आजकाल मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय लोक क्रेडीट कार्ड मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत , दिवसेंदिवस क्रेडिट कार्डाचा वापर वाढतच चालला आहे. क्रेडिट कार्ड वापरणे ही खरे तर एक खूप चांगली सुविधा आहे. यामुळे कार्डधारकास एक उचल मर्यादा मिळत असते याला क्रेडिट लाईन असे म्हणतात, आपली आर्थिक क्षमता विचारात घेऊन ही क्रेडिट लाईन दिली जाते व पुढे कार्डावरील व्यवहार समाधानकारक असल्यास ही मर्यादा वेळोवेळी वाढविली जाते. क्रेडिट कार्ड वापरून आपण किमान २० तर कमाल ५० दिवस इतक्या काळासाठी क्रेडिट लाईनपर्यंतची रक्कम बिनव्याजी वापरू शकतो. या शिवाय क्रेडिट कार्ड वरील खरेदीमुळे रिवार्ड पॉइंट, तसेच डिस्काऊंट, एअरपोर्ट वर लाउंज सुविधा मिळत असते. असं असलं तरी क्रेडिट कार्ड हे एक दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर जर योग्य पद्धतीने झाला नाही तर आर्थिक नुकसान तसंच सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा खराब होऊ शकते. त्या दृष्टीने क्रेडीट कार्ड वापरताना काय खबरदारी घ्यावी हे आपण पाहू.

1) आपण क्रेडिट कार्डावर केलेल्या पेमेंटचे बिल आपल्या कारच्या बिलिंग सायकलनुसार दरमहा येत असते. बिलाची तारीख व पेमेंट करण्याची तारीख यात साधारणपणे २० दिवसांचा कालावधी असतो आणि या काकाव्धीत पेमेंट केले तर खर्च केलेले पैसे आपण बिनव्याजी वापरता परंतु आपण जर बिलाचे पेमेंट देय तारखेपर्यंत केले नाही तर बिलाच्या तारखेपासून ते पेमेंट करेपर्यंत संपूर्ण बिलाच्या रकमेवर ३०% ते ४०% इतक्या चढ्या दराने व्याज आकारले जाते आणि म्हणून वेळेत बिल भरण्याची खबरदारी कार्ड धारकाने घेणे आवश्यक असते.

unified pension scheme
Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
Russian Modi Industry group company Tata Steel Career
बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी
Health Insurance, CIS in Health Insurance, Health news,
Money Mantra : हेल्थ इन्शुरन्समध्ये CIS काय असतं? ते का महत्त्वाचं आहे?
stock market crash
शेअर बाजारात तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Nirav Modi Letter of Understanding bank Business |
हिरा है सदा के लिये! – उत्तरार्ध
Portfolio Swaraj Engines Limited Product business print eco news
माझा पोर्टफोलिओ : पोर्टफोलिओला ‘ऊर्जावान’ भविष्याची ग्वाही

हेही वाचा : क्षेत्र अभ्यास : इन्फ्रा- पोर्टफोलिओची पायाभूत बांधणी

2) आपल्याकडे पैसे नसले तरी क्रेडिट कार्ड जवळ असल्याने बऱ्याचदा अनावश्यक खरेदी केली जाते , तर कधी डिस्काऊंट, कॅशबॅक, हप्त्याने परतफेड यासारख्या प्रलोभानामुळे आपल्या ऐपती पेक्षा जास्त खर्च होतो व परिणामी क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरणे शक्य होत नाही व वर उल्लेखिलेल्या प्रमाणे ३०% ते ४०% इतके व्याज भरणे भाग पडते. प्रसंगी संपूर्ण बिल रक्कम भरण्यास बराच कालावधी लागतो किंवा भरणे शक्य होत नाही, त्या दृष्टीने आपल्याला जेवढी रक्कम वेळेत भरणे शक्य आहे तेवढ्या रकमेपर्यंतच क्रेडिट कार्डाने पेमेंट करावे.

3) काही कारणाने जर बिलाची रक्कम वेळेत भरणे शक्य झाले नाही किंवा भरताच आली नाही किंवा वरचेवर बिल रक्कम भरण्यास उशीर झाला तर आपला क्रेडिट स्कोर खराब होतो परिणामी अन्य आवश्यक कर्ज (उदा: होम लोन , व्हेईकल लोन, एज्युकेशन लोनई.) मिळणे दुरापास्त होऊन जाते.

हेही वाचा : ग्राहक राजा सतर्क हो…!

4) आपले क्रेडिट कार्ड चोरीस जाऊन किंवा गहाळ झाल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो व त्यातून होणाऱ्या पेमेंटची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. तसेच आपल्या कार्डाची माहिती चोरून ते ऑन लाईन पेमेंटसाठी वापरले जाऊन फ्रॉड केला जाऊ शकतो. यासाठी शक्य तोव्हर व्हर्च्युअल कार्ड वापरावे तसेच आपल्या कार्डाचा तपशील विशेषत: पिन सुरक्षित राहील याची खबरदारी घेणे आवश्यक असते.

थोडक्यात क्रेडिट कार्ड ही जरी उत्तम सुविधा असली तरी ती वापरताना वर उल्लेखिलेली खबरदारी घेणे आवश्यक असते.

Story img Loader