सुधाकर कुलकर्णी

विवाहानंतर पती-पत्नी दोघांच्याही आयुष्यात बऱ्याच गोष्टींत बदल होत असतात. या बदलांना वेळीच योग्यरित्या सामोरे गेल्यास पुढील वैवाहिक आयुष्य सुकर होण्यास मदत होते. यातील प्रमुख बाब म्हणजे आर्थिक नियोजन. विवाहाआधी व त्यानंतर दोघांची आर्थिक परिस्थिती सारखी असेलच, असे नाही. किंबहुना बऱ्याच वेळा दोघांचीही आर्थिक परिस्थिती विवाहापूर्वी भिन्न असल्याचे दिसून येते आणि दोघानंही एकत्र बसून त्यांचे आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक असते.

It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

आर्थिक नियोजनातील अगदी महत्त्वाची बाब म्हणजे दोघांनीही आपली इन्शुरन्सची गरज नेमकी किती आहे आणि ती कशी पूर्ण करायची हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण- त्यानुसार इन्शुरन्स पॉलिसिज लवकरात लवकर घेणे आवश्यक असते. या बाबतीत प्रामुख्याने वेगवेगळ्या दोन प्रकारे विचार करणे गरजेचे असते. त्यातील पहिला प्रकार म्हणजे दाम्पत्यामधील केवळ एकच व्यक्ती कमावती आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे दोघेही कमावते आहेत. त्या दृष्टीने आपण दोन्ही प्रकारांत इन्शुरन्सबाबत नेमका कसा विचार करणे गरजेचे आहे हे आता आपण पाहू.

यातील पहिला प्रकार म्हणजे दाम्पत्यातील केवळ एकच व्यक्ती कमावती असणे

अशी कुटुंबे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात आणि अशा कुटुंबासाठी योग्य व आवश्यक ते इन्शुरन्स कव्हरेज किती असावे आणि ते कसे मिळवावे लागेल?

उदाहरणार्थ पाटील यांचे वय ३३ वर्षांचे आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील आई व वडील (वय अनुक्रमे ५७ व ६१) – (सामान्यत: पतीचे वय जास्त असते म्हणून), पत्नी वय वर्षे ३० व मुले वय वर्षे ५ व १ असे एकूण सहा जण त्यांच्यावर अवलंबून आहेत. पाटील स्वत: व्यावसायिक असून, त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे १५ लाख इतके आहे. मग त्यांना कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स कव्हर असायला हवे आणि ते किती असणे गरजेचे आहे, हे आता पाहू.

सर्वसाधारणपणे आयुर्विमा (लाइफ इन्शुरन्स), आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) व अपघात विमा (ॲक्सिडेंट इन्शुरन्स), तसेच होम लोन असल्यास होम लोन इन्शुरन्स या चार प्रकारचे विमा संरक्षण प्रत्येकाला असणे गरजेचे असते. पाटील यांचे वार्षिक उत्पन्न विचारात घेता, त्यांना किमान रु. १.५ कोटीचे लाइफ इन्शुरन्स कव्हर असणे गरजेचे आहे. (आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते १२ पट लाइफ इन्शुरन्स कव्हर असणे गरजेचे असते) तर आई-वडिलांसाठी किमान रु. १० लाख आणि स्वत: व पत्नी, मुलांसाठी मिळून किमान रु. ५ ते ७ लाख, असे हेल्थ इन्शुरन्स कव्हर; तर स्वत:साठी किमान रु. २५ लाख एवढे अपघात विमा कव्हर असणे गरजेचे आहे.

हेही वाचा… EPFO: १ लाख पगारावर ४७ हजारांहून अधिक पेन्शन मिळणार; आज शेवटच्या दिवशीच निर्णय घेण्याची संधी

इन्शुरन्स पॉलिसिज घेताना कमीत कमी प्रीमियम देऊन जास्तीत जास्त कव्हर कसे मिळेल हे पाहणे गरजेचे असते. पाटील यांनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना गुंतवणूक हा दृष्टिकोन न ठेवता कमीत कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त कव्हर देणारी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे योग्य ठरेल. त्यांचे वय (३३) विचारात घेता, असे कव्हर पुढील २५ ते ३० वर्षांसाठी किमान रु.१.५ कोटी इतकी सम ॲश्युअर्ड असणारी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यास वार्षिक सुमारे रु. १५,००० ते १७,००० इतका प्रीमियम असेल (इन्शुरन्स कंपनीनुसार प्रीमियम कमी-अधिक असू शकतो; तसेच पॉलिसी घेताना पाटील यांना आरोग्याविषयी कुठल्याही समस्या नसतील हे गृहीत धरून).

अशी पॉलिसी घेतल्याने दुर्दैवाने पाटील यांचे पॉलिसीच्या कालावधीत कुठल्याही कारणाने निधन झाले, तर त्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी रु. १.५ कोटी क्लेमपोटी मिळतील आणि ही रक्कम किमान पुढील १० -१२ वर्षे कुटुंबीयांसाठी पुरेशी असेल. दरम्यानच्या काळात मुलेही कमवू लागतील आणि कुटुंबापुढे गंभीर आर्थिक समस्या उदभवणार नाही. जर पॉलिसीची मुदत संपताना पाटील हयात असतील, तर त्यांना मॅच्युरिटी क्लेम मिळणार नाही.

हेही वाचा… बाजारातील माणसं : जिम रॅाजर्स : जगाच्या बाजारातील न टाळता येणारे नाव

याउलट जर पाटील यांनी रु. १५,००० वार्षिक प्रीमियम असणारी पारंपरिक इंडोमेंट पॉलिसी घेतली, तर त्यांना सुमारे रु. तीन लाख सम ॲश्युअर्ड असणारी पॉलिसी मिळेल; पण समजा, त्यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले, तर बोनस धरून सुमारे रु. पाच लाख इतकीच क्लेमची रक्कम कुटुंबीयांना मिळेल; ज्यामुळे कुटुंबीयांच्या आर्थिक समस्या सुटण्यास फारशी मदत होणार नाही.

जर सुदैवाने पाटील २५ वर्षांनंतर (पॉलिसी कालावधी संपताना) हयात असतील, तर त्यांना सुमारे रु. नऊ लाख मॅच्युरिटी क्लेमपोटी मिळतील आणि २५ वर्षांनंतर ही रक्कम फार मोठी असणार नाही. थोडक्यात- पाटील यांनी रु. १.५ कोटी कव्हर असणारी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणेच योग्य राहील. (लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना ॲक्सिडेंट रायडर, डिसॅबिलिटी रायडर, तसेच क्रिटिकल केअर रायडर घेणे निश्चितच फायद्याचे असते. मात्र, यासाठी वाढीव प्रीमियम द्यावा लागतो. रायडरयुक्त पॉलिसी घेताना त्याचे फायदे आणि अतितोटे समजून घेणे आवश्यक असते.