गेल्या ४ वर्षांमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना थेट समभाग व त्यांच्याशी निगडित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची सवय लागली आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. म्युच्युअल फंड सही है, मार्केट तो उपर जाता ही है, रिस्क है तो इश्क है अशी सध्याची घोष वाक्ये गुंतवणूकदारांच्या मनावर बिंबवली गेलीत. त्यामुळे समभागांमध्ये गुंतवणूक केली झालं, अशी मानसिकता तयार होऊ लागली आहे. अर्थात दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना हा अनुभव आला आहे. पण प्रत्येक वेळी गुंतवणूक चक्र हे समभागांसाठी पूरक असेल असं नसतं. जेव्हा-जेव्हा युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे, तेव्हा शेअर बाजार खाली आला आहे.

आता इराण आणि इस्रायलमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि म्हणून येत्या काळात बाजारात अधिक चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मागील शुक्रवारीच याची थोडी कल्पना आली होती. यापुढे देखील काही ना काही कारणास्तव जागतिक अस्थिरता असल्यामुळे शेअर बाजारातून सहज चांगला परतावा मिळवणं कठीण होणार आहे. असं जेव्हा होतं तेव्हा गुंतवणूकदाराकडे काय पर्याय असतो? आजच्या लेखातून आपण हे जाणून घेऊया.

portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….
Investment Management in Wartime, wartime, Investment Management, Financial Uncertainty, Surviving Financial Uncertainty, Minimize Losses, Volatility, share market, stock market, mutual funds, returns, profit, loss, sell,
युद्धसदृश काळातील गुंतवणूक व्यवस्थापन
FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
long term investment, early investment planning, financial planning in todays world, loss minimization, risk optimization, achieve finanacial goals, portfolio in share market, share market, mutual fund, health insurance, bank repo rate, loan, inflation, investment, returns, profit, loss, financial article,
मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
gold, gold all time high, gold investment, commodity market, money mantra, bazar article, gold all time high reasons, gold and global economy, gold in india, global economy,
क… कमोडिटीजचा : सोन्याचा ‘गाझा’वाजा
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Harsh Goenka on Share market predict
‘शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती’, बड्या उद्योगपतीने गुजराती-मारवडींचा उल्लेख करत वर्तविली भीती

माझ्या आधीच्या लेखांमधून मी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनबद्दल अनेकदा सांगितलं आहे. समभाग, रोखे, मालमत्ता, कमॉडिटीज आणि सोने हे मुख्य गुंतवणूक पर्याय असतात आणि त्यांना जेव्हा प्रमाणबद्ध करून आपण पोर्टफोलिओ तयार करतो, तेव्हा त्याला मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ म्हणतो. मालमत्ता आणि सोने तेव्हाच पोर्टफोलिओमध्ये घ्यायचे, जेव्हा ते वैयक्तिक वापरासाठी नसून, पूर्णपणे गुंतणवुकीसाठीच असतील. आजच्या काळात आभासी चलन (क्रिप्टो), डेरिव्हेटिव्ह, दुर्मीळ चित्रे आणि कलाकृती, संग्रही नाणी यांचा सुद्धा समावेश मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओमध्ये केला जातो. परंतु येणाऱ्या काळात या पर्यायांची खरी परिणामकारकता कळेल. तोवर आपण मूळ पर्यायांवर जास्त लक्ष केंद्रित करूया.

हेही वाचा…Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओचं मुख्य उद्धिष्ट जोखीम व्यवस्थापन करणे आहे. एकाच पर्यायावर अवलंबून राहणे व त्याच्या विपरीत कामगिरीचा आपल्या पोर्टफोलिओवर होणाऱ्या परिणामांवर अंकुश ठेवण्यासाठी आपण हा पोर्टफोलिओ तयार करतो. “Do not put all eggs in one basket” या वाक्यात अशा पोर्टफोलिओची गरज कळते. थोडक्यात काय तर, गुंतवणुकीच्या चक्रानुसार आपले पैसे महाग पर्यायांतून कमी करून, पुढील काळासाठी योग्य असणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवावे. निरनिराळ्या पर्यायांमध्ये ते नियमित फिरवत राहावे. महागाई कमी असेल तेव्हा रोखेसंलग्न गुंतवणूक स्वस्त असते. महागाई वाढल्याने दीर्घकालीन रोख्यांची किंमत कमी होते.

अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होत असेल, तेव्हा समभागसंलग्न (इक्विटी) गुंतवणूक चांगली वाढते. मात्र जागतिक अस्थिरता, खनिज तेलाचे भाव, देशांतर्गत राजकीय समीकरणे या कारणांमुळे समभाग वर-खाली होतात. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोने व चांदीचे दर वधारतात. महागाईमध्ये स्थावर मालमत्तेत गुंतवणूक वाढते. मात्र इथे सरसकट सगळ्याच मालमत्ता वाढतात असं होत नाही, प्रत्येक वस्तू, मागणी-पुरवठा समीकरण, व्याजदर धोरण या सर्व गोष्टींवर स्थावर मालमत्तेच्या किमती ठरतात. कुठल्या वेळी कोणती गुंतवणूक आकर्षक होईल याचे फक्त अंदाज बांधता येतात. तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःकडे किती मोठा पोर्टफोलिओ तयार झाला आहे आणि त्याच्या कामगिरीवर येत्या काळात कशामुळे काय परिणाम होतील हे समजून घेऊन जोखीम व्यवस्थापन करायचे आहे. म्हणून अशा प्रकारचा मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ तयार करावा.

