‘कर्त्यां’च्या तिमाही आढाव्यात स्मॉल कॅप फंड गटात कोटक स्मॉलकॅप फंडाची जागा फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाने घेतली. जोखीम परतावा गुणोत्तर हा फंड निवडीत महत्त्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये संपत्ती निर्मितीचा दर आणि वैविध्य हे वेगवेगळे असतात. तथापि, बहुतेक गुंतवणूकदार फंडांच्या मागील कामगिरीचे मूल्यांकन करून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा किंवा पैसे काढून घेण्याचा निर्णय घेतात. म्युच्युअल फंडाचे मूल्यमापन करण्यासाठी किंवा त्याच्या फंड गटातील अन्य स्पर्धक फंडांची तुलना करण्यासाठी ते त्या त्या फंडांनी परताव्यांना एक मापदंड मानतात. मात्र बाजारातील अस्थिरतेमुळे पराताव्यावर विसंबून फंडाची निवड करणे घातक ठरू शकते.

गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांच्या जोखमीचाही (अस्थिरतेचा) विचार केला पाहिजे, प्रमाणित विचलन (स्टॅंडर्ड डेव्हिएशन) हे जोखीम मोजण्याची पद्धत आहे. परतावा आणि जोखीम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच, गुंतवणुकीच्या जोखमींचे मूल्यांकन करून परताव्याचे अर्थपूर्ण मूल्यांकन करणे महत्त्वाचे असते.

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

हेही वाचा – प्राप्तिकर कायदा म्हणजे नेमका काय? करदात्याचे किती प्रकार असतात?

जोखीम-परतावा गुणोत्तर हे दिलेल्या गुंतवणुकीतून संभाव्य नफा ते संभाव्य तोटा यांचे दिशा दर्शन करते. उच्च जोखीम-उच्च परतावा गुणोत्तर हे सामान्यतः श्रेयस्कर असते. कारण ते अनावश्यक जोखीम न घेता गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची क्षमता देते. जोखीम परतावा जास्त असलेले गुणोत्तर असे सूचित करते की, गुंतवणूक जास्त धोकादायक असू शकते. गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओसाठी योग्य गुणोत्तर ठरवताना त्यांची जोखीम सहनशीलता आणि गुंतवणुकीची उद्दिष्टे उपलब्ध कालावधी यांचा विचार केला पाहिजे. गुंतवणुकीत विविधता आणणे, संरक्षणात्मक रणनीतीचा अवलंब करणे आवश्यक असते. म्युच्युअल फंडातील जोखमीची पातळी निधी व्यवस्थापक कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात यावर अवलंबून असते. प्रत्येक मालमत्ता वर्ग, जसे की समभाग, रोखे अन्य मौल्यवान धातू जिन्नस यावर ठरत असते. साधारणपणे, म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमधील रोखे आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये सर्वात कमी जोखीम असते. तर समभाग जोखीम-परताव्याच्या दुसऱ्या टोकाला असतात. त्यातही स्मॉलकॅप आणि थिमॅटिक फंड यांच्यात तीव्र जोखीम असते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, उच्च जोखीम म्हणजे उच्च परतावा नव्हे. आज कोटक स्मॉलकॅप फंड परतावा मिळविण्यासाठी सतत उच्च जोखीम घेत असूनही कमी परतावा मिळवीत आहे.

