अनेकदा आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामासाठी कर्ज घ्यावे लागते. बँका आणि वित्तीय संस्था प्रामुख्याने दोन प्रकारची कर्जे देतात. त्यापैकी पहिले सुरक्षित कर्ज असते आणि दुसरे असुरक्षित कर्ज आहे. या दोन्ही प्रकारच्या कर्जांबद्दल आपण तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.

सुरक्षित कर्ज म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सुरक्षित कर्ज हे असं कर्ज आहे, ज्यासाठी तुम्हाला काही तारण द्यावे लागते. समजा तुम्हाला पैशांची गरज आहे, तर तुम्ही सोने गहाण ठेवून व्याजावर पैसे घेऊ शकता, याला सुरक्षित कर्ज म्हणतात. म्हणजे तुम्ही तुमच्या मालमत्तेवर कर्ज घेतले आहे. याला सुरक्षित म्हटले जाते, कारण तुमचे सोने वित्तीय संस्थेकडे सुरक्षितता म्हणून ठेवले जाते. जर तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही, तर ते तुमचे सोने विकून तुम्ही पैशांची परतफेड करू शकता. सोन्याव्यतिरिक्त तुमचे घर आणि तुमची कारदेखील तारण म्हणून जमा केली जाऊ शकते.

हेही वाचाः बॉस असावा तर असा! बायजूच्या मालकाने स्वतःचं राहतं घर गहाण ठेवत १५ हजार कर्मचाऱ्यांचा दिला पगार

असुरक्षित कर्ज म्हणजे काय?

सुरक्षित कर्जाच्या उलट असुरक्षित कर्ज आहे. या कर्जामध्ये बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला पैसे देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तारण मागत नाहीत. याचा अर्थ तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. अशा कर्जांमध्ये कर्जदाराकडे अधिक संसाधने असतात, म्हणून सामान्यतः असुरक्षित कर्जावरील व्याज जास्त असते. असुरक्षित कर्ज तुम्हाला तुमच्या क्रेडिट इतिहासाच्या आधारावर दिले जाते. असुरक्षित कर्जे जसे की, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, विद्यार्थी कर्ज इत्यादी असतात.

हेही वाचाः रिझर्व्ह बँकेने कडक कारवाई करत महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द, आता ग्राहकांच्या पैशाचे काय होणार?

तुमच्यासाठी कोणते कर्ज योग्य?

सुरक्षित कर्ज सहज आणि त्वरित उपलब्ध आहे. साधारणपणे सावकार सुरक्षित कर्ज देण्यास मागेपुढे पाहत नाहीत, कारण त्यांच्याकडे तुमच्या काही वस्तू तारण म्हणून असतात. सुरक्षित कर्जामध्ये तुम्हाला परतफेडीसाठी अधिक वेळ मिळतो आणि व्याजदरही कमी असतो. याशिवाय तुम्हाला आणखी कर्ज मिळण्याची शक्यता असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे तुम्हाला असुरक्षित कर्ज त्वरित मिळू शकते, परंतु ते जास्त व्याजदर आकारते. तसेच कर्ज परतफेडीची मर्यादादेखील कमी आहे. दोन्ही कर्जाची वैशिष्ट्ये पाहिल्यास लोकांना अधिक सुरक्षित कर्ज आवडते, त्यामुळे तुमच्यासाठी कर्जाचा सर्वोत्तम पर्याय कोणता असेल हे तुमच्या कर्जाच्या गरजेवर अवलंबून आहे. जर तुमच्याकडे कोणतीही मालमत्ता नसेल तर असुरक्षित कर्ज तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.