Warren Buffett जगातल्या १० प्रमुख अब्जाधीश व्यक्तींच्या यादीतून वॉरेन बफे यांचं नाव बाहेर गेलं आहे. काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांचं नाव प्रदीर्घ काळानंतर या यादीतून बाहेर गेलं. त्यानंतर आता वॉरेन बफे हे नावही या यादीच्या बाहेर गेलं आहे. वॉरेन बफे यांच्या नेवर्थचा आलेख खालावल्याने ते ११ व्या क्रमांकावर गेले आहेत. आता मग या यादीत आहे तरी कोण? याबाबत आपण जाणून घेऊ.
२४ तासांत वॉरेन बफे यांचं नाव बाहेर
९४ वर्षीय वॉरेन बफे बर्कशायर हॅथवेचे चेअरमन आहेत. प्रदीर्घ काळापासून त्यांचं नाव हे जगातल्या १० अब्जाधीशांच्या यादीत होतं. मात्र मागच्या २४ तासांत त्यांचं नाव ११ व्या क्रमांकावर गेलं आहे. ब्लूमर्ग बिलेनियर्स इंडेक्स नुसार बफे हे आता जगातले ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यावसायिक आहेत. वॉरन बफे यांची नेटवर्थ आता १४० कोटी अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. मागील महिन्याभराच्या कालावधीत त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये तूट पाहण्यास मिळाली ज्याचा परिणाम त्यांच्या नेटवर्थवर झाला आहे.
दहाव्या क्रमांकावर कुणाची एंट्री?
वॉरेन बफे हे प्रदीर्घ काळापासून दहा अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर होते. त्यांची जागा आता डेल टेकचे सीईओ मायकल डेल यांनी घेतली आहे. मायकल डेल यांची नेटवर्थ १.४१ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता वॉरेन बफे यांना एका क्रमांकाने मागे टाकलं आहे. डेल यांची नेटवर्थ १४१ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. त्यामुळे त्यांनी जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दहावं स्थान मिळालं आहे. मायकल डेल यांना त्यांच्या नेटवर्थमध्ये आत्तापर्यंत १७ अब्ज डॉलर्सहून अधिक फायदा झाला आहे.
जगातले १० श्रीमंत अब्जाधीश कोण?
नव्या यादीनुसार दहा अब्जाधीशांची यादी पाहिली तर पहिल्या क्रमांकावर ३७१ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह एलॉन मस्क जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ३०२ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह लॅरी एलिसन आहेत. तिसऱ्या क्रमांकावर २७० अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह मार्क झुकरबर्ग आहेत. तर चौथ्या क्रमांकावर जेफ बेजोस आहेत. त्यांचं नेटवर्थ २४४ अब्ज डॉलर्स आहे. पाचव्या क्रमांकावर लॅरी पेज १८० अब्ज डॉलर्स नेटवर्थसह, सहाव्या क्रमांकावर स्टीव बाल्मर आहेत. सग्रेरी ब्रिन हे सातव्या क्रमांवर तर जेन्सेन हुआंग आठव्या क्रमांकावर तर बर्नार्ड अर्नाल्ट १५३ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह नव्या क्रमांकावर आहेत. तर मायकल डेल हे दहाव्या क्रमांकावर आहेत.