Kotak Smallcap Fund

जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने विस्तारते आहे. फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडचे उद्दिष्ट पुरेशी नफा क्षमता आणि व्यवसाय वृद्धीक्षम अशा कंपन्यांत गुंतवणूक करण्याची संधी शोधण्याचे आहे. हा फंड येत्या काही वर्षांत भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान देतील अशा कंपन्यांत गुंतवणूक करतो. मूलभूतपणे मजबूत ताळेबंद असलेल्या स्मॉल-कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणे हे या फंडाच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहे. फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड प्रामुख्याने ज्यांचा दीर्घ कालावधीसाठी वाढीचा प्रवास सुरू आहे अशा प्रारंभी आणि कमी प्रमाणात गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करतो. फंडाची बहुतांश गुंतवणूक स्मॉल-कॅप कंपन्यांत आहे. या फंडाची सुरुवात १३ जानेवारी २००६ रोजी झाल्यापासून, फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाने ७,५९२ कोटींच्या मालमत्तेवर १४.४८ टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. याच कालावधीत फंडाचा मानदंड असलेल्या निफ्टी स्मॉल कॅप २५० ने १२.४५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. चलत परतावा ( रोलिंग रिटर्न्स) हे निश्चित काळखंडासाठी जसे की प्रत्येक दिवशी/ साप्ताहिक /मसिक / वार्षिक या विशिष्ट कालावधीसाठी (रोलिंग रिटर्न्स पिरीयड) घेतलेले आणि कालावधीच्या शेवटच्या दिवसापर्यंत घेतलेले वार्षिक परतावा आहे. फंडाच्या तीन वर्षांच्या परताव्याचा आणि त्याच्या मानदांडाने दिलेल्या पराताव्याशी तुलना केली असता चलत परतावा हे फंडाच्या कामगिरीचे सर्वोत्तम मोजमाप आहे. दुसरीकडे, रोलिंग रिटर्न्स, कोणताही पक्षपात न करता, सर्व कालावधीत फंडाची परिपूर्ण आणि सापेक्ष कामगिरीचे मोजमाप करते. परिणामी, म्युच्युअल फंड गुंतवणुकीशी संबंधित जोखीम विविध गुणोत्तरे जसे की, शार्प गुणोत्तर, सॉर्टिनो गुणोत्तर, मानक विचलन आणि ट्रेनर गुणोत्तर वापरून परिमाण करता येतात. या गुणोत्तरांचे मूल्यांकन केल्यास हा फंड सर्व स्मॉलकॅप फंडात अव्वल ठरतो.

हेही वाचा – प्राप्तिकर कायद्यातील ई-पडताळणी योजना माहीत आहे का? जाणून घ्या तिचे फायदे

फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा आर जानकीरामन आणि कृष्ण प्रसाद नटराजन यांच्याकडे आहे. फंडाच्या पोर्टफोलिओची रचना निधी व्यवस्थापकांनी अत्यंत काळजीपूर्वक केली आहे. फंडाची गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण आहे. त्यापैकी, एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३३ टक्के गुंतवणूक बँकांत आहे. त्यानंतर औद्योगिक उत्पादने २१ टक्के, ग्राहक टिकाऊ वस्तू १५ टक्के आणि बांधकाम १३ टक्के आहे. उर्वरित क्षेत्रांमध्ये पेट्रोलियम उत्पादने, एरोस्पेस आणि संरक्षण, किरकोळ, वित्तीय सेवा आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ७४.९२ टक्के स्मॉलकॅप, ११.८५ टक्के मिडकॅप आणि ६.१९ टक्के लार्जकॅप कंपन्यांचा समावेश आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, ब्रिगेड एंटरप्राइस, दीपक नायट्राइट आयडीआयसीआय बँक, जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स, कार्बोरंडम युनिव्हर्सल, करुर वैश्य बँक, फिनोलेक्स केबल, सीसीएल प्रॉडक्ट्स आणि एचडीएफसी बँक या शीर्ष १० कंपन्या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत ७८ कंपन्यांचा समावेश आहे. निधी व्यवस्थापकांनी ३० एप्रिलच्या तपशिलानुसार, सिएट लिमिटेडला गुंतवणुकीतून वगळले तर हिताची एनर्जीचा नव्याने समावेश केला.

निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक २०१७ ते २०२३ या कालावधीत दीर्घकाळ एकाच टप्प्यात रेंगाळत होता. निर्देशांकाने २०१७ मध्ये शिखर गाठून खालच्या दिशेने प्रवास केला. पुन्हा जानेवारी २२ मध्ये नवीन शिखर गाठून पुन्हा निर्देशांक खाली आला आहे. तांत्रिक विश्लेषणानुसार, निर्देशांक सहा आठ महिन्यांत नवे शिखर गाठेल असा अंदाज व्यक्त होत आहे. स्मॉलकॅप कंपन्यांसाठी सरकारी धोरणे सकारत्मक ठरत आहेत. फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड त्याच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसह या तेजीचा लाभ घेण्यास सज्ज झाल्याचे दिसत असल्याने ज्या गुंतवणूकदारांना जोखीम स्वीकारून मोठा परतावा मिळविण्याची आस आहे, अशा गुंतवणूकदारांनी या फंडाची निवड करावी. बकुळीची फुले जशी नाजूक असतात मात्र, सुकल्यावरसुद्धा सुगंध देतात तसा हा फंड स्मॉलकॅपमधून परताव्याचा रतीब घालेल अशी शक्यता आहे. आर जानकीरामन, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापक, इमर्जिंग मार्केट्स इक्विटीज टेम्पलटन इंडिया.