scorecardresearch

Premium

Money Mantra : कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्यांसाठी आरबीआयचा ‘हा’ नियम ठरणार फायदेशीर

‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवून असते. एका रिपोर्टनुसार, लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत आहे.

RBI Loan Rule
(फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

RBI Loan Rule: आजकाल बरेच लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. गृह कर्ज, कार कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज, असे कर्जाचे अनेक प्रकार आहेत. जर तुम्ही देखील बँकेकडून कर्ज घेतले असेल तर तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नियम माहीत असले पाहिजेत. हे RBI नियम तुम्हाला डिफॉल्टपासून वाचवतील आणि EMI कमी करण्यात मदत करतील.

हेही वाचाः ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताच्या वाटचालीत जैव अर्थव्यवस्थेसह नॅनो सायन्सचे लक्षणीय योगदान- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Bank Holiday in February 2024
Bank Holiday in February 2024 : फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद?
Northern Coalfields Limited Recruitment 2024 invited applications for 152 Assistant Foreman posts
NCL Recruitment 2024: नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत ‘या’ पदाच्या जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील
Siggi a company is offering $10000 if you can stay off your phone for a month here's how to apply
महिनाभर मोबाईल फोनशिवाय राहून दाखवा आणि कमवा ८ लाख रुपये; ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर
persistent systems likely to cut campus hiring of freshers
यंदा ‘कॅम्पस मुलाखती’तून फ्रेशर्सच्या थेट भरतीत घट शक्य; पुण्यात मुख्यालय असलेल्या पर्सिस्टंट सिस्टीम्सकडून सुस्पष्ट कबुली

नियम काय आहेत?

‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवून असते. एका रिपोर्टनुसार, लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत आहे. कोविडपूर्व काळापासून वैयक्तिक कर्जातही वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, तुम्ही १० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, परंतु तुम्ही काही कारणास्तव ते परत करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता. यासह तुम्हाला नंतर ५ लाख रुपये द्यावे लागतील आणि उर्वरित ५ लाख रुपये दीर्घ कालावधीसाठी हळूहळू भरता येतील. यामुळे तुमच्यावरील EMI चा दबावही कमी होईल.

हेही वाचाः BSE नंतर आता NSE चे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलर पार, बाजारातील वाढ कायम

नेमका फायदा जाणून घ्या

लोकांसाठी कर्जाची पुनर्रचना करणे हा एक चांगला पर्याय आहे, कारण ते त्यांच्याकडून कर्ज परतफेडीचा टॅग काढून टाकण्यास मदत करते. जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज थकबाकीदार बनते, तेव्हा त्याचा क्रेडिट इतिहास खराब होतो. यामुळे CIBIL स्कोअरही घसरू शकतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेण्याचे मार्ग बंद होऊ शकतो. कर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक तुमचा CIBIL स्कोर एकदा तपासते. तो त्याच्या मानकांनुसार असेल तरच कर्ज मंजूर करतो. अन्यथा कर्जाची रक्कम नाकारली जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money mantra rbi rule will be beneficial for defaulters vrd

First published on: 04-12-2023 at 18:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×