-सुधाकर कुलकर्णी

आजकाल प्रमुख डेबिट/क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका तसेच अन्य वित्तीय संस्था ग्राहकांना व्हर्च्युअल कार्ड देऊ करत आहेत , तथापि बहुतेकांना व्हर्च्युअल कार्ड म्हणजे नेमके काय व असे कार्ड वापरणे का हितावह असते याबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने आज आपण व्हर्च्युअल कार्ड बाबतची आवश्यक ती माहिती घेऊ.

multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Porn Bots Pops Up On Screen Because You Engage With It Says Former Meta Employee
स्क्रोल करताना अचानक पॉर्नसारखे व्हिडीओ का दिसतात? मेटाच्या माजी सहसंस्थापकाच्या पोस्टमुळे नेटकरी भडकले
career options after 10th and 12th career opportunities after 10th and 12th
स्कॉलरशीप फेलोशीप : करिअर मॅपिंग आताच सुरू करा

नुकत्याच सिक्युरिटी. ऑर्ग ने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६५% कार्डचा एकदा तरी गुन्हेगारांकडून गैरवापर वापर केला असल्याचे दिसून आले. कार्डाचा असा गैरवापर टाळण्याच्या दृष्टीने व्हर्च्युअल कार्डाचा वापर करणे हा एक प्रभावी उपाय आहे. व्हर्च्युअल कार्डचा ऑनलाइन पेमेंट करताना कार्डची गोपनीय माहिती गुन्हेगारांच्या हाती जात नसल्याने कार्डाचा गैरवापर करणे सहजासहजी शक्य होत नाही.

आणखी वाचा-Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या

व्हर्च्युअल कार्ड हे आपल्या फिजिकल कार्डचे डिजिटल व्हर्जन (स्वरूप)असते.यात आपल्या फिजिकल कार्ड ऐवजी एक विशिष्ट (युनिक) कार्ड नंबर बऱ्याचदा केवळ एकदाच वापरण्यासाठी जनरेट केला जातो. यामुळे जेव्हा कार्डधारक असे व्हर्च्युअल कार्ड पेमेंटसाठी वापरतो तेव्हा ग्राहकाचा तपशील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर साठवून (स्टोअर करून ) ठेवत नसल्याने आपला डेटा सुरक्षित राहिल्याने गैरवापर होऊ शकत नाही.

व्हर्च्युअल कार्डाचे फायदे आता पाहू. व्हर्च्युअल कार्डासाठी वापरचा कलावधी, खर्चाची मर्यादा कार्डधारकास सुनिश्चित करता येते. यामुळे कार्डाचा योग्य वापर करणे शक्य होते. शिवाय असे कार्ड हरविण्याची/ चोरीस जाण्याची भीती नसते. तसेच कार्ड सहजतेने वापरता येते. तथापि अजूनही काही ठिकाणी व्हर्च्युअल कार्ड वापरता येतील अशी मशीन्स उपलब्ध नसल्याने व्हर्च्युअल कार्ड सर्रास वापरता येईलच असे नाही.

आणखी वाचा-Money Mantra: ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे काम काय?

व्हर्चुअल कार्ड मिळविण्यासाठी आपल्याकडे आधी फिजिकल कार्ड असणे आवश्यक असते. व्हर्च्युअल कार्डाची मागणी आपण ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करू शकतो. आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड व फिजिकल क्रेडिट कार्डाची लिमिट एकत्रित असते. उदाहरणार्थ आपल्या एचडीएफसी क्रेडिट कार्डची लिमिट २.५ लाख इतकी असेल तर आपले फिजिकल व व्हर्च्युअल कार्ड मिळून २.५ लाख इतकी लिमिट एकत्रितरीत्या वापरता येते. थोडक्यात व्हर्च्युअल क्रेडिट कार्डाला स्वतंत्र लिमिट मिळत नाही. आता आपले क्रेडिट कार्ड युपीआय अॅपशी जोडता येत असल्याने किरकोळ खर्चासाठी सुद्धा क्रेडिट कार्डचा वापर क्यू आर कोड स्कॅन करून करता येतो. भलेही ही सुविधा केवळ रूपे क्रेडिट कार्डालाच असल्याने ज्या बँकांनी आपल्या ग्राहकांना या आधी मास्टर अथवा व्हिसा कार्ड दिलेले आहे अशा ग्राहकांना ही सुविधा वापरता यावी म्हणून व्हर्च्युअल रूपे क्रेडिट कार्ड देऊ करत आहेत. ग्राहकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.