Post Office Small Savings Schemes : एकाच कंपनीत काम करणाऱ्या राहुल आणि संतोष यांनी प्रत्येकी १० लाख रुपये बाजारात गुंतवण्याची योजना आखली. राहुलने सल्लागाराच्या सल्ल्याने पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केली अन् भांडवली बाजाराबरोबरच छोट्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवले. पण संतोषने जास्त परताव्याच्या लालसेने संपूर्ण पैसा इक्विटीमध्ये गुंतवला. संतोषने इक्विटी निवडताना काळजी घेतली नाही आणि गेल्या १ वर्षात त्याचा पोर्टफोलिओ घसरला. पण राहुलचे पैसे ठरलेल्या व्याजानुसार वाढत आहेत.

किंबहुना आजच्या काळात प्रत्येक जण आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा शोधत असतो. या कारणास्तव अनेक लोक अल्प बचत योजनांकडे दुर्लक्ष करतात. त्याऐवजी ते भांडवली बाजाराकडे वळतात. पण हा समज चुकीचा आहे. एखाद्याला पोर्टफोलिओ संतुलित करणे आवश्यक आहे. म्हणून अशा योजनांमध्ये गुंतवणुकीचा काही भाग ठेवा, जिथे तुम्हाला १०० टक्के सुरक्षिततेसह हमी परतावा मिळेल. भांडवली बाजारात तोटा झाला, तर आपत्कालीन परिस्थितीत या योजना कामी येतील.

cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू

हेही वाचाः बीएसईकडून शेअर बायबॅकची घोषणा; ८१६ रुपयांच्या दराने शेअर्स खरेदी करणार

पोस्ट ऑफिसच्या योजनांतही १०० टक्के सुरक्षेसह हमी परतावा मिळतो. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भात माहिती दिली आहे. पोस्ट ऑफिस अनेक सर्वोत्तम आणि लोकप्रिय लहान बचत योजना ऑफर करते. यामध्ये टाइम डिपॉझिट (TD), राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना (MIS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP), सुकन्या समृद्धी योजना (SSY), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव (RD) यांचा समावेश आहे. पोस्ट ऑफिस बचत योजना अधिक चांगल्या आहेत, कारण तुमचे जमा केलेले पैसे येथे सुरक्षित राहतात. येथे जमा होणारा निधी सरकारच्या कामांसाठी वापरला जातो. त्यामुळे सरकार त्यांना सार्वभौम हमी देते. म्हणजे गुंतवणुकीवर १०० टक्के सुरक्षा मिळते. यामध्ये काही योजनांवर करमाफीचा लाभही मिळतो. यामध्ये निश्चित व्याजानुसार परतावा मिळतो.

हेही वाचाः अदाणी समूहाला आणखी एक झटका; आधी शेअर्स घसरले, आता ‘या’ कंपनीचे मोठे नुकसान झाले

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

व्याजदर : वार्षिक ७.१ टक्के
वार्षिक कमाल गुंतवणूक: १.५ लाख रुपये
किमान गुंतवणूक: ५०० रुपये
मॅच्युरिटी: १५ वर्षे, परंतु आणखी ५ वर्षे वाढवण्याच्या पर्यायासह
कर लाभ: EEE श्रेणी

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

व्याजदर : वार्षिक ८.२ टक्के
परिपक्वता: ५ वर्षे
कमाल ठेव: १५ लाख
किमान ठेव: १००० रुपये
कर लाभ: गुंतवणुकीवर ८० सी अंतर्गत वार्षिक १.५० वजा केले जातात. आर्थिक वर्षात मिळालेले व्याज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास TDS कापला जातो.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

व्याजदर : ८.०% प्रतिवर्ष
परिपक्वता: २१ वर्षे
कमाल ठेव: वार्षिक १.५० लाख
किमान ठेव: २५० रुपये
कर लाभ: EEE श्रेणी
म्हणजेच वार्षिक १.५० लाख गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलत, मिळालेल्या व्याजावरील कर सूट आणि परिपक्वतेवर मिळालेली रक्कम देखील करमुक्त आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

व्याजदर: वार्षिक ७.७ टक्के
परिपक्वता: ५ वर्षे
कमाल ठेव: कोणतीही मर्यादा नाही
किमान ठेव: १००० रुपये
कर लाभ: १.५० रुपयांपर्यंत गुंतवलेली रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे.

टाइम डिपॉझिट (TD)

१ वर्षाच्या योजनेवर व्याज : ६.९% प्रतिवर्ष
२ वर्षांच्या योजनेवर व्याज : ७.०% प्रतिवर्ष
३ वर्षांच्या योजनेवर व्याज : ७.०% प्रतिवर्ष
५ वर्षांच्या योजनेवर व्याज : ७.७% प्रतिवर्ष
कमाल ठेव: कोणतीही मर्यादा नाही
किमान ठेव: १००० रुपये
कर लाभ: १.५० पर्यंत गुंतवलेल्या रकमेवर ८० सी अंतर्गत कर सूट. परंतु व्याजातून मिळणारे उत्पन्न ४० हजार किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास टीडीएस कापला जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा ५० हजार आहे.

आवर्ती ठेव (RD)

व्याजदर : वार्षिक ६.५ टक्के
कमाल ठेव: कोणतीही मर्यादा नाही
किमान ठेव: १०० रुपये मासिक
मॅच्युरिटी: ५ वर्षे, जी आणखी ५ वर्षे वाढवली जाऊ शकते.
कर लाभ: नाही
जर RD चे व्याज उत्पन्न ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर १० टक्के TDS आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५०,००० रुपये आहे.

किसान विकास पत्र (KVP)

व्याजदर : वार्षिक ७.५ टक्के
परिपक्वता: ११५ महिने
कमाल ठेव: कोणतीही मर्यादा नाही
किमान ठेव: १००० रुपये
कर लाभ: नाही

मासिक उत्पन्न योजना (MIS)

व्याजदर : वार्षिक ७.४ टक्के
मॅच्युरिटी: ५ वर्षे, त्यानंतर त्यावेळच्या व्याजानुसार ५ वर्षांसाठी नवीन खाते उघडता येते
कमाल ठेव: ४.५० एकल खाते, ९ लाख संयुक्त खाते
कर लाभ: नाही