राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ टाटा समूहाच्या शेअर्सनी भरलेला आहे. आता त्यांच्यानंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना त्याचा फायदा होत आहे. आज सकाळी रेखा झुनझुनवाला यांनी टायटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समुळे १५ मिनिटांत ४०० कोटी रुपयांचा नफा कमावला. सोमवारी बाजार उघडताच टायटनचा शेअर ५०.२५ रुपयांनी वाढून २,५९८.७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. तसेच टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ३२.७५ रुपयांनी वाढून १५ मिनिटांत ४७०.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचले. टाटा समूहाच्या या दोन शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या बाजार मूल्यामध्ये प्रचंड वाढ झाली आणि त्यांनी १५ मिनिटांत सुमारे ४०० कोटी रुपयांचा नफा कमावला.

टायटनमुळे २३० कोटींची कमाई

शेअर बाजार सुरू झाल्यानंतर १५ मिनिटांत टायटनच्या शेअरच्या किमतीत प्रति शेअर ५०.२५ रुपयांची वाढ झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीतील टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ४,५८,९५,९७० शेअर्स आहेत. पहिल्या १५ मिनिटांत टायटनच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत सोमवारी २३० कोटी रुपयांची (५०.२५ x ४,५८,९५,९७० रुपये) वाढ झाली.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

टाटा मोटर्सने १७० कोटी रुपये कमावले

शेअर बाजार सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत प्रति शेअर ३२.७५ ने वाढली. आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत Tata Motors Ltd च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांची शेअरहोल्डिंग ५,२२,५६,००० म्हणजेच कंपनीतील १.५७ टक्के हिस्सेदारी आहे. अशा प्रकारे रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत सुमारे १७० कोटी रुपयांची (३२.७५ x५,२२,५६,००० रुपये) वाढ झाली आहे.

हेही वाचाः PM Kisan Samman Nidhi : १४व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट; ‘या’ महिन्यात येऊ शकतात पैसे

रेखा झुनझुनवालांना एकूण ४०० कोटींचा फायदा

रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एकूण ४०० कोटींची वाढ झाली आहे. टायटन कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे झुनझुनवाला यांना २३० कोटी रुपयांचा नफा झाला असून, टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर १७० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या दोन टाटा समूहांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत ४०० कोटी रुपयांची (रु. २३० कोटी + रु. १७० कोटी) वाढ झाली आहे.

हेही वाचा: टाटांच्या ‘या’ कंपनीचे शेअर सुस्साट, गुंतवणूकदार काही तासांत झाले श्रीमंत