सरलेल्या सप्ताहातील बुधवारी संध्याकाळी अमेरिकेने भारतावर २५ टक्क्यांचे ‘आयात शुल्क’ आकारण्याचे जाहीर केले. त्यावर निफ्टी निर्देशांकाने गुरुवारच्या सत्रात २४,६३५ चा नीचांक नोंदवणारी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. ३० जूनच्या २५,६६९ च्या उच्चांकापासून २४,६३५ अशी १,०३४ अंशांची घसरण नोंदवत, जून महिन्यापासून जे मंदीचं भय व्यक्त केलं जात होतं, ते सरलेल्या सप्ताहात प्रत्यक्षात आलं. या सर्व प्रक्रियेत निफ्टी निर्देशांक २५,००० च्या लक्षवेधी, वर्तुळाकारी संख्येचा भरभक्कम आधार तोडला. निर्देशांक २५,००० च्या स्तराखाली सलग तिसरा साप्तहिक बंद देत असल्याने येणाऱ्या दिवसातील निफ्टीच्या वाटचालीचा विस्तृत आढावा विविध शक्यतांच्या आधारे आज घेऊ या.
शक्यता क्रमांक १ : या स्तंभातील जून महिन्यातील लेखात निफ्टी निर्देशांक २५,००० चा ‘महत्त्वाचा वळणबिंदू’ राखण्यात अपयशी ठरल्यास, त्याचे खालचे लक्ष्य २४,८०० ते २४,५०० असेल, असे नमूद केलेले. सरलेल्या सप्ताहातील निफ्टी निर्देशांकाचा साप्तहिक बंद भाव हा २४,५६५ असल्याने आणि आता २४,५००चा स्तर हा हाकेच्या अंतरावर आहे. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने २४,५०० ते २४,२०० चा स्तर सातत्याने पाच दिवस राखल्यास एक क्षीण स्वरूपाची सुधारणा अपेक्षित आहे. तिचे प्रथम वरचे लक्ष्य हे २४,८००, २४,९२० तर द्वितीय वरचे लक्ष्य २५,०५० ते २५,१५० असेल. निफ्टी निर्देशांक २५,३५० च्या स्तरावर सातत्याने पंधरा दिवस टिकल्यास, हा निर्देशांक मंदीच्या गर्तेतून बाहेर पडल्याचा संकेत असेल. यातून तेजीचे नवीन पर्व सुरू झाले असे समजण्यास हरकत नाही.
शक्यता क्रमांक २ : आता जे मंदीचं आवर्तन सुरू झालं आहे त्यात मध्येच भूमिती श्रेणीतील अतिजलद अशा सुधारणा ही २४,८०० ते २५,१५० पर्यंत येऊन पुन्हा मंदीचे चक्र सुरू झाल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे २४,००० ते २३,८०० तर, द्वितीय खालचे लक्ष्य २३,५०० ते २३,२०० असेल.
निकालपूर्व विश्लेषण
१) भारती एअरटेल लिमिटेड :
१ ऑगस्टचा बंद भाव : १,८८४.४० रुपये
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, ५ ऑगस्ट
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,८८० रुपये
निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,८८० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य १,९७० रुपये, द्वितीय लक्ष्य २,०२० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास:१,८८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८१० रुपयांपर्यंत घसरण
२) ल्युपिन लिमिटेड :
१ ऑगस्टचा बंद भाव : १,८६७.३० रुपये
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, ५ ऑगस्ट
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,८०० रुपये
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १,८०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य १,९८० रुपये, द्वितीय लक्ष्य २,१२० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: १,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,६५० रुपयांपर्यंत घसरण
३) बजाज ऑटो लिमिटेड :
१ ऑगस्टचा बंद भाव : ८,०४४.५० रुपये
तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, ६ ऑगस्ट
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ७,९५० रुपये
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ७,९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,४५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,७०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ७,९५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७,६५० रुपयांपर्यंत घसरण
४) बाॅम्बे स्टाॅक एक्स्चेंज (बीएसई) लिमिटेड :
१ ऑगस्टचा बंद भाव : २,४११.३० रुपये
तिमाही वित्तीय निकाल: गुरुवार, ७ ऑगस्ट
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,३७० रुपये
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,३७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५३० रुपये, द्वितीय लक्ष्य २,८०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: २,३७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,२७० रुपयांपर्यंत घसरण आशीष ठाकूर लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’आणि इच्छीत लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.