उत्तम पोर्टफोलिओ बनवण्यासाठी कौशल्य लागतं. परंतु सर्वसामान्य गुंतवणूकदार ज्यांना हे सगळं क्लिष्ट वाटतं, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडांनी अशा प्रकारच्या पोर्टफोलिओ योजना तयार करून ठेवलेल्या आहेत. हे फंड समभाग, रोखे, सोने, इतर कमॉडिटी, रिट्झ व वायदे बाजारामध्ये गुंतवणूक करतात. अशा फंडांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास निष्क्रिय पद्धतीने अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करता येऊ शकतं. त्यातील काहींची नावं खाली देत आहे.

हेही वाचा…पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

नाव मालमत्ता (रु. कोटी)

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल मल्टिअ‍ॅसेट फंड ३६,८४३
कोटक मल्टिअ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड ५,३६७
एसबीआय मल्टिअ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड ४,२३०
एबीएसएल मल्टिअ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड ३,१४४
निप्पोन इंडिया मल्टिअ‍ॅसेट फंड २,९०५

प्रत्येक फंडाचा पोर्टफोलिओ आणि मानदंड वेगळा आहे. तेव्हा गुंतवणूकदाराने फंडाची फॅक्टशिट नीट वाचून घ्यायला हवी. मागील परतावे बघताना, वाईट काळातील कामगिरी देखील नीट तपासावी. जेणेकरून पोर्टफोलिओ किती खाली जाऊ शकतो याचा अंदाज येईल.

डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड हे मल्टिअ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडांपेक्षा वेगळे असतात. कारण त्यात फक्त समभाग आणि रोखे यांच्यामध्ये शेअर बाजारातील परिस्थितीनुसार प्रमाण बदलत असते. परंतु मल्टि अ‍ॅसेट फंडांचे प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचे परिमाण बऱ्यापैकी स्थिर राहते.

हेही वाचा…वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?

गुंतवणूकदार स्वतःसुद्धा असा पोर्टफोलिओ बनवू शकतो. उदाहरण घ्यायचं तर ५० टक्के फ्लेक्झी कॅप, २५ टक्के रोखेसंलग्न फंड, १० टक्के गोल्ड म्युच्युअल फंड, ५ टक्के सिल्वर म्युच्युअल फंड, ५ टक्के हाऊसिंग म्युच्युअल फंड (हा समभाग निगडित फंड असतो, स्थावर मालमत्ता निगडित नाही), ५ टक्के कमॉडिटीज म्युच्युअल फंड (हा समभाग निगडित फंड असतो, स्थावर मालमत्ता निगडित नाही). जे गुंतवणूकदार थेट रिट्झ, कमॉडिटीज आणि डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक करू शकतात त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करता येऊ शकतो.

आता हा प्रश्न पडणं साहजिक आहे की, जर आपली गुंतवणूक सर्वच प्रकारच्या पर्यायांमध्ये असेल तर पोर्टफोलिओला नुकसान होताच कामा नये. परंतु असं नसतं. एखाद्या पर्यायातून येत्या काळात चांगली कामगिरी होणार नसेल तर आपण सगळंच विकून दुसऱ्या पर्यायात गुंतवणूक करत नाही. शिवाय काही वेळा तर सर्वच गुंतवणूक पर्यायांतून एकाच वेळी पैसे काढले जातात. जितका गुंतवणूक पर्याय रोकड सुलभ असतो, तितका पटापट तो विकला जातो आणि तेवढ्याच वेगाने त्याची किंमत खाली येते. तेव्हा समभाग, रोखे, सोने, कमॉडिटीज, रिट्झ सगळंच पडतं. कारण अशावेळी गुंतवणूकदाराला हाताशी रक्कम बाळगणं हे जास्त सुरक्षित वाटतं. करोनाकाळामध्ये जर पाहिलं तर सगळंच खाली आलं होतं. परंतु अशी परिस्थिती ठरावीक काळापुरतीच मर्यादित असते. पुढे संधीनुसार पैसे निरनिराळ्या पर्यायांमध्ये परत घातले जातात आणि गुंतवणुकीचं चक्र सुरू राहतं.

हेही वाचा…गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू

येत्या काळातील अनिश्चितता कदाचित खूप वेळ टिकेल. तेव्हा वेळीच आपला पोर्टफोलिओ तपासून गरजेनुसार आणि जोखीमक्षमतेनुसार बदल करण्याने कमावलेल्या परताव्यांना सांभाळता येऊ शकेल. आपल्या पोर्टफोलिओच्या प्रेमात नक्की राहा पण त्यातील घटकांच्या बाबतीत तटस्थता बाळगावीच लागते. तरच चांगले निर्णय घेता येतील. नुकत्याच सुरू झालेल्या आर्थिक वर्षामध्ये आपला पोर्टफोलिओ भक्कम करून येणाऱ्या काळासाठी तयार राहा!