धावपटूने भरधाव वेगाने इच्छित लक्ष्य पार केल्यास, तो धावपटू प्रचंड थकतो. त्याला विश्रांताची गरज असते. मात्र अगदी काही काळ विश्रांतीतून तो ताजातवाना होऊन शर्यत जिंकल्याचा आनंदा साजरा करतो. असेच काहीसे निफ्टीच्या बाबतीत घडत आहे. निफ्टी निर्देशांकाने २४,५८७ वरून, २६,१०४ पर्यंत १,५०० अंशांची वरची चाल अवघ्या २३ दिवसांत अतिजलद पद्धतीने (भूमिती श्रेणीने) पूर्ण केल्याने, निर्देशांकाला क्षणिक विश्रांतीची गरज आहे. या विश्रांतीची / घसरणीची मानसिक तयारी गेल्या लेखात आपण करून घेतलेली होती. गेल्या लेखातील वाक्य होतं… ‘अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी १,००० ते १,५०० अंशांची घसरण गृहीत धरून भविष्यकालीन वाटचाल करावी.’ हे वाक्य आपण आताच्या घडीला अनुभवत आहोत.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २५,५०० हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असून या स्तराभोवती आपण आपले लक्ष केंद्रित करूया. निफ्टी निर्देशांक सातत्याने पंधरा दिवस २५,५०० च्या स्तरावर टिकल्यास त्याचे वरचे लक्ष्य २५,७०० ते २५,८०० आणि द्वितीय लक्ष्य २६,००० ते २६,१०० असे असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करता, निफ्टी निर्देशांक सातत्याने २५,५०० स्तराखाली टिकल्यास त्याचे खालचे लक्ष्य हे २५,३५० ते २५,१५० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २५,००० ते २४,७०० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड

७ नोव्हेंबरचा बंद भाव : १,१५३ रुपये

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, १० नोव्हेंबर

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,१३० रुपये

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,१३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,३२० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : १,१३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९५० रुपयांपर्यंत घसरण

२) बजाज फिनसर्व्ह लिमिटेड

७ नोव्हेंबरचा बंद भाव : २,१०२.१० रुपये

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, ११ नोव्हेंबर

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,०५० रुपये

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून २,०५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,२०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,३०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: २,०५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,९५० रुपयांपर्यंत घसरण.

३) भारत फोर्ज लिमिटेड

७ नोव्हेंबरचा बंद भाव : १,३१७.१० रुपये

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, ११ नोव्हेंबर

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,२५० रुपये

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,२५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,४८० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : १,२५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,१०० रुपयांपर्यंत घसरण

४) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड

७ नोव्हेंबरचा बंद भाव : २,६७८.३० रुपये

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, ११ नोव्हेंबर

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : २,५५० रुपये

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून २,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,९०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,००० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास :२,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,३०० रुपयांपर्यंत घसरण.

५) टाटा पाॅवर कंपनी लिमिटेड : ७ नोव्हेंबरचा बंद भाव : ३९३.२०रु. /

तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार,११ नोव्हेंबर / महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ३८० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ३८० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ४१० रुपये, द्वितीय लक्ष्य ४४० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: ३८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३५० रुपयांपर्यंत घसरण.

(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत, ई-मेल: ashishthakur1966@gmail.com)

अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीनआहेत.अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी‘स्टाॅप लाॅस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.