केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी (२४ ऑगस्ट) युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मंजूर केली. या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे. सरकारच्या घोषणेनुसार ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. नवीन पेन्शन योजनेत (NPS) सुधारणा करून, या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रश्न १: युपीएस (युनिफाईड पेन्शन स्कीम) म्हणजे काय?

मोदी सरकारने नव्याने मंजूर केलेली ही पेन्शन स्कीम (सेवानिवृत्ती वेतन योजना) असून यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर पूर्वनिर्धारित नियमित पेन्शन मिळण्याची हमी असणार आहे व या योजनेची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून होणार आहे.

हेही वाचा…निर्ढावलेले आणि हेतुपुरस्सर कर्जबुडवे

प्रश्न २: मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम कशी ठरवली जाणार आहे ?

या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्याची नोकरी २५ वर्षे किंवा त्याहून अधिक झाली असेल अशा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होताना आधीच्या १२ महिन्याच्या सरासरी मूळवेतनाच्या (बेसिक पगार) ५०% इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळेल, या शिवाय मिळणारे पेन्शन चलनवाढीच्या निर्देशांकाशी निगडीत असणार आहे, तसेच १० वर्षे किंवा त्याहून जास्त पण २५ वर्षांपेक्षा कमी सर्व्हिस झाली असल्यास प्रपोर्शनेट(अनुपातिक) किंवा किमान रु. १०००० इतकी पेन्शन मिळणार आहे.

प्रश्न ३: पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास पत्नी/पतीस पेन्शन मिळणार का?
पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास पत्नी/पतीस संबंधित मृत व्यक्तीस मिळणाऱ्या पेन्शनच्या ६०% इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळेल.

प्रश्न ४ : सेवानिवृत्त होताना पेन्शनव्यतिरिक्त एकरकमी रक्कम किती मिळणार?
सेवानिवृत्त होताना पेन्शन व्यतिरिक्त ग्रॅच्युटीबरोबर सुपरअॅन्युटी पोटी एकगठ्ठा रक्कम मिळणार असून ती खालील प्रमाणे असेल. सेवानिवृत्तीच्या वेळच्या मूळ पगारच्या (बेसिक +डीए) १०% इतकी रक्कम पूर्ण झालेल्या सर्व्हिसच्या प्रत्येक वर्षाच्या ६ महिन्यासाठी मिळेल.

हेही वाचा…समभागाच्या ‘बायबॅक’वरील कर आकारणी

प्रश्न ५: युपीएस योजनेत कर्मचाऱ्याचे योगदान आहे का?
होय, युपीएस योजनेत कर्मचाऱ्याचे योगदान १०% असणार आहे तर सरकारचे १८.५% असणार आहे.

हेही वाचा…बहुउद्देशीय व्यवसाय संधीच्या दिशेने…

प्रश्न६: सध्या जे केंद्रीय कर्मचारी एनपीएसचे सदस्य आहेत त्यांना या युपीएस योजनेत सहभागी होता येईल का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या जे केंद्रीय कर्मचारी एनपीएसचे सदस्य आहेत त्यांना या युपीएस योजनेत सहभागी होण्याचा पर्याय असून मात्र एकदा हा पर्याय स्वीकारला की पुन्हा एनपीएसमध्ये सहभागी होता येणार नाही.