Zerodha Nikhil Kamath Success Story : झिरोधा ही एक ब्रोकरेज कंपनी आहे. याद्वारे तुम्ही ऑनलाइन डिमॅट खाते उघडून शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवू शकता. भारतातील काही स्टार्टअप्सपैकी हे एक आहे, जे मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे. झिरोधाने या आर्थिक वर्षात २००० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, निखिल आणि नितीन कामत या दोन भावांनी ही कंपनी स्थापन केली असून, त्यांनी फायनान्सचं औपचारिक शिक्षणही घेतलेलं नाही. नितीन कामत अभियंता आहेत, तर निखिल कामत यांनी शाळेतूनच शिक्षणाला राम राम ठोकला. यामुळेच त्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी निधीही मिळाला नाही. आजही बाहेरून एकही पैसा झिरोधामध्ये गुंतवला जात नाही, पण २ भावांनी स्वबळावर ही कंपनी स्थापन करून त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा मिळवला आहे.

नितीन कामत हा अधिक लोकप्रिय चेहरा असून, तो दोन भावांमध्ये तो मोठा आहे. मात्र, धाकटा भाऊ निखिल कामतची कहाणी काही वेगळी नाही. ते सध्या कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. ज्या व्यक्तीला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही, त्याने शिकण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर १६,५०० कोटी रुपयांची कंपनी कशी बनवली या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. झिरोधाचे मूल्य सुमारे २ बिलियन डॉलरच्या आसपास आहे.

Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

वयाच्या १४ व्या वर्षी फोन विकायला सुरुवात केली

निखिल कामत यांनी १४ वर्षांचा असतानाच वापरलेले फोन विकायला सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या शालेय शिक्षणावर परिणाम झाला. हा प्रकार त्याच्या आईला कळताच तिने सर्व फोन नाल्यात फेकून दिले. त्याच्या अभ्यासाबाबतच्या निष्काळजीपणाचा शाळा प्रशासनालाही राग होता, त्यामुळे त्याला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची संधीही देण्यात आली नाही. यानंतर कामत यांनी शाळा सोडली.

कॉल सेंटर नोकरीतून मार्ग

वयाच्या १७ व्या वर्षी त्याने एका कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली, जिथे त्याला ८,००० रुपये मिळायचे. कामत सांगतात की, मी कॉल सेंटरमध्ये संध्याकाळी ४ ते पहाटे १ वाजेपर्यंत काम करायचो आणि सकाळी मी ट्रेडिंगमध्ये माझं नशीब आजमावायचो. यादरम्यान त्यांनी मार्केटबद्दल बरेच काही जाणून घेतले. त्यांच्या वडिलांनी कामत यांना खूप पाठिंबा दिला आणि त्यांचे पैसे कामत यांना शेअर बाजारात गुंतवण्यासाठी दिले. कामतने आपल्या कॉल सेंटरच्या सहकाऱ्यांना त्यांच्या पैशांचे व्यवस्थापन शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने करावे याचे महत्त्व पटवून दिले. अशा प्रकारे स्टॉक ब्रोकिंगमध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. २०१० मध्ये झिरोधा लाँच करण्यात आले आणि २०२१ मध्ये निखिल कामत वयाच्या 34 व्या वर्षी अब्जाधीश झाला.

झिरोधा फायदेशीर कंपनी

झिरोधाला कोणीही निधी दिला नाही आणि आजही बाहेरून एकही पैसा कंपनीत गुंतवला जात नाही. असे असूनही आज झिरोधा ही १६,५०० कोटी रुपयांचं भागभांडवल असलेली कंपनी आहे. निखिल कामतने गेल्या वर्षीच्या हुरुन इंडिया सेल्फ-मेड रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. यादीनुसार, निखिल कामतची एकूण संपत्ती १७,५०० कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने २०९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.