost EMI मध्ये रूपांतर करण्याचा विचार करत असाल तर प्रथम हे सर्व अतिरिक्त खर्च जोडून त्याची किंमत समजून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know your credit card emi why pay 18 percent more in credit card emis is no cost emi really free vrd

First published on: 09-12-2023 at 12:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×