यंदा अक्षय्य तृतीया २२ एप्रिलला म्हणजेच आज शनिवारी साजरी केली जात आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा आहे. त्यात पौराणिक मान्यताही आहे. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला गुरूच्या राशीतही बदल आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, चांदी, दागिने, वाहन, घर, दुकान, फ्लॅट, प्लॉट इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी सोने खरेदी करणे आणि परिधान करणे सर्वात शुभ मानले जाते. लोक अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात आणि यंदा अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे ज्योतिषाचार्य परमेश्वर मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊयात.

अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात?

ज्योतिषी परमेश्वर मिश्रा सांगतात की, पौराणिक मान्यता आणि पौराणिक कथांनुसार, ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षय कुमारचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया तिथीला झाला. म्हणूनच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या तिथीला कोणतेही शुभ कार्य केले तरी त्याचे चौपट फळ अक्षय राहते. त्यात कधीही कमतरता नसते. सोने आणि दागिने हे लक्ष्मीचे भौतिक रूप मानले जाते. ज्यांच्यावर माता राणीचा विशेष आशीर्वाद असतो. शुभ योगामुळे या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच सोने खरेदी करून परिधान केल्याने अकाली मृत्यू होत नाही, अशीही आख्यायिका आहे.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी कोणता मुहूर्त असेल?

ऋषिकेश पंचांगानुसार ज्यांना अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करायचे आहे ते शनिवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८:०४ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रविवार २३ एप्रिलला सकाळी ८ वाजेपर्यंत करू शकतात. या दिवशी दागिने खरेदी करून परिधान केल्यास अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. हा २४ तासांचा काळ त्रेतायुगाचा योग बनवतो. यामध्ये भगवान परशुराम आणि राम यांचा जन्म झाला. हे वर्षातून एकदाच घडते, असंही मिश्रा म्हणालेत.

हेही वाचाः ५० हजारांत सुरू केलेल्या व्यवसायात कोट्यवधींची कमाई; भरपूर मागणी, जाणून घ्या प्रक्रिया

२२ एप्रिलला अक्षय्य तृतीया मुहूर्त किती वाजता सुरू झाला?

ऋषिकेश पंचांगानुसार अक्षय्य तृतीया शनिवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८:०४ पासून सुरू झाला आहे, जो रविवार २३ एप्रिल रोजी सकाळी ८:०८ पर्यंत राहील. या शुभ योगात दान पूर्ण करणे आणि स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे. याने पुण्य प्राप्त होते आणि संकटे दूर होतात. धार्मिक स्थळांना भेटी देऊन गोरगरीब, असहाय्य, गरजूंना दान देऊन सद्गुणाचा भाग कमावला पाहिजे, असेही ते सांगतात.

हेही वाचाः विश्लेषण : गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहात? म्युच्युअल फंड देऊ शकतात चांगला फायदा