एप्रिल महिन्याचा पूर्वाध ते जुलैचा उत्तरार्ध यात अमेरिका भारतावर किती टक्के ‘आयात शुल्क’ लावू शकते या चर्चा, महाचर्चांच्या गुऱ्हाळांमध्ये अडकला होता. यात मध्येच जरा आशेचा किरणही दिसला. ‘भारत आमचा मित्र आहे. भारताबद्दल सहानभूतिपूर्वक विचार केला जाईल’ वगैरे आशादायक विधाने ट्रम्प यांच्या तोंडून आली. त्यांनी ते म्हणावं, की तसं त्याचं प्रतिबिंब निफ्टी निर्देशांकावर तेजीच्या उसळीत (जम्पमध्ये) व्हायचं.
ट्रम्प यांचे ‘आयात शुल्क’ त्यासंबंधीचा सावळागोंधळ समजून घेता घेता, ६ ऑगस्टची संध्याकाळ आली. अन् अमेरिकेने ५० टक्क्यांचं आयात शुल्क लादून भारताला ‘डम्प’ केल्याचंही दिसलं. गेले तीन महिने ‘जम्प- डम्प- ट्रम्प’ या तीन शब्दांभोवती अर्थकारण फिरत होतं, तर याचा परिणाम म्हणून भांडवली बाजाराचा निर्देशांक तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर झुलत होता. प्राप्त घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीचा आढावा घेऊ या.

गेल्या लेखात निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीबद्दल तीन शक्यता व्यक्त केल्या होत्या. त्यातील शक्यता क्रमांक १ म्हणजे – ‘येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांक २४,५०० ते २४,२०० पर्यंत घसरू शकतो.’ या शक्यतेचं प्रत्यंतर आपण सरलेल्या सप्ताहात घेतलं. निफ्टी निर्देशांकांने २४,५०० चा स्तर तोडत, २४,३६३ चा साप्ताहिक बंद दिला. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने २४,१०० ते २४,००० चा स्तर सातत्याने राखल्यास, या निर्देशांकावर एक क्षीण सुधारणा संभवते. तिचे वरचे लक्ष्य २४,७०० ते २४,९२० असेल. शाश्वत तेजी ही निफ्टी निर्देशांकावर २५,००० च्या स्तरावरच संभवते. निफ्टी निर्देशांक २४,७०० ते २४,९२० चा स्तर पार करण्यास अपयशी ठरल्यास त्याचे खालचे लक्ष्य २३,८०० ते २३,५०० असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) बीईएमएल लिमिटेड

८ ऑगस्टचा बंद भाव : ३,८५९.२० रु.

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, ११ ऑगस्ट

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ३,८०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ३,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,२०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : ३,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,६०० रुपयांपर्यंत घसरण

२) हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड

८ ऑगस्टचा बंद भाव : ४,४४०.६० रु.

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, १२ ऑगस्ट

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ४,४०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ४,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,८०० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : ४,४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,३००रुपयांपर्यंत घसरण

३) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

८ ऑगस्टचा बंद भाव : ६७२.७५ रु.

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, १२ ऑगस्ट

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ६५० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७०० रुपये, द्वितीय लक्ष्य ७२५ रुपये.

निराशादायक निकाल असल्यास : ६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६२५ रुपयांपर्यंत घसरण

४) बीपीसीएल लिमिटेड :

८ ऑगस्टचा बंद भाव : ३१९.४५ रु.

तिमाही वित्तीय निकाल: बुधवार, १३ ऑगस्ट

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ३०० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ३०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३३० रुपये, द्वितीय लक्ष्य ३५० रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: ३०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २८० रुपयांपर्यंत घसरण

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.