कौस्तुभ जोशी

मोदी सरकारच्या निवडणुकीच्या आधीच्या इंटरिम बजेटच्या आठवड्यात बाजार दोन महिन्यातील आठवड्यातील चढ-उतारांना विराम मिळाला. आठवड्याअखेरीस निफ्टी दोन टक्क्यांनी वाढलेला दिसला, निफ्टी ५०० अंकांनी वाढून २१८५३वर तर सेंसेक्स १३८४ अंकांनी वाढून ७२०८५वर बंद झाला.

Cyber ​​fraud with woman,
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची सायबर फसवणूक
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
Even before the arrival of Padwa festival the price of gold is over 72 thousand
पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे!

सरकारने जाहीर केलेल्या अंतरीम अर्थसंकल्पात कोणत्याही आकर्षक योजना नसल्या तरीही बाजाराने  अर्थसंकल्पाचे स्वागतच केल्याचे दिसून आले. पुढील तीन वर्षात सरकारी खर्च आटोक्यात ठेवून फिस्कल डेफिसिट कमी करण्यात येईल या सरकारी घोषणेचे मार्केटने स्वागत केलेले दिसले.

मागच्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे बाजारामध्ये तेजी मंदीचा खेळ सुरू होता त्याला विराम मिळाला आणि स्मॉल आणि मिडकॅप मार्केटमध्ये सुद्धा तेजी दिसली. बीएसई  स्मॉल कॅप इंडेक्स या आठवड्यात तीन टक्क्यांनी वाढलेला दिसला.

हेही वाचा >>>Money Mantra: क्रेडिट कार्डाचे किती प्रकार असतात?

शक्ती पंप, पंजाब अँड सिंध बँक, इंडिया टुरिझम, आय आर बी इन्फ्रा या कंपन्यांमध्ये दणदणीत वाढ दिसून आली मिडकॅप कंपन्यांचा निर्देशांक बीएससी मिडकॅप सुद्धा तीन टक्क्यांनी वाढला.

युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, एस जे व्ही एन, एन एच पी सी,  बँक ऑफ इंडिया या शेअर्समध्ये दणदणीत खरेदी झालेली दिसली.

गेल्या आठवड्याचा विचार करता रिलायन्सच्या शेअरमध्ये ९ % वाढ झालेली दिसली. तीन महिन्याचा याच शेअरचा वाढीचा दर जवळपास ३० टक्के इतका आहे. ३० जानेवारी रोजी रिलायन्सचा शेअर २९१९ या उच्चांक पातळीला पोचला होता तो स्वतःचाच रेकॉर्ड मोडून २ फेब्रुवारी रोजी रिलायन्सचा शेअर २९५० या पातळीवर बंद झालेला दिसला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे बाजार मूल्य विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहे. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी, स्टेट बँक आणि पावर ग्रिड यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरलेले दिसले.

या आठवड्यातील आणखी एक जाणवलेली बाब म्हणजे देशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात सढळ हस्ते पैसे ओतले. जवळपास दहा हजार कोटी रुपयांचे शेअर्स भारतीय गुंतवणूकदारांनी विकत घेतल्याचे दिसून आले.  या महिन्याच्या सुरुवातीला जी आकडेवारी जाहीर झाली त्यानुसार जानेवारी महिन्यात एफ आय आय गुंतवणूकदारांनी एकूण ३६ हजार कोटी रुपयांची विक्री केली तर डी आय आय म्हणजेच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २६,७०० कोटीची खरेदी केली.

हेही वाचा >>>Money Mantra: DICGC- तुमच्या ठेवी आणि गुंतवणूक सुरक्षित ठेवणारी व्यवस्था

बजेट आणि मार्केटचा उत्साह

गेल्या दहा दिवसात पुढील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

·        एन बी सी सी ४७%

·        शक्ती पंप ४१%

·        पंजाब आणि सिंध बँक ४०%

·        के पी आय ग्रीन एनर्जी ३८%

·        इन्फिबीम  अवेन्यू ३२%

·        आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर ३१ %

·        बालमेर लॉरी २९ %

·        वक्रांगी २७%

·        हुडको २७%

·        शिपिंग कॉर्पोरेशन २६%

·        टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन २५%

·        एन एन एम डी सी २०%

अमेरिकन आणि युरोपीय बाजार सावरत असल्यामुळे भारतातील आयटी कंपन्यांचे व्यवसाय पुन्हा एकदा वाढतील या अपेक्षेने आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी यायला सुरुवात झाली आहे. इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी आणि विप्रो या शेअर्समध्ये तीन टक्क्यांनी वाढ दिसून आली.

स्टेट बँकेचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर

निव्वळ नफा ३५ टक्क्यांनी घसरून ९१६३ कोटींवर स्थिरावला. आज जाहीर झालेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निकालात एनपीएचे प्रमाण सुधारलेले दिसले. असे असले तरी मागील वर्षीच्या याच तिमाही मध्ये बँकेला झालेल्या नफ्यापेक्षा या वर्षीचा नफा कमी झालेला दिसतो आहे. पेन्शन साठी आणि बुडीत कर्जांसाठी केलेल्या तरतुदीमुळे हे झाले आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. बचत खाते आणि चालू  खाते यांचा वाढीचा दर ४% असून बँकेचे फिक्स डिपॉझिट १३ टक्क्यांनी वाढलेले आहेत. स्टेट बँकेने या तिमाहीत दिलेल्या कर्जामध्ये १४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. जोखमीशी संबंधित असलेला कॅपिटल एडीक्वसी  रेशो १३ टक्के आहे.

आठवड्याच्या अखेरीस पेटीएम या कंपनीबाबत रिझर्व बँकेचे निर्णय आणि निर्बंध जाहीर होताच त्या कंपनीचा शेअर गडगडून एकाच दिवसात २०% पेक्षाही जास्त खाली आला. दोन दिवसात पेटीएम चा भाव ४० टक्क्यांनी घसरला. दरम्यान सिंगापूरच्या मॉर्गन स्टॅनले एशिया या कंपनीने पेटीएम मध्ये झालेल्या घसरणीचा फायदा घेत ५० लाख शेअर्स विकत घेतले आहेत शुक्रवारी बाजार बंद होता ना ४८७ रुपये या नीचांकी पातळीवर तो बंद झाला.