देशभरात अनेक ठिकाणी कोंबडीच्या अंड्यांच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. कोलकात्यापाठोपाठ आता पुण्यात देशात सर्वात जास्त दराने अंड्यांची विक्री होत आहे. अंड्यांच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. हे वाढलेले दर पुढील काही दिवस कायम राहतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोलकात्याच्या घाऊक बाजारात ६.५० रुपये प्रति नग या दराने अंड्यांची विक्री होत आहे. तर पुण्यात घाऊक बाजारात अंड्यांचा दर ६.४४ रुपये प्रति नग इतका आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात अंडी ७ ते ८ रुपये दराने विकली जात आहेत.

कोलकाता आणि पुण्यापाठोपाठ अहमदाबाद (६.३९ रुपये), सुरत (६.३७ रुपये), वायझॅगच्या (६.२५ रुपये) घाऊक बाजारात अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. २०२३ मध्ये देशभरातील घाऊक बाजारात अंड्यांचा दर हा ६.१० रुपयांपेक्षा कमी होता. परंतु, आता अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. देशभरात थंडी वाढल्यानंतर अंडी, चिकण, मटण आणि माशांच्या मागणीत वाढ होते. सध्या देशात मागणी अधिक आणि पुरवठा १० ते १५ टक्के कमी असल्याने अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. भारतात दर महिन्याला सरासरी ३० कोटी अंडी विकली जातात.

Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

वेंकटेश्वरा हॅचरीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पेगावकर म्हणाले, अंडी उत्पादनात सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी अंड्यांचे उत्पादन कमी केले आहे. तर काही कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे. त्यामुळेच ही दरवाढ झाली आहे. यासह देशातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळ आणि कोंबड्यांच्या खाद्यावरील खर्च वाढल्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय बंद केला आहे. पोल्ट्री व्यवसायात सातत्याने तोटा होत असल्याने पुण्यासह आसपासच्या भागात अनेक ठिकाणी पोल्ट्री बंद आहेत.

हे ही वाचा >> Anda Bhaji :अंडा भजी कधी खाल्ली का? फक्त दहा मिनिटांमध्ये अशी बनवा ही अंडा भजी, जाणून घ्या रेसिपी

नियमित अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का?

अंडे हा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला पदार्थ आहे. चांगल्या आरोग्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण आवडीने अंडी खातात अमेरिकेतील सेंट ल्युक मिड-अमेरिका हार्ट इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ डॉ. जेम्स डिनिकोलँटोनियो (James DiNicolantonio)हे त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून सांगतात की, अंडी ही शत्रू नाहीत; तर अंडी नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन आहे आणि आपल्या शरीरासाठी ती निरोगी आहेत. अंडे हा निश्चितपणे एक पौष्टिक पदार्थ आहे. त्याचे आरोग्याला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. त्याशिवाय अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक आहेत; जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आठवड्यातून सात अंडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित मानले जाते.